ज्यांच्याकडे जमीन आहेत त्यांनीच आपल्या नात्यातील, गोत्यातील रक्तातील बांधवांचे रक्त ढोसले आहे. त्यांचा विकास करता करता त्यांनाच भकास केले आहे. राजकीय, सहकार, शैक्षणिक सत्ता स्थाने याच मराठा समाजाने ताब्यात ठेवलीत. परंतु पिड्यान पिड्या चिरडलेल्या इतर मागास समाजाला कुठे आरक्षण दिसताच, बा्रह्मणी प्रणालीने सर्व प्रकारचा विकास गोठवण्याचा प्रमाणिक प्रयत्न तर केला उलट आपण सर्व हिंदू ही हाक देऊन हिंदू - मुसलीम लढाई सुरू ठेऊन ब्राह्मणांच्या रक्षणासाठी ओबीसींचे प्रसंगी रक्त ही सांडवले. त्यांचे संसार उध्वस्त ही केले. त्यांच्या तावडीतून थोडे फार कायदेशीर राहिले ते सुद्धा सुखात उपभोगणार्या ओबीसींना मिळु नये याचा चंग बांधुन वावरणारे काही मराठा दिसतात तेंव्हा त्यांना सवाल करणे हा या देशाच्या राज्य घटनेचा अभिमान आहे.
मुसलिम किंवा हिंदू अतिरेक्यांचे पिक आज फोफावत आहे. हे अतिरेकी म्हणजे यांना या देशाची घटनाच अमान्य आहे. त्यांना भविष्यात ही उरलेली लोकशाही सुद्धा भविष्यात संपुष्टात अणावयाची आहे. जसे अतिरेकी आहेत. त्याच पद्धतीने फुले, शाहु, अंबेडकराचे नाव घेऊन राज्य कारभार चालवणार्या मंडळींनी ओबीसींच्या रक्ताचे सोशन केले आहे. ब्राह्मण शाहीच्या विरोधात लढाई करण्यासाठी त्यांना खरा ओबीसी पाहिजे. दुसर्या बाजुस फुले, शाहु, आंबेडकरांचे विद्रोह मांडून भारत मुक्त करण्याची निती सांगणारे जर खर्या ओबीसींना पायदळी तुडवत असतील तर ? मराठा समाजातील मंडळींची दादागीरी ही प्रतिष्ठीत बनत असेल तर खरा ओबीसी संघर्षाला सामोरी ही जाईल. खरा ओबीसी या महाराष्ट्रात जेंव्हा जेंव्हा उभा राहिला तेंव्हा या देशातील ब्राह्मणशाही, मराठा शाही (राजकर्ते जमात) संपवली आहे. उदा. संत नामदेव, संत तुकाराम, महात्मा फुले यांचा संघर्ष हा पहावा. अणि उद्याचा हा संघर्ष पेलण्यास ओबीसी खंबीर उभा असेल हा ओबीसींचा इतिहास आहे.
:- मोहन देशमाने, संपादन
जय ज्योती, जय शाहु, जय भिम.