मंडल नेमल्यानंतर जयप्रकाश यांची क्रांतीच पोरकी कण्याची सुरूवात झाली. अगदी प्रथम ब्राह्मण सावध झाले त्यातुनच भाजपाचा जन्म झाला. लढण्यासाठी ओबीसी होता. पण हाच ओबीसी आपल्या हक्काच्या लढाईपासुन दुर कसा राहिला ? मंडल कसा गोठवता येईल. मंडलचा लाभ कसा मिळणार नाही इतर ठिकाणी लक्ष केंद्रीत करूण ओबीसी गुलाम केला. मराठा, पटेल, जाट हे प्रगत समाज आजपर्यंत स्वातंत्र्यात संघटीतपणे यांनी राजकीय सत्ता उद्योग, सहकार शैक्षणीक संस्था, शासकीय नोकरी यात आपला सहभाग मोठा ठेवला. मंडल मुळे त्याला धक्का बसताच विरोधही केला. विरोधाने संविधान बदलत नाही. म्हणताच आम्ही ओबीसी आहोत, आम्हाला ओबीसी करा, याचे हक्क आम्हाा द्या, आमच्यात गरीब आहेत, या गरीबांना हक्क द्या. ही हाक देवून रस्त्यावर उतरले. यासाठी या समाजातील सबळ झालेल्या बांधवांना आर्थीक पाठींबा यातुन अहिंसक मार्ग चोखळता चोखळता हिंसक मार्गाने दबाव निर्माण करूण ओबीसीत जाणे कायद्याने जमत नसेल तर उद्या संवीधानातील आरक्षणाचा कायदाच आम्हाला मजुंर नाही. मतदान मंजुर आहे पण आम्ही म्हणतो तसे नसेल तर आमचा हिसका हा मोठा असेल या देशात मराठा व अशा समाजाने लोकशाहीच पायदळी तुडवली आहे. कारण स्वातंत्र्याची सर्व सत्तास्थाने जवळ असताना फक्त आणि फकत आपला व आपल्या सग्या सोयर्यांचा विकास करणारे जवळ जवळ महाराष्ट्रात शेकडो मराठा घराणे आहेत. राजकीय सत्ता, सहकार, शैक्षणीक संस्था याच समाजाच्या ताब्यात आहे. लाखो रूपये घेवून शैक्षणीक प्रवेश देवून शिक्षण सम्राट झालेल्या या मराठा सम्राटांनी आपल्या किती गरिब मराठ्यांना मोफत शिक्षण दिले ? अनेक साखर करखाने अनेक सहकारी उद्योग दिवाळे वाजु लागले यातला पैसा गरिब मराठ्यांना का देवू केला नाही ? गावचा माळी, सुतार, नाभीक, कासार, सोनार, कोष्टी, शिंपी, परीट तेली, धनगर वंजारी यांनी किती संस्था दिवाळीत काढल्या ? सहकाराचे दिवाळ वाजविणारी मंडळीया ओबीसी जातीतील नव्हती ती बहुतांश मराठा समाजातील आहे असे असताना ही नवीन जात मराठा - कुणबी कशासाठी ?
मराठा हे आमचे भाऊ आहेत पण मराठा पण उरात बाळगुन जे अन्याय करतात ते आमचे भाऊ होऊच शकत नाही. कारण या मंडळींनी इतरांचा विकास होऊ दिला नाही. सर्व सत्ता स्वत:भोवतीच राबवली गावचा सरपंच पाटील, इतर जातीचा नको होता. म्हणजेच ओबीसी नको होता तसे पाहिले तर 52 % ओबीसी मध्ये 44 % हिंदु ओबीसी आहेत याचा विकास थांबविणारे कोण आहेत हे आपल्याला सांगायलाच नको कारण ते आपल्याला माहित आहेत.