Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

बुद्ध आणि कार्ल मार्क्स

बुद्ध आणि कार्ल मार्क्स - लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर 


     भिक्षूना दिलेल्या एका प्रवचनात बुद्धाने सदाचरणाचा नियम आणि दंडशक्तीचा म्हणजे विधीचा नियम यांमध्ये फरक दाखविला होता. भिक्षुसंघाला उद्देशून तो म्हणाला होता.

     २. फार फार वर्षांपूर्वी, हे बंधूंनो, दृढनेमी नावाचा न्यायाने राज्य करणारा राजा, सार्वभौम अधिपती, विजेता, लोकांचा रक्षणकर्ता, राज्य करीत असलेले एक साम्राज्य होते. तो धर्मचक्रप्रवर्तक होता, या समुद्रवेष्टित पृथ्वीला

    या धर्मतत्त्वाचा तिसरा भाग म्हणजे निब्बाणाचा सिद्धांत होय. निब्बणाचा सिद्धांत हा आर्य आष्टांगिक मार्गाच्या अविभाज्य भाग आहे. निब्बाणा शिवाय आर्य आष्टांगिक मार्गाची ओळख पूर्ण होऊ शकत नाही.

     आर्य आष्टांगिक मार्ग ओळखण्याच्या मार्गात कोणत्या अडचणी येतात ते निब्बणाचा सिद्धांत सांगतो. 

Buddha ki Karl Marx Book Written by Dr Babasaheb Ambedkar       या अडचणीपैकी मुख्य अडचणी दहा आहेत. बुद्धाने त्यांना 'दहा आसव' (आश्रव), बंधने अथवा अडथळे असे म्हटले आहे. पहिला अडथळा स्वतःविषयीचा भ्रम हा आहे. जोपर्यंत माणूस हा पूर्णपणे स्वतःपुरता जगत असेल, जोपर्यंत तो स्वतःच्या अंतकरणातील तीव्र इच्छांचे समाधान वरण्याच्या पोकळ कल्पना करून प्रत्येक दिखाऊ वस्तूच्या मागे लागला असेल, तो पर्यंत त्याच्यासाठी कोणताही मार्ग आर्य मार्ग नाही. अमर्याद विश्वाचा तो केवळ एक लहानसा भाग आहे. या वस्तुस्थितीने जेव्हा त्याचे डोळे उघडतील तेव्हाच, त्याचे तात्पुरते व्यक्तित्व ही किती अनित्य गोष्ट आहे, हे तो ओळखू लागेल तेव्हाच, तो सत्याच्या खडतर मार्गावर पाऊल टाकू शकेल.

     दुसरा अडथळा शंका व अनिश्चय (विचिकिच्छा ऊर्फ विचिकित्सा) होय. जेव्हा अस्तित्वाच्या महान गूढविषयी, प्रत्येक व्यक्तित्वाच्या अशाश्वततेविषयी माणसाचे डोळे उघडतील तेव्हा शंका व अनिश्चय यांचा त्यांच्या कृतीवर परिणाम (हल्ला) होणे संभवनीय आहे. करावे की करू नये, नाही तरी माझे सर्व व्यक्तित्व हे क्षणभंगुरच आहे, मग एखादी गोष्ट का करावी वा न करावी, अशा प्रश्नांनी त्याला अनिश्चयी व निष्क्रिय बनविले जाते. परतु जीवनात ते चालणार नाही. गुरूजी शिकवण अनुसरण्यासाठी, सत्य स्वीकारण्यासाठी व लढ्यात उतरण्यासाठी त्याने मनाची तयारी केलीच पाहिजे, नाही तर त्याला याहून अधिक काहीच प्राप्त होणार नाही.

    तिसरा अडथळा संस्कार (धर्मविधी) व व्रतवैकल्पे यांच्या कार्यसिद्धीवर अवलंबून राहणे (सीलब्बतपरामास उर्फ शीलव्रतपरामर्श) हा आहे. माणूस धार्मिक विधीचे स्तोम माजवण्यापासून व कोणत्याही बाह्यकृती, कोणतेही पौरोहित्याचे प्रस्थ व पवित्र व्रतवैकल्पे यांचा त्याला पराक्रमाने किंवा तलवारीने नव्हे, तर सदाचाराने जिंकून तो या पृथ्वीवर सम्राट म्हणून जगला.

     ३. "मग बंधूंनो, अनेक वर्षांनंतर, सहस्रावधी वर्षांनंतर, दृढनेमी राजाने एका माणसाला अशी आज्ञा केली.

    "दिव्यचक्र थोडेसे बुडाले आहे, ते त्याच्या जागेपासून थोडेसे ढळले आहे, असे वाटते; तरी पाहून येऊन मला सांग.

    तेव्हा शेकडो वर्षांनी (दिव्यचक्र) त्याच्या जागेपासून ढळले आहे हे पाहिल्यावर तो माणूस दृढनेमी राजाकडे गेला आणि म्हणाला, 'दव्यचक्र बुडाले आहे व आपल्या जागेपासून ढळले आहे हे महाराज, खरे आहे."

    "बंधूंनो, दृढ़नेमी राजाने त्याच्या ज्येष्ठ राजपुत्राला त्यासाठी बोलवले व म्हटले, "प्रिय मुला, पहा, माझे दिव्यचक्र थोडेसे बुडाले आहे, ते त्याच्या जागेपासून ढळले आहे. मला असे सांगण्यात आले आहे. जर चक परावर्तित करणाऱ्या राजाचे दिव्यचक्र बुडाले अथवा ते त्याच्या जागेपासून ढळले तर राजा फार काळ जगणार नाही. मी माझा पूर्ण मानवी ऐहिक आनंद उपभोगला आहे; आता आध्यात्मिक दिव्य आनंद प्राप्त करण्याची वेळ झाली आहे. प्रिय मुला, ये, समुद्रवेष्टित अशा या पृथ्वीचा ताबा घे. मी दाढीमिशी काढून, मुंडन करून आणि काषायवने परिधान करून घरातून बेघर अवस्थेत जाता आहे."

     “अशा प्रकारे बंधूंनो, दृढनेमी राजाने त्याच्या थोरल्या मुलास रीतसर गादीवर बसवले व नंतर आपली दाढीमिशी काढून मुंडन केले, काषायवस्र परिधान केली व तो घरातून बेघर अवस्थेत गेला. परंतु तो राजसंन्याशी गेल्यानंतर सातव्या दिवशी ते दिव्यचक्र अदृश्य झाले.

     ४. मग एक माणूस राजाकडे आला व त्याला म्हणाला : हे राजा, दिव्यचक्र अदृश्य झाले खरे आहे.

    हे बंधूंनो, मग तो राजा अतिशय भयव्याकुळ झाला 'व' दुःखी झाला आणि मग तो राजसंन्याशाकडे गेला व त्याला म्हणालाः महाराज हे खरे आहे, दिव्यचक्र अदृश्य झाले आहे !

     आणि अभिषिक्त राजाला असे बोलताना पाहून, राजसंन्यशाने त्याला उत्तर दिले, "प्रिय मुला, दिव्यचक्र अदृश्य झाले म्हणून दुःख करू नको किंवा दिव्यचक्र अदृश्य झाले म्हणून व्यस्थित होऊ नको. दिव्यचक्र, हे प्रिय मुला, पित्याकडून वारशाने मिळत नसते. परंतु प्रिय मुला, चक्रप्रवर्तकांच्या आर्यप्रवर्तनाप्रमाणे (जगाचे खरे सम्राट म्हणून त्यांच्यासमोर मांडलेल्या कर्तव्याच्या उदात्त ध्येयानुसार केलेली कृति) खरोखर तू ते प्रवर्तित कर, मग तू जर धर्मचक्र-प्रवर्तक सम्राटाचे आर्य कर्तव्य पार पाडलेस आणि मुख्य वरिष्ठ दालनात शुचिर्भूत होऊ न धर्मप्रवचने चालू ठेवलीस तर बरे होईल: दिव्यचक्र त्याच्या हजारो आऱ्यांसह, धावेसह, मण्यांसह व त्याच्या संपूर्ण भागांसह प्रकट होईल." 

५.  “परंतु पिताजी, चक्रवर्ती सम्राटाची आर्य कर्तव्ये कोणती ?"

     "प्रिय पुत्रा, तू धर्म-ध्वज, धर्म-पताका (धर्मकेतू) असल्यामुळे, धर्माला (सत्य व सदाचाराच्या नियमाला) तू मान देऊन, आदर देऊन व पूज्यभाव दाखवून, त्यास वंदना करून, पवित्र मानून, त्याचा आधार घेऊ न तुझ्या जनतेची, सैन्याची, उमरावांची, दासांची, ब्राह्मणांची व गृहस्थांची, नगरांची व नगरवासियांची, धार्मिक जगताची आणि पशुपक्ष्यांची योग्य काळजी घे व त्यांना संरक्षण दे. तुझ्या राज्यात दुष्कृत्य (अधम्म) घडू नये. तुझ्या राज्यात जे कोणी निर्धन असतील त्यांना धन देण्यात यावे.

     “आणि प्रिय पुत्रा, जेव्हा तुझ्या राज्यातील धर्मजीवी माणसे (श्रमण आणि ब्राह्मण) निष्काळजीपणा सोडून, इंद्रियांना उन्मत्त करण्यापासून विरत आत्मशमन करून, प्रत्येकजण स्वतःचे संरक्षण करून वेळोवेळी तुझ्याकडे येतील आणि चांगले काय व वाईट काय, कशाला गुन्हा म्हणावा व कशाला गुन्हा म्हणू नये, काय करावे व काय करू नये, कोणती कृत्ये दीर्घकाळ अथवा अल्पकाळ दुःखाला कारण ठरतील, यांविषयी प्रश्न विचारतील. तेव्हा त्यांना काय सांगायचे आहे ते तू ऐक. तू त्यांना दुष्कृत्य करण्यापासून परावृत्त कर आणि सत्कृत्य हाती घेण्यास त्यांना आज्ञा कर. प्रिय पुत्रा, जगाच्या सम्राटाचे हे आये कर्तव्य आहे."

     'तसेच होईल' महाराजाने अभिषिक्त राजाला उत्तर दिले व त्याच्या आज्ञेचे पालन करून सम्राटाचे आर्य कर्तव्य पार पाडले. त्याने अशी वर्तणूक केल्यावर पूर्ण चंद्राच्या आनंदोत्सवाच्या वेळी तो जेव्हा स्नात होऊ न उपासना करीत मुख्य श्रेष्ठ दालनात गेला तेव्हा हजारो आरे, धावा, मणी व इतर सर्व भागांसह दिव्यचक्र स्वयं प्रकट झाले. ते पाहिल्यावर राजाच्या मनात आले. "मला असे सांगण्यात आले होते की, अशा प्रसंगी ज्या राजासमोर दिव्यचक्र पूर्णपणे प्रकट होते तो राजा चक्रवर्ती सम्राट बनतो. मी देखील त्याप्रमाणे जगाचा सम्राट बनतो."

६.  "मग बंधुंनो, राजा त्याच्या आसनावरून उठला आणि एका । खांद्यावरील वस्र काढून आपल्या डाव्या हातात त्याने झारी घेतरी आणि उजव्या हाताने दिव्यचक्रावर पाणी शिंपडीत तो म्हणाला, "हे चक्रदेव ! पुढे गोल फिर. हे चक्रदेवा ! पुढे जा व विजय प्राप्त कर !

    “मग बंधूंनो, पूर्व प्रदेशाकडे धर्मचक्र पुढे गोल फिरत गेले व चक्रवर्ती राजा आपले सैन्य. घोडे, रथ, हत्ती व सेवक यांच्यासह याच्या मागोमाग गेला आणि ज्या कोण्या ठिकाणी, बंधूंनो, ते चक्र जेथे शंबले तेथे विजयी श्रेष्ठ योद्धा असलेल्या राजाने त्याच्या चतुरंग सैन्यासह तळ ठोकला. तेव्हा पूर्व प्रदेशातील प्रतिस्पर्धी राजे सार्वभौम राजाकडे आले व म्हणाले, "यावे हे शक्तिशाली राजा, तुझे स्वागत असो ! हे शिक्तिशाली राजा, हे सर्व तुझे आहे. हे शक्तिशाली राजा, आम्हाला धर्मोपदेश दे !"

     तेव्हा सार्वभौम श्रेष्ठ योद्धा असलेला राजा म्हणाला, "तुम्ही कोणत्याही प्राणिमात्राची हत्या करता कामा नये. जे दिले गेले नाही ते तुम्ही घेता कामा नये.

     तुम्ही शारीरिक विषयवासना चुकीच्या मार्गाने भागवता कामा नये. तुम्ही खोटे बोलता कामा नये. तुम्ही कसलेच मादक पेय प्राशन करता कामा नये. तुम्ही तुमच्या मालमत्तेचा तुमच्या इच्छेप्रमाणे उपभोग घ्या." 

७.   मग बंधूंनो दिव्यचक्र पूर्व समुद्रात बुडाले व पुन्हा बाहेर आले व दक्षिण प्रदेशाकडे गोल फिरते गेले.... (आणि पूर्वेला घडले त्याप्रमाणे तेथेही सर्व काही घडले.) आणि अशाच पद्धतीने दिव्यचक्र समुद्रात बुडाले व पुन्हा बाहेर आले आणि पश्चिम प्रदेशाकडे गोल फिरत गेले... आणि उत्तरेकडील प्रदेशाकडे गोल फिरत गेलेआणि तेथेदेखील दक्षिणेत व पश्चिम घडले तसेच घडले. 
 
     मग दिव्यचक्र जेव्हा समुद्रसीमा असलेल्या संपूर्ण जगावर विजय मिळवीत पुढे गेले तेव्हा ते राजधानीत परत आले व उभे राहिले, असे की कोणाला ते (न्यायदानाच्या सभागृहापुढे जगाचा सम्राट असलेल्या चक्रवर्ती राजाच्या आतील वाड्याच्या तोंडाशी आपल्या दीप्तीने प्रकाश देत स्थिर केले आहे) असे वाटावे.
 
८.     व बंधूंनो, चक्रवर्ती सम्राट असलेल्या, विजयी श्रेष्ठ योद्धा असलेल्या दुसऱ्या राजाने--- आणि तिसऱ्या--- आणि चौथ्या---- आणि पाचव्या-- आणि सहाव्या--- आणि सातव्या राजानेदेखील अनेक वर्षानंतर, शेकडो, वर्षानंतर, हजारो वर्षानंतर माणसाला अशी आज्ञा केली; "तू जर दिव्यचक्र बुडाले आहे, त्याचे जागेपासून ढळले आहे असे पाहिलेस तर मला कळव.

     "महाराज, तसेच करीन. "त्या माणसाने उत्तर दिले.

    अशा प्रकारे अनेक वर्षांनी, शेकडो वर्षांनी त्या माणसाने पाहिले की दिव्यचक्र बुडाले आहे. त्याच्या जागेपासून ढळले आहे आणि असे पाहिल्यावर विजेता श्रेष्ठ योद्धा असलेल्या राजाकडे तो गेला व तसे त्याने राजाला सांगितले.

    मग (त्या दढनेमी राजाने जे केले) तेच त्या राजाने केले. आणि सातव्या दिवशी राज्यसंन्याशी पुढे निघून गेल्यावर ते दिव्यचक्र पुन्हा अदृश्य झाले.

     मग एका माणसाने राजाकडे जाऊन त्याला तसे सांगितले. तेव्हा दिव्यचक्र अदृश्य झाल्याने राजा चिंताक्रांत झाला व दुःखाने व्यथित झाला. परंतु सम्राट श्रेष्ठ योद्धायाच्या आर्य कर्तव्यासंबंधात त्याने संन्याशी राजाला विचारले नाही. परंतु खरोखर त्याने त्याच्या जनतेवर मनमानीपणाने राज्य केले; आणि अशा प्रकारे त्यांच्यावर जसे राज्य करण्यात आले होते त्याहून वेगळ्या प्रकारे त्यांच्यावर राज्य करण्यात आले, त्यामुळे ज्यांनी सम्राट राजाचे आर्य कर्तव्य पार पाडले होते अशा आधीच्या राजांच्या आधिपत्याखाली जशी त्यांची भरभराट झाली होती तशी त्यांची भरभराट झाली नाही.

     मग बंधूंनो, मंत्री व सरदार, खनिजदार, रक्षक व द्वारपाल, तसेच साधुवृत्तीने जगणारे लोक राजाकडे आले व त्याला म्हणाले :

    "हे राजा, आधीचे राजे कर्तव्य पार पाडत असताना तुझ्या जनतेवर ज्या पद्धतीने राज्य करीत त्याहून वेगळ्या पद्धतीने तू मनमानीपणाने त्यांच्यावर राज्य करीत असल्याने जनतेची भरभराट होत नाही, सम्राट राजाच्या आर्य कर्तव्याने ज्ञान असलेले मंत्री व सरदार, खनिजदार, रक्षक व द्वारपाल आणि साधुवृत्तीने जगणारे आम्ही श्रमण व ब्राह्मण असे दोन्ही प्रकारचे लोक आता तुझ्या राज्यात आहोत. तेव्हा हे राजा ! कर्तव्याबाबत आमचा सल्ला घे; तू असे विचारल्यावर आम्ही ते कर्तव्य तुला सांगू."You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209