Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

गावगाड्यातील ओबीसी :- इतिहास, सद्यस्थिती आणि भविष्य

- डॉ. सतीश शिरसाठ,   पुणे विद्यापीठ, पुणे

    शाळेत आपण एक गोष्ट वाचली आहे. एक हत्ती आणि अनेक आंधळ्यांनी हाताच्या स्पर्शाने त्याच्या आकाराचे काढलेले अनुमान ! कुणी म्हटलं हत्ती सुपासारखा असतो तर कुणाच्या मते हत्ती खांबासारखा असतो इ.इ. त्या गोष्टीतल्या हत्तीप्रमाणे ओबीसी हा विशाल पण विस्कळीत आणि विषमसमाजसमूह आहे. ओंबीसीत अनेक जातींचा समावेश होतो. केंद्र सरकारची यादी वेगळी तर विविध राज्यांच्या याद्या वेगवेगळ्या. एका राज्यातील ओबीसी दुसर्‍या राज्यात कदाचीत भटक्या - विमुक्तांच्या यादीत तर कोठे अगदी खुल्या संवर्गातही आढळतील. मंडल आयोगाच्या सर्वेक्षणानुसार (1980) देशाच्या लोकसंख्येत ओबीसी बावन्न टक्के आहेत. 1992 ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्या नुसार एखाद्या राज्याची पूर्वीची यादी आणि मंडल आयोगाच्या यादीतील कॉमन जातीच फक्त ओबीसी.

    काल कालपर्यंत आरक्षणाची थट्टा करणारे आम्हाला ओबीसीत टाका म्हणून सार्‍या बाजूंनी रान उठवताहेत समाजाच्या मागे दोन पावले चालणारे अशी ज्यांची ओळख ते राजकारणी वारा पाहून उफणाताहेत. आशा प्रतिकुल परिस्थितीतही काजव्यासारखे काहीजण प्रकाशतात आणि अंधाराला छेदण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांना त्यांच्या धडपडीला सलाम करत काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे.

    ओबीसींच्या सतत बदलत्या स्वरूपात माझा लेख गावगाड्यातील ओबीसी जातींवर केंद्रीत करण्याचा मी प्रयत्न करीत संशोधनात विषयाची व्यपकता जशी धनात घेतली जाते तसा मर्यादांचाही  विचार करावा लागतो. पण येथे मर्यादांपेक्षा अभ्यास विषयाच्या निश्चितीच्या दृष्टीने हा विषय मी निवडला आहे. मार्क गॅलेटर म्हणातात ओबीसी हा स्वतंत्र्यानंतरचा मुद्द आहे. अर्थातच हे विधान अर्धसत्य आहे. एक बाबा मान्य आहे. ओबीसींचा पद्धतशीर अभ्यास करून त्यांच्या विकासासाठी सुचना करण्याचा उल्लेख स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेतच केला (आणि राज्यघटनेत ही तरतुद करूनही त्या अनुषंगाने आयोगाचे गठण केल नाही - हे एक महत्वाचे कारण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनाम देण्याचे) तरीही त्यामुळे त्यापुर्वी ओबीसी अस्तित्वात नव्हतेच असे नाही. अगदी  1919 च्या मॉन्टेग्यु - चेम्सोर्ड सुधारणांच्यावेळी ही डीप्रेस्ड क्लासमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागास वर्गाचा समावेश केल्याचा उल्लेख आढळतो. आणि वर म्हटल्याप्रमाणे पद्धतशीर अभ्यासाच्या दृष्टीने ओबीसींचा विचार स्वातंत्र्यानंतर झाला तरी, ओबीसी हे या समाजव्यवस्थेत होते . अगदी माणूस हा पशूजीवनापासून संस्कृतीच्या जगात आला तेव्हापासून ओबीसींचे अस्त्वि दिसून येते. फक्त ओबीसी ही टर्म अलीकडची. ओबीसीत अनेक गट आहेत. त्यापैकी बलुतेदार - अलुतेदार हा महत्वाचा गट पुर्वी गावगाड्यात स्वयंपूर्ण गाव संकल्पनोत गावच्या सार्‍या गरजा गावातच पुर्‍या होत. आज आपण ग्लोबल व्हीलेज ही संकल्पना ओळखतो पुर्वी व्हीलेज (गाव) हेच जग होते.

    गावच्या भरणपोषणासाठी शेतकरी आणि शेतीशी संबंधीत लोक पिकांची उत्पादने करत. इतरही वस्तुंची उत्पादने गावपातळीवर होत. शेतिमालावर प्रोसेसिंग करणे हेही काम काहीजण करत. उदा. उसापासुन गुळ करणे, कापसापासुन कापड बनवणे इ. घरे बांधणे, शेती व घरबांधणीचे, घरातील बदलाकडू काम, धातूंची भांडी, दांगदागिने बनविणे, पाणी साठवण्यासाठी मातीची भांडी बनवणे. अशी कौशल्याची कामे करण्याबरोबर कपडे धुणे केस कापणे अशी सेवेची कामे करणारे लोक गावगाडा चालवत. ही कामे करणारे लोक त्या त्या जातींचे असत . कारण व्यवसाय हे जातींना चिकटून असत आणि ते जन्माने निश्चित होत. गावगाड्याचा खल, विषमता, सामाजिक उच्चनिचता असे अनेक दोष जातीव्यवस्थेत होते, तरीही गावासाठी मी आणि माझ्यासाठी गाव अशी भावना सर्वसाधारणपणे गावगाड्यातील या समाजघटकांमध्ये प्रबळ होती. आणि याच भावनेतून संपत्ती जमवण्यापेक्षा इतरांच्या कामात आणि समाजाच्या भल्यासाठी मी जगले पाहिजे आणि त्या साठीच मला मरण यावे  असे विचार त्यांच्या मनावर कोरले होते.

    समाजातील  एखादा गट किंवा घटक दुसर्‍या गटाला संदर्भ म्हणून डोळ्यासमोर ठेऊन त्याच्यासारख्याच किंवा नेमकं त्याच्या उलट वागण्याचा प्रयत्न करतो. त्याचे संदर्भात हॅरी जॉन्सन संदर्भ गट सिद्धांत मांडतात. जातीच्या उतरंडीत उच्च समजल्या जाणार्‍या जातीप्रमाणे व्यवहार करणे पेहराव करणे, व्रत्रवैकल्ये करणे, रूढीपरंपरा, सोवळे ओवळे करणे, अगदी खाण्यापिण्याच्या सवयी अशा अनुकरणाना एम.एन.श्रीनिवास यांनी संस्कृतीकरण (saunkitizaton)  ही संज्ञा वापरली उच्च जातीप्रमाणे (विशेषत: ब्राम्हण) रहाणे, वागणे आणि  त्यांच्याप्रमाणे उच्च आहोत असे मानणे आणि मांडणे यासाठी खालच्या (मानल्या गेलेल्या) जातींची चढाओढ चाले. जातीनिहाय  जनगणनेत अनेक जातींनी आपण ब्राम्हण किंवा क्षत्रीय कसे आहोत हे सांगण्याचा खटाटोप केल्याचे दाखले आहोत अर्थात हा खटाटोप आपले श्रेष्ठत्व सांगून आपले स्थान उंचावण्याचा प्रयत्न होता. या प्रवृत्तीविषयी एम.एन. श्रीनिवास म्हणतात  जे (जातीचे लोक) स्वत:ला माझ्यापेक्षा उच्च समजतात त्यांच्या समपातळीवरील मी आहे. जे स्वत:ला माझ्यासमान समजतात, मी त्यांच्यापेक्षा उच्च आहे. असे असेल तर माझ्यापेक्षा कनिष्ठ हे माझ्या समान कसे होऊ शकतील ?

    असे  असले तरी, उत्पादन सेवा कौशल्यांतुन समाजाचा गाडा चालणारे बलुतेदार, अलुतेदार व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर फाटके होते. समाजाचे सौख्य, लोकांच्या जीवनातला आनंद हीच दौलत मानुन दारिद्रयाचे गौरविकरण करण्याच्या वृत्तीने ते मागास राहिले शिक्षणातही त्यांची अधोगती होत होती. बामनाघरी लिवनं, आन कुनब्याघरी दानं अशा म्हणी समाजमनावर कोरल्या होत्या. शिकून काय करायचं ? चाकरीच ना ! उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी वाक्ये इथे रूढ होती. आणि शिकूनतरी नोकरी (कुणाची तरी चाकरी) करण्यापेक्षा पिढीजात धंदा केला तर आपले कुणी मालक नाही. ही भावना तीव्र होती. त्यामुळे सुरवातीला त्यांनी शिक्षणाची कास धरली नाही. पर्यायाने शिक्षणातुन येणारी चौकस नजर, जागणाच्या जाणिवा, उच्च सामाजिक मुल्यांची रूजवणूक, अंधश्रद्धा आणी काही अनिष्ठ रूढींना प्रश्न विचारणे हे घडलेच नाही. लहान कुटुंबाचा स्विकार, स्त्री - पुरूष समता, डोळस वृत्ती यांपासून ते वंचित राहिले. शिक्षणाची दोरी धरून वर गेलेले उंच गेले. बलुतेदार मागेच राहिले.

    स्वातंत्र्या नंतर विशेषत: महाराष्ट्रात शिक्षणाचे जाळे सर्वदुर पसरल्यानंतर एक चित्र दिसू लागले . विकसनशिल देशांत, भारतात औपचारिक शिक्षणाचे जाळे फोफाऊ लागले. शाळा खेडोपाडी वाड्या - वसत्यांवर सुरू झाल्या. तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या गावातून हायस्कूल कॉलेजेस उघडली. मात्र यातील शिक्षणातुन अपेक्षित समताधिष्ठत मुल्यांचा प्रासार होणे झालेच नाही. अनेक बलुतेदार पालक मुंलांना शाळेत धाडु लागले पण या शिक्षणातले फोलपणाचा अंदाज आल्यानंतर (उदर- निर्वाहाचे साधन मिळविण्यासाठी) त्यांनी मुंलाना शाळेतुन काढुन अर्थाजनाला लावले. याच्या अगदी उलट लग्न होईपर्यंत मुलींना सुरक्षितपणे ठेवण्याच्या दृष्टीने जवळ उपलब्ध असेल तेवढे शाळा - कॉलेजचे शिक्षण ध्यायला ते पाठवू लागले. परंपरागत पदव्या मिळाल्या पण व्यक्तिमत्व विकास वगैरे शुन्य ! शिक्षणातील ही सुज्ञ भयावह आहे. आजही कॉम्प्युटर, बायोटेक्नॉलॉजी इ. विशेष क्षेत्रांत बलुतेदार नगण्य आहेत. एकतर यासाठीचे कोर्सेस सगळीकडे उपलब्ध नाहीत. त्यांची फी भरमसाठ असते किंवा यांची माहिती कुणी देत नाही.

    महाराष्ट्रात पुर्वीपासुन बलुतेदार ओबीसींना शिक्षणात आणि नोकर्‍यांत आरक्षण आहे. मंडल आयोगाने देशपातळीवर नोकर्‍यांत आरक्षण आहे. मंडल आयोगाने देशपातळीवर याची कक्षा वाढवली (अर्थात क्रिमीलेयर, जातपडताळणी यासारखे अडथळे वाढले) यामुळे सर्वांना नोकर्‍या मिळतीलच असे नाही. मंडल आयोगाच्या याविषयीच्या भुमिकेविषयी श्री. भाई वैद्य म्हणतात, अन्य मागासवर्ग उमेदवारास काही हजार जागा दिल्या म्हणजे भारतीय लोकसंख्येच्या 52 टक्के लोकसंख्या असलेल्या मागासवर्गांना पुढारलेले करता येईल असा आमचा दावा नाही. पण मागासवर्गांच्या मनातील मागासलेपणाच्या भावनेविरूद्ध त्यांच्या मनात संघर्ष पेटविणे हा मागासले पणाच्या विरूद्धच्या लढाईचा महत्वाचा भाग आहे. याबरोबरच सत्ता आणि प्रशासनात वाटा आणि सहभाग मिळवणे हेही महत्वाचे आहे. तरीही जागतिकीकरणाचा रेटा यामुळे सरकार एक एक क्षेत्रातून बाहेर पडत आहे. ही वस्तुस्थिती , आरक्षणाविषयी समाजमनाची होणारी निगेटीव्ह वृत्ती त्यातून बलुतेदार युवकांचे होणारे स्लो पॉइझनिंग आरक्षणारवर डल्ला मारणारे काही मातब्बर अडथळे या सार्‍यातुन बलुतेदार युवकांना निश्चित मार्ग सांगीतले पाहिजेत. गावगाडा होेता तोपर्यंत मानसिकदृष्ट्या का होईना ते समाधान होते. गावगाडा मोडत गेला. उद्योग, कारखाने शहरीकरण आणि आताचे झपाट्याने येणारे जातिकिकरण हे बलुतेदारांच्या कौशल्याला अकुशल बनऊन आजच्या जगत ते असंघटीत कामगार बनत आहेत. कामधंद्यासाठी होणारे बळजबळीचे स्थलांतर  (Forced migretion) ना सामाजिक सुरक्षेचे कवच ना हाताशी कायदे कानुन. पुरेसा मोबदलाही  नाही. यातुन काहीजन असामाजिक कृत्त्यांत ढकलेले जाण्याचीही भिती. हे देशाच्या दृष्टीने वाईटच आहे.

    बलुतेदारांच्या विशेषत: युवकांच्या दृष्टीने सर्वबाजूंनी समस्या आणि अडचणींचे काटे दिसत असले तरी, बलुतेदार ओबीसी समाजकार्यकत्यार्ंंची एक जबाबदारी आहे बलुतेदार युवकांना, मुलांना व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने आणि अर्थार्जनाचच्या दृष्टीने काही कौशल्याची माहिती पुरवण्याची सरकारने कौशल्यविकास महामंडळ आणि त्यासबंधी अनेक उपक्रम जाहीर केले आहेत. माहिती तंत्रज्ञान अक्षरशा: धोधो वहात आहे. अनेक योजना, पुस्तके व साहित्य ढिगाने उपलब्ध होत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून एका क्लिकने ज्ञानभंडार खुले होत आहे. त्यामुळे याविषयी गरजूंना आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देणे (जे अजीवन अध्ययनात (श्रळषशश्रेपस ङशरीळपस) अपेक्षित आहे.) गरजेचे आहे. प्रश्न वाढताहेत परिस्थिती कठीण होत आहे. तशाच संधी पण आधिकाधिक निर्माण होत आहेत. परिणामी कार्यकर्त्यांपुढची आव्हानेही वाढताहेत जुन्या पुर्वीच्या गावगाड्यात समाजासाठी गावासाठी बलुतेदारांनी ओबीसींनी जीव धेाक्यात घालून, अनेक आव्हने झेलली. आज स्वत:साठी पुढच्या पिढीसाठी आव्हने पेलण्यासाठी तयार होणे  शक्य नाही का ?

संदर्भ :-

1) Marc Galauter (october, 1978) Who are the othere Backword classes an Introdnction to a countitional purrel in Economic & ploltical welly, sameelsh Trust publication p. 1812

2) सतिश शिारसाठ (सप्टेंबर 1999) साप्ताहिक विचारधारा मधील लेख ओबीसी आणि डॉ. आंबेडकर पुणे पृ. 62 -63 

3) Akalank Publication’s, reservetions for Backword classes, mandol commmission report of the  backword classes commision, 1980, p 10

4) Johnson Harry M. (1991) referencing Group in sociology a systematic Introdution New delhi allied publishers LTD p.39 

5) C.N. shouker Rao (2004) some aspeets of socal mobility in sociology of Indian society, New Delhi, S. Chand & co. LTD. P 234

6) M.N. Shrinivas (1995) Expressions of caste mobility in social change in modern India, New Delhi orient Longmay Ltd p. 98

7) भाई वैद्य, मंडल आयोग आणि अन्य मागासवर्गासाठी विशेष संधी, जनता पार्टी प्रकाशन, पृ. क्र. 14



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209