बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजाच्या कार्यकाळातील संत होत. रामदास स्वामी हे त्यांचे समकालीन होते. परंतु तुकाराम महाराजाचा पिंड हा समाजसुधारकीचा होता. त्यामुळे आपला व्यवसाय सांभाळून ते समाज प्रबोधन करीत असत. शिक्षणाचा हक्क नाकारला गेला असतानाही समाज जागृतीचे काम ते करीत असत. बहुजनांची लुबाडणूक करण्यासाठी सनातनी ब्राम्हणांनी रुढ केलेल्या अनेक अंधश्रध्देवर तुकाराम महाराजाने हल्ला चढविला. तुकाराम महाराज चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर तुटून पडत.आपल्या अभंगाद्वारे समाजात असलेली विषमतेची दरी कमी करण्याचा प्रयत्न महाराजानी केला. त्यांच्या उपदेशामुळे बहुजन समाजात बंधुभावाचा सलोखा वाढला. देवाचा पगडा बहुजनांच्या डोक्यातून जाणार नाही हे तुकाराम महाराज जाणून होते. म्हणून त्यानी देवाची दलालगिरी करणार्या भटब्राम्हणाकडे आपला मोर्चा वळविला. ढोंगी साधु व मठपतीचा खरपुस समाचार घेतला. तुकाराम महाराज म्हणतात
मुखे सांगे ब्रम्हज्ञान ! जन लोकांची कापीतो मान !
कथा करीती देवाची ! अंतरी आशा बहुलोभाची !
तुका म्हणे तोची वेडा ! त्याचे हाणुनी थोबाड फोडा !
तुकाराम महाराजाची बदनामी करण्यासाठी कारस्थानी लोकानी त्यांच्याकडे वेश्या पाठविल्या होत्या. त्या वेशांचा तुकाराम महाराजानी आदर केला व त्यांना उद्देशून महाराज म्हणाले,
पराचिया नारी रखुमाई समान ! हे गेले नेमुन ठायीये ची !
जाई वो तु माते न करी सायास! आम्ही विष्णुदास नव्हो तैसे !
यावरुन तुकाराम महाराज स्त्रियांचा किती आदर करीत तर भटब्राम्हण कसा दुरुपयोग करीत हे स्पष्ट होते. तुकाराम महाराजाच्या मानवतेच्या शिकवणूकीमुळे बहुजन समाज भटाब्राम्हणाच्या दांभीकपणाला बळी पडत नव्हता. त्यामुळे फुकटखाऊ भटब्राम्हणाचे ऊत्पन्न कमी झाले. त्याना कोणीही मान व सन्मान देत नव्हते. तुकारामाची लोकप्रियता पराकोटिला पोहोचली होती. एक शुद्र आपल्या वर्चस्वाला आव्हान देतो. हे भटाच्या मनाला पटत नव्हते. त्यामुळे तुकाराम महाराजानाच संपविण्याचा बेत आखला. प्रथम तुकाराम महाराजावर आरोप करण्यात आला की तुकाराम महाराज हे शुद्र आहेत. मनुस्मृतीनुसार त्याला शिकण्या वाचण्याचा हक्क नाही.सेवा करीत राहणे हा केवळ शुद्राचा धर्म आहे. परंतु तुकाराम महाराजाने अभंग रचून महापाप केले. त्यामुळे त्याचे ग्रंथच नष्ट केले पाहीजे. मग भटाब्राम्हणानी तुकाराम महाराजाचे अभंगच ईंद्रायणी नदीत बुडवून टाकले. तुकाराम महाराजाचे मुखपाठ असलेल्या अभंगगाथा जेव्हा शिष्यांनी परत लिहल्या तेव्हा महाराजाच्या गाथा पाण्यातुन आपोआपच वर आल्या असा प्रचार ते करु लागले.तुकाराम महाराजाची हत्या मंबाजी व रामेश्वर भट या ब्राम्हणांनी केली व महाराजाच्या खुनाचे आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून स्वर्गातुन पुष्पक विमान आले व तुकाराम महाराज त्यात बसून निघून गेले अशा खोट्या अफवा बहुजन समाजात पसरवून देण्यात आल्या. जर स्वर्ग व पुष्पक विमान असतेच तर सर्वात अगोदर ब्राम्हणानी रामदास स्वामी आदीना अप्सरा सोबत नाचायला पुष्पक विमानात बसवून पाठविले असते.