Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

अज्ञानाचे बळी 

अज्ञानाचे बळी  -  लेखक -  प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे,  B.A., B.E., M.B.A., L.L.B


साळवी : पण आंबेडकरांनीच तर आपल्या अस्पृश्य बांधवांसाठी काळाराम मंदीराचा सत्याग्रह केला होता. मंदीरात प्रवेश मिळुन देवाच दर्शन व्हावे हाच तर त्यांचा उद्देश्य होता ना ?

Kalaram Mandir Satyagraha मी : बाबासाहेब अस्पृश्य समाजातील लोकांना सांगत की देवाच्या नावाने टाळ पिटणे बंद करा. बाबासाहेब सांगत. ‘अरे ज्या देवाच्या देवळात, तुम्हाला प्रवेश नाही, त्या देवाची पूजा कशाला करता ?’  पणा बाबासाहेबांचे म्हणणे अस्पृश्य समाजाला समजत नव्हते. बाबासाहेबांना माहीत होते की स्पृश्य समाज, अस्पृश्यांना मंदीरात कधीच प्रवेश देणार नाही. त्यामुळे आपल्या अनुयांना जर शब्दाने समजत नसेल तर तस कृतीद्वारे समजून सांगण्यासाठी आंबेडकरांनी काळाराम सत्याग्रह केला. बाासाहेबांनी जेव्हा मंदीराच्या प्रवेशासाठी सत्याग्रह पुकारला तर धार्मीक रूढीने पछाडलेला फार मोठा वर्ग ह्या आंदोलनात सामील झाला. जसे की आजही राम मंदीराचा मुद्दा उचलला की ओबीसी फार मोठ्या संख्येने जमा होतात. त्यावेळेस तीच गत अस्पृश्य समाजाची होती. आंदोलनास धार्मीकतेने हा होईना फार मोठा प्रतिसाद मिळाला. पण बाबासाहेबांना जे अपेक्षित होते तेच झाले सवर्णांना मंदीरात प्रवेश करण्याचा अधिकार नाकरला. हे सर्व अस्पृश्यांच्या समोरच घडत असल्यामुळे, बाबासाहेबांना आता अस्पृश्य वर्गाला वेगळे सांगायची गरज नव्हती. बाबासाहेब त्यावेळेस अस्पृश्य वर्गास म्हणाले, ‘बघा, ज्या धर्माचे तुम्ही अनुयायी आहा; त्याच धर्माच्या मंदीरात प्रवेश करणयाचा साधा अधकारही तुम्हास नाही. ह्या धर्मात तुमचे स्थान दुय्यम आहे.’  ह्यानंतर बाबासाहेबांच्या मानवतावादी आंदोलनाला गती आली. पुढे जाऊन 1937 ला येवल्याच्या परिषदेत बाबासाहेब म्हणाले की, ‘धर्म हा माणसासाठी आहे, माणूस हा धर्मासाठी नाही. मी हिंदूु धर्मात समानता मागणे म्हणजे, दगडावर डोकेच फुटते’  बाबासाहेबांच्या ह्या जहाल घोषणेमुळे हिंदु व्यवस्थेतील काही बुद्धीवादीत परिवर्तन झाले. त्यांनी विचार केला की, ‘हा एवढा माठा वर्ग, जर धर्म परिवर्तीत झाला, तर हिंदु धर्माचे मोठे नुकसान होईल.’  ह्याच्याच प्रतिक्रयेत वि. दा. सावरकरांनी रत्नागिरी येथे अस्पृश्य वर्गाच्या मंदीर प्रवेशाचे आंदोलन चालविले. ब्राम्हणांची कठोरता नष्ट होऊन तेही बहुजन समाजाच्या जवळ येऊ लागले.

साळवी : अमेरिका आणि युरोपमधील राष्ट्रे प्रगत झाली आणि आम्ही मागासलेले राहीलो ह्या मागची कारणे काय ?

मी : अमेरिकेचा जर विचार करतो म्हटंल तर 300 वर्षाआधी अमेरिका मागासलेला होता. मग असे काय झाले की हा देश जगाजगातील सर्वात प्रगत देश झाला. 300 - 400 वर्षाआधीची तीच जमीन, त्याच नद्या, तेच पहाड, तसाच पाऊस, तसाच दोन्ही कडून समुद्र किनारा. मागे काय घडले. की हा देश एवढा प्रगत झाला. फरक पडला तो फक्त विचारांचा. युरोप, इंग्लंडमधुन गेलेल्या लोकांनी तेथे नवविचार प्रस्थापीत केला. टोळ्यांची कल्पना नष्ट होऊन लोकशाहीची कल्पना प्रस्थापीत केली. तिथे राहणार्‍या गोर्‍या लोकांनी तेथील मागासलेल्या काळ्या लोकांच्या प्रगतीसाठी आरक्षणाची तरतूद केले. तेथे आरक्षणाला अफरमेटीव ऑक्शन असे म्हणतात. अमेरीकेचा राष्ट्राध्यक्ष बुश हा जगातला सर्वात शक्तीशाली व्यक्ती समजला जातो. त्यांच्या निर्णयामुळे अफगाणीस्थान आणि इराकमधील सरकारे संपुष्टात आली. पण जेव्हा अमेरिकेच्या मिशीगन राज्यामध्ये, एका शाळेत, काळ्या महीला शिक्षीकेवर तेथील गोर्‍या मुख्याध्यापकाने अन्याय केला, ही गोष्ट तिथल्या, डिफन्स सेक्रेटरी कृष्णवर्णीय कोलीन पॉवेल ह्याला कळली, तेव्हा त्याने सरळ शब्दात. जगातल्या सर्वशक्तीशाली व्यक्तीस धमकावले. ‘मिस्टर बुश आपल्या कारकीर्दीत असा एखाद्या काळ्या महिलेवर अन्याय होत असेल तर ह्या देशाचा सुरक्षा सचिव राहावयास मी एकही क्षण तयार नाही. मी ह्या क्षणीच आपला राजीनामा सादर करतो.’ श्री. बुश ह्यांनी श्री. पॉवेल ह्यांना कसेबसे समजाविले व स्वत: मिशिनगच्या शाळेतील मुख्याध्यापकास बोलले व ताबडतोब त्या काळ्या महिलेवरील अन्यायाचे निवारण करण्यात आले. आमच्याकडे असे होते का ? अनुसुचित जातीवरील लोकांवर जे अत्याचार होतात आणि त्यांच्या सुरक्षेसाठी अ‍ॅट्रॉसीटी अ‍ॅक्ट आहे,त्याबाबत साधी तक्रारार नोंदवायची म्हंटल, तरी अनुसूचीत जातींच्या लोकांना कठीण जात. नुकतेच जज्जर येथे घउलेले हत्याकांड आपणास माहीतीच असेल. ह्या हत्याकांडात गाईची हत्या केल्याच्या कारणावरून गावातील काही दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी अक्षरश:  पाच अनुसूचित जातींच्या लोकांची हत्या केली. हत्या करणार हे ब्राम्हण नव्हते तर जाट गुर्जर व तत्सम ओबीसी जातीतीलच लोक होते. जातीव्यवस्थेमुळे वरच्या जातीतील लोक खालच्या जातीतील लोकांना निम्न व हलके समजतात, ही ब्राम्हणवादी मानसिकता आणि ह्या ब्राम्हणवादी मानसिकतेचे ते अनुसूचित जातीचे लोक बळी ठरले. पण ह्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या हत्याकांडाचे विहीपचे एक नेते माननीय गिरीराज नंदकिशोर ह्यांनी समर्थन करतांना म्हटले की, ‘हमारे धर्म में गौ का स्थान बहोत उंचा है’  मेलेल्या गाईचे कातडे काढून आपले पोट भरणारे हे दलित गाईपेक्षा कनिष्ठच आहेत हा विचार, अशाप्रकारचे नेते समाजात फैलावित असतात. हिंदू महासभेचे अध्यक्ष वि.दा. सावरकर, ज्यांचा हे विहीपवाले आपला नेता म्हणून गौरव करता, त्यांना सावरकरांचे विचार तरी माहीत आहेत का ?  विज्ञाननिष्ठ वि.दा. सावरकर आपल्या, ‘गाय एक उपयुक्त पशु, माता नव्हे’  ह्या निबंधात गाईबद्दल लिहीतात, ‘धार्मीक स्वरुपाचे आजच्या युगात काही लाभ नसुन, उलट भाबडी प्रवृत्ती पसरविण्याची हानी मात्र आहे. म्हशीला देवी म्हणून म्हैसमहात्म बनवू कुठे रचलेले नाही. पण म्हणुन म्हशीचे रक्षण केवळ तिच्या लाभासाठी कोणी करीत नाही की काय ?’ 

    ती अमेरिका पहा, आज ते राष्ट्र एका अर्थी गोभक्षक असतानाही, गोरक्षणाचे कामी आमच्याहुन शतपट पुढारलेल आहे. कारण त्या प्रश्नात धार्मीक आंधळेपणाचा गडगडगुंडा न चालु देता निव्वळ आर्थिक व वैज्ञानीक दृष्टीने ती सोडवितात, ‘कोणत्याही गोष्टीस तो धर्म आहे, असे पोथीत सांगीतले आहे म्हणून तसे डोेळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाट्याने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या वैज्ञानीक प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे. एक वेळ राष्ट्रास थोडी गोहत्या झाली तर चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धी हत्या होता कामा नये. यास्तव गाय व बैल हे पशुच आपल्या पुरोगामी देशात तर मनुष्य हितास अत्यंत उपकारकर आहेत, इतकेच सिद्ध करून आणी त्या पशुचा उपयोग आपल्या राष्ट्रास ज्या प्रमाणात नी ज्या प्रकारे त्या पशुची पशु म्हणूनच जोपासना करू म्हणाल तर ते गोरक्षण निर्भेळ राष्ट्राच्या हिताचे होईल. पण त्या हेतुने गाय ही देव आहे.... इत्यादी थापा माराल तर पोथीराज प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे अपकार्य त्यायोगे कराव लागते. त्याचे परिणामी राष्ट्राची शतपटींनी अधिक हानी होईल.’

    आजही आम्ही बघतो आमच्या देशात जेव्हा जेव्हा मंदीर - मस्जिद वाद उठतो; तेव्हा तेव्हा देशातील वातावरण गढूळ होते. देशात तणाव वाढतो, देश पुन्हा एकदा विभाजनावर उभा आहे की काय हा प्रश्न निर्माण होतो ? पण तेच जेव्हा भारताने आणुचाचणी केली होती व देशाचे पंतप्रधान श्री. वाजपेयी ह्यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ हा नारा दिला; तेव्हा सर्व देश एकजुट झाला होता  धर्माच्या नावावर आम्ही विभाजीत होतो; तर विज्ञानाच्या नावाने आम्ही एक होतो.

    मंदिराच्या नावावर आरडाओरडा करणार्‍या सनातनी हिंदुना हे माहीत आहे की, रामाच्या नावाने मागील 5 वर्षापासुन जप केल्यावरही, ह्या देशातील 85 टक्के हिंदु एक होत नाहीत. हिंदुतील जातीव्यवस्था हा हिंदु धर्मीयांना एकत्र आणण्याच्या प्रक्रीयेतला सर्वात मोठा खोडा आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत हिंदुतील मागासलेल्या जातींना त्यांच्या स्वत:च विकासाच्या मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो आणि रामाचा मुद्दा त्यांच्यासाठी मागे पडतो.

    ही बाब उच्चजातीय वा सनातनी हिंदुना समजत नाही आसा भाग नाही पण जातीव्यवस्था नष्ट करायचे म्हटले, तर एक येण्याच्या प्रक्रीयेत त्यांना आपले हिंदु व्यवस्थेतील श्रेष्ठत्व त्यागावे लागेल आणि ते करण्याची त्यांची तयारी नाही. जातीव्यवस्थेतील श्रेष्ठत्व हा समाजमान्यतेचाच भाग आहे. त्यांचे समाजातील श्रेष्ठत्व दोन कारणांनी टिकते.

1.    उच्चजातीयांनी स्वत:स श्रेष्ठ समजणे.

2.    कनिष्ठ जातीयांनी उच्चजातीयांना श्रेष्ठ मानणे.

    ह्यातील कारण क्र. 1 जरी बहुजनांच्या हातात नसेल तरी क्र. 2 हे बहुजन समाजाच्या हातात आहे. बहुजनांनी वरिष्ठ जातीतींल लोकांना सनमान फक्त त्यांच्या गुणकर्मानुसारच द्यावा.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209