Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

छ. शाहू महाराजाच्या सामाजिक सुधारणेस विरोध

बहुजनांचे मारेकरी  -  लेखक  बापु म. राऊत  

     महाराजानी बहुजनाच्या हितासाठी अनेक योजना जाहीर केल्या होत्या. महाराजाकडे जेव्हा कोल्हापुर संस्थानची सत्ता हातात आली. तेव्हा त्याना आढळले की, संस्थानामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीच्या नोकर्‍यामध्ये एकही मराठा वा अन्य मागास जातीचा माणूस नाही. सगळीकडे ब्राम्हणच भरलेले आहेत. प्रशासकीय खात्यामध्ये 60 ब्राम्हण तर 11 ईतर जातीचे होते. परंतु ईतरामध्ये केवळ पारशी, प्रभ, इंग्रज व मुस्लिम यांचा समावेश होता. त्यामुळेच त्यानी सामाजीक व आर्थीक परिस्थीतीचा विचार करुन सरकारी नोक-यात 50 टक्के आरक्षण जाहीर केले होते. शाहु महाराजानी आपल्या राज्यात आरक्षण जाहीर करताच अभ्यंकर नावाच्या ब्राम्हण वकीलाने विरोध केला.आपला विरोध दर्शविण्यासाठी ते महाराजाकडे आले व आरक्षणामुळे राज्यकारभारावर वाईट परीणाम होतो असे म्हणु लागले. तेव्हा अभ्यंकरासी काही न बोलता महाराजानी त्याना घोड्याच्या पागेत नेले. नोकराकरवी त्यानी चणे मैदानात पसरविले व पागेतील सर्व घोडे सोडुन दिले. तेव्हा दनकट घोडे सर्वात पुढे झाले व त्यानी सर्व चणे खाऊन टाकले तर दुबळे व अशक्त घोडे मागे राहील्याने त्याना चणे खायला मिळालेच नाही. तेव्हा महाराज म्हणाले की या दुबळ्या घोड्याना चणे खायला का मिळाले नाही ? त्याना चणे खायला मिळावीत म्हणुन काय करायला पाहिजेत ? महाराज म्हणाले आम्ही आरक्षणाची तरतुद करुन मागास लोकाना दणकट बणवायला निघालोत. शुद्रांपासुन तर अस्पृशांपर्यंत सगळंयाना समान वागणूक देत त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्यास महाराजांनी सुरुवात केली. महाराज स्वत: अस्पृशाच्या हॉटेलात जाऊन चहा पित असत. त्यामुळे शुद्र व अस्पृश समाजात जागृतीचे वारे यायला सुरुवात झाली. महाराजाचे हे सामाजिक सुधारणाचे कार्य भट-ब्राम्हणाच्या डोळ्यात खुपत असे. त्यानी शाहू महाराजाच्या सुधारणावर आक्षेप घेतला. महाराजानी बहुजनाचे जिवनमान उंचावण्यासाठी सामाजिक व आर्थिक सुधारणा ह्यासारख्या गोष्टी करु नयेत म्हणून दडपण आणले होते. एवढेच नव्हे तर महाराज शुद्र असल्यामुळे शास्त्रानुसार ब्राम्हणांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा त्याना कसलाही अधिकार नाही असे महाराजाना स्पष्ट बजावले होते.

Chhatrapati Shahu Maharaj     ब्राम्हणांचे पुढारीपण करणार्‍या पण तेल्या-तांबोळ्याचे पुढारी म्हणून बिरुदावली लावून घेणार्‍या बाळ गंगाधर टिळकानी वेद प्रकरणात ब्राम्हणाची बाजू घेतली होती.एवढेच नाही तर ब्रिटिश शासनाकडून कोल्हापूर संस्थान बरखास्त करवून घेईन असी धमकी शाहू महाराजाना दिली होती. हिंदु असलेल्या राजाचे शासन ब्रिटिशांच्या हाताने बरखास्त करण्याची धमकी देणारा हा कसला स्वातंत्र्य प्रेमी ? हा तर सरळ सरळ देशद्रोह होय. ब्राम्हणांचे वर्चस्व असेपर्यंत ठिक आहे पण ब्राम्हणांच्या वर्चस्वाला कोणी नख लावीत असेल तर परकीयांच्या सहकार्याने तुमचा खात्मा करु असा अर्थ निघणारी टिळकाची ही धमकी होती. ब्राम्हण समाज हा क्रांतीकारक होऊच शकत नाही. सामाजिक परीवर्तनाची जिथे चळवळ होते त्या चळवळीला विरोध करायला ब्राम्हण नेहमीच तत्पर असतात हे ऐतिहासिक सत्य आहे.बहुजनांनी सत्तेची सुत्रे हाती घेऊ नये व पेशवाई पुन्हा जिवीत व्हावी हा टिळकाच्या विचाराचा गाभा होता. त्यामुळेच तेल्या तांबोळ्यांना विधानसभेत जाऊन काय नांगर हाकायचा आहे ?. असे तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणविणार्‍या टिळकाचे म्हणने होते.

     ब्राम्हणांनी बहुजन समाजावर आपले वर्चस्व कायम राहावे यासाठी वेगवेगळ्या युक्तया लढविल्या. देवाच्या स्वाधीन सर्व जग आहे व देव मंत्राच्या स्वाधीन आहेत पण सारे मंत्र हे ब्राम्हणाच्या स्वाधीन आहेत म्हणून ब्राम्हण हे माझे स्वत:चे दैवत आहे असे दस्तुर खुद्द परमेश्वरच सांगून गेले. राजापासी पुरोहीत नसेल तर राजाचे क्षात्रतेज कमी होते. पुरोहीतांच्या पाच अवतारात क्रोधाग्नी असतात. पुरोहीताला अलंकारानी, धनाने व ऐषारामाने राहू दिल्याने अग्नी शांत होतात. राज्याला बळकटी येऊन सर्व राज्य ताब्यात राहते. ब्राम्हण हे जमिनी वरचे भुदेव असतात त्यामुळे त्यांचा शाप भंयकर असतो अशा अनेक गोष्टीची भिती शाहु महाराजाना दाखवण्यात येत होती. रक्ताने माखलेल्या हाताची बोटे घराच्या भिंतीवर उमटवून महाराजाना भिती दाखवित असत. शाहू महाराजाच्या पैशावर उड्या मारणार्‍या भट-भिक्षुकानी स्वत:स मोठे समजून शाहू महाराज हे शुद्र आहेत म्हणून वेदमंत्राने कोणताही विधी करण्याचा अधिकार नाही अशी भुमिका भटानी घेतली होती. पेशवाईच्या काळात सातारचे राजे प्रतापसिंग भोसले यांना तर बंदी बनविण्यात आले होते. त्यांच्या शिक्षण घेण्यावर आक्षेप घेण्यात आला होता. जिथे राजाची अशी दुर्दशा तिथे सामान्य जनांचे काय हाल होत असतील याची कल्पनाही न केलेली बरी.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209