Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

समाज संपविण्यासाठी आपलेच लोक कारणीभूत ....

    वाडा संस्कृती ही काँग्रेसची मक्तेदारी होती. स्वातंत्र्यानंर बहुजन हिताय बहुजन सुखाय या नावा खाली नांदत होती. वावरताना मराठा समाजाच्या उच्च व कमी पोटजाती एक झाल्या. स्वतंत्र्यात त्या सत्तेसाठी एकत्र आल्या कसेल त्याची जमीन कायदा ही केला. महात्मा गांधींना गोळ्या मारल्यानंतर ब्राह्मणांचे वाडे उध्वस्त झाले. आणि देशोधडीस गेलेल्या ब्राह्मणांच्या मालमत्तेचे हेच वहिवाटदार झाले. गावच्या माळी, सुतार, लोहार, शिंपी, गुरव, तेली, साळी, धनगर, परिट अशा जाती टाचेखाली आल्या. या जातींना स्वातंत्र्याने मतांचा अधिकार दिला. परंतु स्वातंत्र्याचा अधिकार हिसकाऊन घेतला. सत्ताधीश मराठा विरोधक मराठा. मत न दिल्यास गावात रहाण्याचा अधिकार संपुष्टात येत होता. सत्तेत  सहभाग घेऊ पहाताच तिरस्कार होता होता देशोधडीस गेलेल्या ब्राह्मणांनी शहरेआपली केली या शहरावरून आपला नवा रस्ता निर्माण केला. आपण राजकारण करू शकत नाही. आपण आहोत साडेतीन टक्के त्यामुळे विरोधही करू शकत नाही. आशा वेळी या सर्व मंउळींनी सेनेतुन भुजबळ आणि भाजपातुन मुंडे समोर ठेवले. त्यांना बळ दिले. यांनी आपले जात समुह जागे केले. या दोन ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाच्या वाडा संस्कृतीला खिंडार पाडले. 1977 च्या दरम्यान पहिला हादरा दिला. याच दरम्यान मंडल आयोग नेमला. ब्राह्मण प्रथम जागे झाले. त्यांनी जयप्रकाश नारायणांची क्रांती मोडीत काढत भाजपा निर्माण करूण मंडलला समर्थन म्हणुन कमंडलला रथ यात्रेत बसविले. अनेक ओबीसी तरूणांना नेते बनविले या बळावर अडगळीत गेलेले ब्राह्मण सत्तेत गेले. सत्तेत जाताच एक एक करीत ओबीसी नेता कुचकामी केला. हे करण्यासाठी बर्‍याच वेळा ब्राह्मण व क्षेत्रीय जाती अंधारात एकत्र आल्या. यातुनच काम संपताच या मंडळींना बाजुला केले गेले. आपलं मिळालेले मोठे पण आपल्याला मिळालेली सत्ता व आपण यात त्यांनी स्वत:ला मोठे केले आणि समाजाचा विचार कधी त्यांच्या डोक्यात आलाच नाही. सत्तेत जाताना जातीची आठवण व सत्तेत जाताच जातीचा तिटकारा याला विरोध करावा तर खोट्या केसेस, खोटे आरोप खोटा भ्रष्टाचार उभा करूण बदनामीचे मालक होण्यापेक्षा आपण आपले पाहु ही प्रणाली ओबीसींना मारक ठरली.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209