Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

भारतातील जाती त्यांची घडण, उत्पत्ती आणि प्रसार

लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

     तुमच्यासाठी इतर कोणत्याही बाबीपेक्षा लक्षात ठेवण्याजोगी महत्वाची बाब म्हणजे स्वगटांतील वधूवराशी लग्न करण्याची रूढी भारतीय परंपरेहन भिन्न आहे, ही होय. भारतातील अनेक गोत्रांचे लोक गोत्रबाह्य विवाहाची रुढी पाळतात व पाळत आलेले आहेत. इतकेच नव्हे तर सख्यत्वाची भावना बाळगणारे भारतातील अनेक लोकही स्वत:च्या गटाबाहेरील वधू वा वराशी लग्न करतात. भारतीय लोकात गटबाह्य विवाह (गोत्रबाह्य विवाह) हा एक संप्रदाय आहे असे म्हटल्यास मळीच अतिशयोक्ती होणार नाही. जात्यंतर्गत विवाहाची रुढी * भारतात प्रचलित असली तरीही सगोत्रबाह्य विवाहाची रूढी मोडण्याचे कोण ही धाडस करू शकत नाही तिचे पालन कठोरपणे करण्यात येते. इतकेच नव्हे तर जात्यंतर्गत विवाहाची रूढो मोडणान्यापेक्षा सगोत्रबाह्य विवाहाची रूढी मोडणाऱ्याला दंडही अधिक कठोर देण्यात येतो, तुम्हाला सहजपणे दिसून येईल की सगोत्रबाह्य विवाह (एका अर्थाने गटबाहय विवाह) ही एक परस्परात मिसळून जाण्याची प्रक्रिया असल्याने जेथे सगोत्रबाह्य विवाहाची रूढी असते तेथे जाती असू शकत नाहीत परंतु येथे तर जाती आहेत ! याचे अधिक मूलभूत पृथःकरण केल्यास परिणामतः असे दिसून येते की स्वगटांतर्गत विवाह पद्धतीचा गटबाह्य विवाह पद्धतीवर वरचष्मा झाल्यामुळेच निदान भारतात तरी जातींची निर्मिती झाली आहे. तथापि मूलतः गटबाह्य विवाह करणाऱ्या  समाजामध्ये गटांतत विवाह करण्याची रूढी कशी कार्यरत झाली ( म्हणजेच जाती कशा निर्माण झाल्या ) हा एक गंभीर प्रश्न आहे, आणि गटबाह्य विवाह पद्धतीच्या रूढीचा विरोध पचवून स्वगटात विवाह करण्याची प्रथा कोणत्या साधनांनी टिकवन ठेवण्यात आली हे जर आपण समजू शकलो तर आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.

B. R. Ambedkar Book Bhartatil Jati Tyanchi Ghadan Utpatti Aani Prasar      अशा तऱ्हेने  गटांतर्गत विवाह करणाऱ्या रुढीने स्वगटाबाहेर लग्न करण्याच्या रुढीवर मिळविलेला विजय म्हणजेच जातीची निर्मिती होय . परंतु हे समजून घेणे फारसे सोपे नाही. यासाठी जातीमध्ये स्वत:चे रूपांतर करून घेऊ इच्छिणान्या एका काल्पनिक लोकसमूहाचे उदाहरण घेऊन त्याला त्या समूहांतर्गत विवाह करणाऱ्या गटाचे (जातीचे) रूप प्राप्त होण्यासाठी वापराव्या लागणाऱ्या साधनांचे पृथःकरण करून पाहू या. एखाद्या लोकसमूहात आधीपासूनच गटबाह्य विवाह पद्धती रूढ असेल तर या गटाला जातीचे रूप प्राप्त होण्यास आवश्यक असलेली बाब म्हणजे हा नियम रद्द करून त्याला केवळ गटांतर्गतच विवाह केला पाहिजे हा नियम जारी करावा लागेल. परंतु 'आपल्‍या गटाबाहेरच्या लोकांशी लग्न करू नका' असे केवळ फर्मान काढून हे काम होण्यासारखे नाही. परस्परांच्या सान्निध्यात राहणाऱ्या लोकसमूहांमध्ये परस्परात मिसळन जाण्याची व अशा तऱ्हेने एकात्म समाज निर्माण करण्याची सहजप्रवृत्ती असते. या प्रवृत्तीला जर जातीच्या निर्मितीसाठी पायबंद घालावयाचा असेल तर लोकांना ओलांडता येणार नाही अशा तऱ्हेची मर्यादा घालावी लागते व गटाबाहेर लग्नविषयक व्यवहार होऊ नयेत याची काळजी घ्यावी लागते.

     तथापि बाहेरच्या लोकांशी विवाह करू नयेत अशी मर्यादा घातली तर गटांतर्गतही काही सहजगत्या न सुटण्यासारख्या कठीण समस्या निर्माण होतात. ढोबळ मानाने पाहता, कोणत्याही सामान्य लोकसमूहामध्ये स्त्री पुरुषाची विभागणी साधारणतः सम प्रमाणात असते; आणि सारख्या वयोगटांच्या स्त्रीपुरुषांची संख्याही ढोबळ मानाने सारखीच असते. तथापि समाज जीवनात अनुरूपतेच्या बाबतीत लोकांच्या पती किंवा पत्नी विषयक अपेक्षा बहुधा कधीच पूर्ण होत नाहीत. अशी स्थिती असनही जातीमध्ये परिवर्तित होऊ इच्छिणाऱ्या लोकसमूहाला मात्र स्त्रीपुरुषांच्या संख्येत समानता राखणे हे अंतिम ध्येयाइतकेच महत्वाचे असते. कारण त्याशिवाय गटांतर्गत विवाह पद्धती फार काळ चालू शकत नाही. हेच दुसऱ्या शब्दात सांगयचे म्हणजे गटांतर्गत लग्नपध्दती टिकवून ठेवायची असेल तर लोकांचा लग्नविषयक हक्क गटातल्या गटात पूर्ण करता आला पाहिजे. नाहीतर गटातले लोक स्वतःच्या गरजा हव्या त्या मार्गाने भागविण्यास स्वमुखत्यार होऊन गटाच्या मर्यादा ओलांडणे त्यांना भाग पडेल. म्हणूनच जातीमध्ये रूपांतरित होऊ इच्छिणाऱ्या लोकसमूहाला गटांतर्गतच विवाह विषयक हक्काची पूर्ती व्हावी म्हणून त्या गटामध्ये लग्नायोग्य स्त्रीपुरुषांची संख्या सारखी राहील अशी व्यवस्था करणे अत्यावश्यक होऊन बसते. अशातऱ्हेची समान संख्या सतत राखण्यामुळेच गटातल्या गटात लग्न करण्याची रूढी शाबूत ठेवणे शक्य होते आणि जर का या संख्‍येतील तफावत आटोक्याबाहेर गेली तर ही पद्धती निश्चितपणे मोडून पडल्याशिवाय राहत नाही.

     अशातऱ्हेने पाहता, लग्नायोग्य स्त्रीपुरुषांच्या संख्‍येत पडलेली तफावत भरून काढण्याची समस्या व जातीची समस्या अंतीमतः एकाच स्वरूपात आहेत. निसर्गावर ही जबाबदारी सोपविल्यास पतिपत्नीचा एकाचवेळी मृत्य झाला तरच आवश्यक तो समतोल कायम राहू शकतो. परंतु हा क्वचितच घडणारा योगायोग आहे. पत्नीआधी जर पती मेला तर स्त्रियांच्या संख्‍येत एका स्त्रीची भर पडते व तिची व्यवस्था लावणे भाग पडते. नाही तर जातिबाह्य  विवाह करून ती जात कायद्याचे उल्लंघण करील. याचप्रमाणे पत्नी आधी मेल्यास पुरूषांच्या संख्येत एकाची भर पडते त्याच्या दुःखाशी समरस होऊनही जातीला त्याची व्यवस्था लावणे भाग पडते नाहीतर जातिबाह्य विवाह करून तो जात कायद्याचा भंग करील. अशाततऱ्हेने हा वाढीव पुरूष व ही वाढीव स्त्री यांची व्यवस्था न लावल्यास जातीला ते एक जबरदस्त धोका होऊन बसतात. कारण त्यांना नेमून दिलेल्या मर्यादित गटात योग्य जोडीदार न मिळाल्यामुळे (आणि त्यांना जर तसेच मोकळे सोडले तर त्यांना मिळूच शकणार नाही कारण जर याबाबतीत काहीच नियमन करण्यात आले नाही तर बाकीच्या लोकसंख्‍येत केवळ त्यांचीच गरज भगण्याइतक्या  स्त्री पुरुषांच्या जोड्या राहतोल ) ते जात मर्यादेचे उल्लंघण करून जातीबाह्य विवाह करतील व अशातऱ्हेने जातबाहय संततीच्या निर्मितीला कारणीभूत ठरतील.
     
     आपण गृहीत धरलेला लोकसमूह या वाढीव स्त्रीपुरुषाची विल्हेवाट कशी लावील हे आपण पाहू या. प्रथम आपण वाढीव स्त्रीचा प्रश्न घेऊ. जात्यंतर्गत विवाहाचा नियम जोपासण्यासाठी तिची दोन प्रकारे व्यवस्था लावता येणे शक्य आहे.

     एक : तिला तिच्या मृत पतीच्या चित्तेवर जाळून तिच्यामुळे निर्माण होऊ घातलेल्या प्रश्नातून मुक्त होता येईल. तपापि स्त्री पुरुषांच्या संख्येतील तफावत नष्ट करण्याचा हा एक काहीसा अव्यवहार्य मार्ग आहे. काही प्रसंगी तो यशस्वीही होईल पण काही प्रसंगी होणार नाही. याचा अर्थ असा की या पद्धतीने प्रत्येक वाढीव स्त्रीची अशातऱ्हेने विल्हेवाट लावता येणे शक्य नाही. कारण हा उपाय सोपा असला तरी तो व्यवहारात उतरविणे कठीण आहे. आणि विल्हेवाट न लाालेली अशी वाढीव स्त्री (विधवा) जातीत तशीच राहीली तर तिच्या अस्तित्वामध्ये दुहेरी धोका असतो. ती जातीबाह्य विवाह करून अंतर्गत विवाहाचा नियम तरी मोडेल किंवा जात्यंर्गत  विवाह करून स्पर्धेद्वारे एका उपवर मुलीच्या लग्नविषयक राखीव हक्कावर आक्रमण तरी करील. कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी ती जातीला एक आव्हानच ठरते. म्हणूनच जर तिला तिच्या मृत पतिबरोबर जाळण्यात आले नसेल तर तिची काहीतरी व्यवस्था लावणे अपरिहार्य ठरते.


*Endogamy
 



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209