इंग्रजांच्या ताब्यात पेशवाई गेली व नष्ट झाली. तेव्हा स्त्रीयांनी दिवाळी साजरी केली.
पेशवाई ही जगातील सर्वात सैतानी राजवटीचे प्रतिक म्हणुन ओळखली जाते.
इंग्रजांनी हजारो वर्षाची शिक्षण बंदी उठवली. शिक्षण संस्था स्थापन केल्या 1835 ते 1853 या काळात ब्रिटिश मिशणार्यांनी अनेक ठिकाणी शाळा सुरू करुण बहुजनांना शिक्षणांची दारे प्रथमच उघडली गावोगावी शाळा झाल्याने सर्वजन खुष होते.
ब्राह्मणशाही विरूद्ध विषमते विरूद्ध सर्व प्रथम कडवा संघर्ष हजारो वर्षाच्या धार्मीक गुलामगीरीनंतर महात्मा ज्योतीबा फुलेंनी केला. ते पहिले बंडखोर मानले जातात. शुद्राती शुद्रांना प्रबोधनासाठी साहित्य निर्मिती केली व सार्वजनीक सत्यधर्म स्थापना केला. शुद्राती अतिशुद्रांना विद्यार्जनाच्या अधिकार पदावर नेमणुक्या व्हाव्यात असा आयुष्यभर आग्रह धरला अशा प्रकारचा आग्रह कोणत्याही समाजसुधारकाने धरला नाही.
बडोद्याच्या सयाजीराव गायकवडांनी व कोल्हापुरच्या छ. शाहु महाराजांनी आपल्या संस्थानात शुद्रातीशुद्रांना शिक्षणाच्या संधीसाठी शाळा सुरू केल्या. 1912 साली छ. शाहु महाराजंनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले 26 जुलै 1902 रोजी छ. शाह महाराजांनी एक अधिसुचना जारी करूण कोल्हापुर संस्थानातील सरकारी नोकरीत 50 जागा मागास वर्गीयांसाठी राखुन ठेवल्या. महात्मा ज्योतीबा फुले व छत्रपती शाहु महाराजाांनी पुरोहीत शाही व ब्राह्मणशाहीच्या हजारो वर्षाच्या एकाधिकार शाहिला सुरंग लावला. याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांच्या एैतिहासिक कार्याची सुरूवात झाली होती. त्यांनी महात्मा ज्योतीबा फुलेंना आपले गुरू मानले होते.