Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

दगाबाज सुर्याजी पिसाळ नव्हे तर कृष्णाजी भास्कर कुळकर्णी होय.

बहुजनांचे मारेकरी  -  लेखक  बापु म. राऊत   

     कृष्णाजी भास्कर कुळकर्णी हा ब्राम्हण अफझलखानाचा वकील होता. अफझलखानाच्या वधानंतर ह्याच कृष्णाजी भास्कर कुळकर्णीने शिवरायावर चालून येत दोन वार केलेत. पहिला वार महाराजानी अडविला परंतु कुळकुर्णी चा दुसरा प्रहार एवढा भयंकर व प्राणघातक होता की, डोक्यावर पोलादी शिरस्त्राण असतानाही शिवरायाच्या मस्तकाला खोक पडली. शिरस्त्राण नसते तर अफझलखानाचे अपुर्ण कार्य कृष्णाजी भास्कर कुळकर्णीच्या हातुन पुर्ण झाले असते. आजपर्यंत शिवाजी महाराजावर वार करणारा कृष्णाजी भास्कर हा भट ब्राम्हण आहे हे समोर येतच नव्हते. समोर येत होता तो केवळ कृष्णाजी भास्कर. पण तो कोण आहे हे माहीतच पडत नव्हते. शिवाजी महाराजासोबत दगाबाजी व गद्दारी करणारा कृष्णाजी भास्कर हा भट-ब्राम्हण आहे हे बहुजनापासुन जाणुन-बुजून लपवून ठेवण्यात आले आणि दगाबाज व गद्दार म्हणून सुर्याजी पिसाळाला बहुजन समाजासमोर आणले. शिवाजी महाराजासोबत गद्दारी ब्राम्हण कुळकर्त्याने केली पण बदनाम बहुजन मराठा सुर्याजी पिसाळाला केले.

Krishna Bhaskar Kulkarni Vadh by chhatrapati shivaji maharaj     महाराष्ट्राच्या राजकारणात एखादयाने फितुरी केली किवा पक्ष बदलला तर त्यास आधुनिक सुर्याजी पिसाळ म्हटल्या जाते. कांग्रेस मधून फुटून जेव्हा शरद पवार पुलोद मध्ये आले तेव्हा वसंतदादा पाटील व यशवंतराव चव्हाण यानी पवाराना सुर्याजी पिसाळ म्हटले होते. वास्तविक सुर्याजी पिसाळा ऐवजी कृष्णाजी भास्कर कुळकर्णी हा शब्दप्रयोग वापरायला पाहीजे होता. सुर्याजी पिसाळाच्या करतूती मुळे केवळ एक किल्लाच मोगलाच्या हाती लागला परंतु कृष्णाजी कुळकर्णीने केलेल्या तलवारीच्या वाराने शिवाजी महाराजाचाच खात्मा झाला असता. स्वराज्याची प्राणज्योत मालवली असती. आज देशभक्तीचा खोटा देखावा करणार्‍या भटब्राम्हणाचे पूर्वज किती देशद्रोही होते हे सिध्द होते. परंतु त्याना इतिहासापासून लपविण्यात आले. मराठ्यांच्या धडावर ब्राम्हणाचे डोके असल्यामुळे ब्राम्हण जसे सांगतात, लिहतात त्याची बहुजन मराठे चिकित्सा न करता चपचाप ऐकतात व विश्वास ठेवतात. अफझलखानाच्या ब्राम्हण कुळकर्णी वकीलाने शिवाजी महाराजावर वार केला परंतु महाराजाचा ब्राम्हण वकील पंताजी गोपीनाथ बोकील याने अफझलखानाचा व कृष्णाजी कुळकर्णीचा वार अडविला नाही. यावरुन एकूणच ब्राम्हण शिवाजी महाराजाविरुध्द किती कारस्थान करीत होते हे स्पष्ट होते.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209