बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
परशुराम हा आर्य-ब्राम्हणाच्या अवतार संकल्पनेतील सहावा अवतार होय. परशुरामाने या पृथ्वीतलावरील सर्व क्षत्रीयांची 21 वेळा कत्तल केली असे आर्य ब्राम्हणानी आपल्या ग्रंथात नमुद केले आहे.परशुरामाने पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली. हे विधानच हास्यास्पद आहे. कारण परशुरामाने मारलेली माणसे परत परत जिवंत कशी झाली?. तसेच 20 वेळा मरुन परत जिवंत झालेली माणसे 21 व्या वेळेस एकदमच कसी काय खलास झाली ? 21 वेळा क्षत्रियांना यमसदनी पाठविणार्या परशुरामाचे (दु)र्गुण बघा. हा रेणुका व जमदग्नी यांचा मुलगा. परशुरामाने आपल्या जन्मदात्या आईचा व आपल्या सख्ख्या भावांचा खून केला. भविष्यात पुन्हा क्षत्रिय जन्मास येऊ नये म्हणून गर्भवती महीला व लहान मुलांचा शोध घेऊन कत्तल केली. अशा या महापातकी परशुरामाला की ज्याने बहुजनाच्या आयाना, बहिणींना, गर्भवतींना व स्वत:च्या आईला ठार मारले त्या खुन्याला आर्य ब्राम्हणांने विष्णुचा अवतार बनविले. वैदिक आर्य बहुजन समाजासमोर कसा आदर्श ठेवतात ? परंतु बहुजन समाजाचे अज्ञान बघा. ज्या परशुरामाने त्यांच्या पुर्वजांचा खून केला. त्याच परशुरामाला डोक्यावर घेऊन नाचतात. त्याच्या नावाने मंदिरे बांधतात व त्याच्या जयंत्या साजर्या करतात. त्याच्या साठी उपासतापास व व्रत करतात हे गुलामीचे द्योतकच नव्हे काय ? ही गुलामी बहुजन समाज कधी झुगारणार ?