बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
अतिशय कठिण परिस्थितीत शिवाजी महाराजानी स्वराज्याची निर्मिती केली. आदिलशहा, कुतुबशहा, निजामशहा व औरंगजेब या मोगलांशी जिवाची तमा न बाळगता तमाम मावळ्यांच्या सहकार्याने मोगलांना जेरीस आणले. महाराजास वाटले आपण आता मोगलशाही, कुतुबशाही व आदिलशाहीला नमविले. आपल्या स्वतंत्र राज्याला सर्व शहांनी मान्यता दिली आहे. आपण लोकांचे राजे झालो आहोत. त्यामुळे राजेशाहीचा मुकुट डोक्यावर चढविला पाहीजे म्हणून महाराजानी स्वत:चा राज्यभिषेक करण्याची घोषणा केली. पण आश्चर्य बघा, शिवाजी महाराजाना पाण्यात पाहणार्या भट ब्राम्हणांचा नागी फणा जागृत झाला. त्यानी आपल्या भात्यातील अस्त्र बाहेर काढले. वर्णव्यवस्थेचा दाखला देत शुद्र व्यक्ती राजा बनू शकत नाही असा शास्त्राचा आदेश आहे. शुद्र हा केवळ सेवक असु शकतो. केवळ मालकाची सेवा करणे हाच त्याचा धर्म होय. वर्णव्यवस्थेनुसार शिवाजी महाराज शुद्र होते. मनुस्मृती ने शुद्राचे सर्व हक्क नाकारले होते. त्यामुळे शिवाजी महाराज राजा होऊ शकत नव्हते. मोगलांना सळो की पळो करुन सोडणार्यां शिवाजी महाराजासमोर त्यांचा वर्ण व जात आडवी आली. शिवाजी महाराजाच्या अन्नावर जगणार्या भटांची वर्णश्रेष्ठतेची घमेंड जागृत झाली. शिवाजी महाराजाच्या राज्यभिषेकास पुजारी म्हणून महाराष्ट्रातील भट-ब्राम्हणानी एकही ब्राम्हण मिळू दिला नाही. पण राज्यभिषेक करायचाच ही शिवाजी महाराजाची जिद्द होती. शेवटी काशीवरुन गागाभट्टाला फार मोठी लाच देऊन किल्ले रायगडावर आणण्यात आले.भट ब्राम्हण हे मुसलमान शासकास आपला राजा म्हणुन मिरवत असत. त्याची सेवा करीत असत. एवढेच नव्हे तर आपल्या मुलीचे लग्न सुध्दा ते मुसलमान राज्यकर्त्यासोबत लावून देत, तेव्हा ब्राम्हणांचा धर्म बुडत नव्हता. परंतु हिंदुतील कर्तुत्ववान व्यक्तीला राजा म्हणून स्वीकार करू शकत नव्हते. आज शिवाजी महाराजाचा उदो उदो करणार्या भटब्राम्हणांच्या वंशजांना तेव्हा शिवाजी महाराजाची जात आडवी येत होती.