Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

भारतातील जाती त्यांची घडण, उत्पत्ती आणि प्रसार

लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

     दुसरा उपाय म्हणजे तिच्या उर्वरित जीवनात तिच्यावर वैधव्य लादणे. वस्तुनिष्ठ परिणामाच्या दृष्टीने पाहिले तर जाळून टाकण्याचा उपाय वैधव्य लादण्याच्या उपायापेक्षा अधिक चांगला आहे. विधवेला जाळून टाकण्यामुळे तिच्यामध्ये अंतर्भूत असलेल्या तिन्ही धोक्याचा नायनाट होतो. या जगाचा कायमचा निरोप घेतल्यामुळे अंतर्गत अथवा जातिबाहेर पुनर्विवाह करण्याचा ती प्रश्नच निर्माण करीत नाही. परंतु अनिवार्य वैधव्य अधिक व्यवहार्य असल्यामुळे जाळन टाकण्यापेक्षा अधिक चांगले ठरते. हा उपाय तुलनात्मक दृष्टया मानवी आहे. इतकेच नव्हे तर पुनर्विवाहाच्या धोक्यातूनही जाळण्याच्या उपायाप्रमाणेच या उपायाने सुटका होते. परंतु गटांतील नीतीचे रक्षण करण्यात मात्र ती अपयशी ठरते. वैधव्य जबरदस्तीने लादण्यामुळे ती स्त्री जिवंत राहते आणि कायदेशीर संसार थाटण्याचा तिचा नैसर्गिक हक्क हिरावून घेतल्यामुळे तिचा कल अनैतिक व्यवहाराकडे वाढू लागतो यात शंका नाही. परंतु ही काही फारशी अडचणीत टाकणारी बाब नाही. तिचा मोह कोणालाही होणार नाही अशातऱ्हेची निकृष्ट राहणीची बंधने तिच्यावर लादल्या जाऊ शकतात.

B. R. Ambedkar Book Bhartatil Jati Tyanchi Ghadan Utpatti Aani Prasar      जातीमध्ये रूपांतरित होऊ इच्छिणाऱ्या लोकसमूहाच्या दृष्टीने वाढीव पुरुषाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असून वाढीव स्त्रीच्या प्रश्नापेक्षा अधिक कठीणही आहे. अनादि काळापासून स्त्रीच्या तुलनेत पूरुषाला वरच्या दर्जाचे स्थान लाभलेले आहे. प्रत्येक गटामध्ये त्याची भूमिकः प्रबळ असते आणि स्त्रीच्या तुलनेत त्याला प्रतिष्ठाही जास्त असते. स्त्रीवर परंपरेने चालत आलेल्‍या या वरचष्म्यामुळे पुरुषाच्या इच्छा आकांक्षा नेहमी विचारात घेतल्या जातात. या उलट स्त्री ही नेहमीच धार्मिक, सामाजिक किवा आर्थिक बाबतीत सर्व तऱ्हेच्या अन्यायकारक नियमांना बळी पडत आलेली आहे, परंतु माणसाची भूमिका नियम तयार करायची असल्‍यामुळे तो नियमाच्या पलिकडे असतो. अशी स्थिती असल्यामुळे एखाद्या जातीतील वाढीव स्त्रीवर जी बंधने घातल्या जाऊ शकतात तीच बंधने पुरुषावरही घालून त्याला तुम्ही सारखीच वागणूक देऊ शकत नाही

     मृत पत्नीबरोबर त्याला जाळण्याची कल्पना दोन दृष्टींनी फसवी आहे. एकतर तो केवळ पुरुष असल्यामुळे असे घडू शकत नाही दुसरे म्हणजे जर तसे केले तर जातीतूनः एक घडधाकट व्यक्ती नष्ट होते. यामुळे त्याची व्यवस्था लावण्याचे फक्त दोनच पर्याय उरतात. कारण तो जातीला उपकारक असतो.

     हा पुरुष गटदृष्टीने महत्वाचा असल्यामुळे या दोन्ही उद्देशांची पूर्तता होईल असाच उपाय असला पाहिजे. अशा स्थितीत विधवेप्रमाणंच पुढील काळात विधुर राहण्याचे त्याच्यावरही बंधन घातल्या जाऊ शकते किंवा त्याचे मन वळवल्या जाऊ शकते असे मी म्हणेन. हा उपाय अतिशय कठीण आहे असेही नाही. कारण काही विधुर कसल्याही जबरदस्तीशिवाय स्वत च उरलेल्या आयुष्यात ब्रह्मचर्य व्रताचे पालन करतात किंवा याही पुढे जाऊन भौतिक आनंदाचा त्याग करून संन्यास घेतात. परंतु मनुष्य स्‍वभाव लक्षात घेता हा उपाय यशस्वी होणांची आशा फारच कमी आहे. या उलट, जर हा वाढीव पुरुष जातीच्या व्यवहारा मध्ये सक्रीय भाग घेत राहिला तर त्याच्या मुळे जातीच्या नीतिनिमित्तेला धोका निर्माण होण्याचाच अधिक संभव असतो. दुसचा दृष्टिकोनातूत पाहिले तर ज्यांच्या बाबतीत ब्रह्मचर्याचा उपाय यशस्वी ठरला. तेथे तो सोपा असला तरी जातीच्या भरभराटीच्या दृष्टीने ब्रह्मचर्य फारसे हितकारक ठरत नाही. जर त्‍याने खऱ्याखुऱ्या ब्रह्मचर्याचे पालन केले व संन्यास घेऊन जगाचा त्याग केला तर अंतर्गत विवाहाच्या कायद्याला किंवा जातीच्या नैतिकतेला त्याच्यापासून धोका राहत नाही. कारण तो अलिप्ततेचे जीवन नि:संशयपणे जगत असतो. परंतु तो सन्यस्त ब्रह्मचारी असल्यामुळे जातीला संपन्नावस्था प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने तो मेल्यासारखाच असतो. कोणत्याही जातीला स्पर्धात्मक व जोमदार जीवनासाठी संख्यात्मक दृष्टीने पुरेशी शक्ती नेहमी टिकवून ठेवावीच लागते. परंतु अशी अपेक्षा करणे व सन्यस्त जीवनाचा पुरस्कारही करणे म्हणजे रक्त काढून रक्‍तक्षय दुरुस्त करण्‍याचा प्रयत्न करण्यासारखेच आहे.

     यामुळेच एखाद्या जातीतील वाढीव पुरुषावर ब्रह्मचर्य लादण्याचा प्रयल तात्विक दृष्टीने व व्यावहारिक दृष्टीनेही अपयशी ठरतो. जातीच्या हितासाठीच त्याला गृहस्थवस्थेत ठेवणे भाग पडते. परंतु जातीतल्या जातीत त्याच्यासाठी वधूची व्यवस्था करणे हा एक प्रश्नच असतो. सुरुवातीच्या वेळी हे शक्य नसते. कारण पूर्णतः स्‍वयं मर्यादित असलेल्या जातीमध्ये विवाहयोग्य स्त्री पुरुषांची संख्या समान असल्यामुळे एका पुरुषाने एकाच स्त्रीशी विवाह करावा असा नियम असावाच लागतो आणि कोणालाही दोनदा विवाह करण्याची संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत वाढीव पुरुषाला जातीत जखडून टाकायचे असेल तर त्याला केवळ लग्नायोग्य न झालेल्या वयोगटातील मुलगीच वधु म्‍हणून पुरविली जाऊ शकते. वाढीव पुरुषाच्या बाबतीत निश्चितच हा एक चांगला व शक्य कोटीतील उपाय आहे. या उपायाने त्याला जातीत ठेवता येते. जातीबाहेर लोक जाण्यामुळे जातीची लोकसंख्या कमी होण्याला आळा बसतो आणि जात्यंतर्गत विवाहाचा नियम व जातीची नीतीमत्ता यांचेही रक्षण होते.

     सारांश, स्त्री पुरुषांच्या संख्येतील तफावत अशातऱ्हेने चार उपायांनी सहजपणे नाहीशी केल्या जाऊ शकते.१) विधवेला तिच्या मृत पतीच्या शवा बरोबर जाळन टाकणे, (२) वैधव्य लादणे- जाळून टाकण्याचाच सौम्य पर्याय, (३) विधुरावर ब्रम्हचर्यावस्था लादणे, (४) लग्नायोग्य नसलेल्या अल्पवयीन मुलीशी त्याचे लग्न लावून देणे. मी वर उल्लेख केल्याप्रमाणे जात्यंतर्गत विवाह पद्धतीच्या रक्षणासाठी विधवेला जाळून टाकणे आणि विधुरावर ब्रम्हचर्यावस्था लादणे हे दोन उपाय जातहिताच्या दृष्टीने संशयास्पद असले तरी ती सर्वच साधने म्हणून वापरात असतात. परंतु सैन्याप्रमाणेच साधनेही मुक्तपणे कार्यरत झाली म्हणजे उद्दिष्ट साध्य होते. तर मग या साधनांनी होणारे उद्दिष्ट कोणते ?

     ही साधने अंतर्गत विवाह पद्धतीला शाश्वत रूप प्राप्त करून देतात. आणि आपण जातीच्या ज्या अनेक व्याख्या तपासून पाहिल्या त्याप्रमाणे पाहता, जात आणि अंतर्गत विवाहपद्धती या दोनही गोष्टी एकरूपच आहेत अशातन्हेने या साधनांचे अस्तित्व हे जातीशी निगडित असून जातीत त्यांचा अंतर्भाव असतोच.

     माझ्या मते, जातीव्यवस्थेतील कोणत्याही जातीची सामान्य घडण ही अशी असते. आता या सर्वसामान्य चर्चेकडून भारतीय समाजव्यवस्थेतील जातीकडे वळून त्यांच्या घडणीबद्दल विचार करू या. भारतातील जातिव्यवस्था ही एक अत्यंत जुनी संस्था आहे यात शंका नाही. आणि जे कोणी भूतकाळाची उकल करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या मार्गात अनेक खाचखळगे निर्माण झालेले आहेत, हे मी सांगीतलेच पाहिजे असे नाही. जेथे लिखित स्वरूपाची किंवा विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही तेथे किंवा भारतीय लोकांप्रमाणे हे जग ज्यांना मिथ्या वाटते व त्यामुळे इतिहास लिहिणे म्हणजे मूर्खपणा वाटतो, त्यांच्याबाबतीत तर हे विधान अधिकच बरे ठरते. तथापि बराच काळ नोंद घेण्यात न आली तरी संस्था मात्र टिहुन राहतात. आणि हाडांचे अवशेष ज्याप्रमाणे स्वत:चा इतिहास स्वतःच सांगतात. त्या प्रमाणेच रूढी व परंपरेच्या जोडीने संस्थही स्वतःचा इतिहास स्वतःच सांगतात. हे जर खरे तर, वाढीव पुरुष व वाढीव स्त्रीचा प्रश्न सोडविण्यासाठी हिंदूनी जो निर्णय घेतला तो आपण तपासून पाहिल्यास आपल्या कार्यात बरेच यश येईल.

     हिंदू समाजाचे सर्वसाधारण स्वरूप गुंतागुंतीचे असले तरी वरवर पाहणाऱ्यालाही त्यात तऱ्हेवाईक व स्त्रैण अशा प्रकारच्या तीन रूढी दिसून येतात त्या अशाः

     १) सती किंवा विधवेला मृत पतीच्या चितेवर जाळणे. 

     २) विधवेला पुनर्विवाहाची बंदी घालून तिच्यावर वैधव्याची सक्ती करणे. 

     ३) बाला विवाह (अल्पवयीन मुलीचे लग्न)

     यासोबतच असेही दिसून येते की विधुराच्या बाबतीत त्याने सन्यास घ्‍यावा अशी जोरदार आपेक्षा असते. परंतु काही प्रसंगी मात्र शुध्द हेतूमुळे ही विधुर सन्यास घेतात.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209