Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

बुद्ध आणि कार्ल मार्क्स

बुद्ध आणि कार्ल मार्क्स - लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

साधनांच्या मूल्याविषयी काय ? कोणाची साधने श्रेष्ठ आहेत व चिरकाल टिकणार आहे ? 

     साम्यवाद्यांनी त्यांचे मौल्यवान साध्य प्राप्त करताना इतर मौल्यवान साध्यांचा नाश केला नाही असे ते म्हणू शकतात काय ? त्यांनी खाजगी मालमत्ता नष्ट केली आहे. हे मौल्यवान साध्य असल्याचे गहीत धरून ते प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत साम्यवाद्यांनी इतर मौल्यवान साध्ये नष्ट केलेली नाहीत असे ते म्हणून शकतात काय ? त्यांचे साध्य प्राप्त करण्यासाठी त्यांनी कित्येक लोकाना ठार केले. मानवी जीवनाला कोणतेच मोल नाही काय ? त्यांना मालकाचा प्राण न घेता मालमत्ता घेता येऊ शकली नसती काय ?

    आता हुकूमशाहीचा विचार करूया. क्रांती ही कायमची क्रांती बनविणे हे हुकूमशाहीचे साध्य आहे. हे एक मौल्यवान साध्य आहे. परंतु हे प्राप्त करताना त्यानी इतर मौल्यवान साध्ये नष्ट केली नाहीत असे साम्यवादी म्हण शकतात काय ? स्वतंत्र्यांच्या अभाव अथवा संसदीय शासनाचा अभाव अशी हकूमशाहीची व्याख्या नेहमी करण्यात येते. दोन्ही अर्थ तितकेसे सुस्पष्ट नाहीत. जेथे संसदीय शासन आहे तेथे देखील स्वातंत्र्य नाही. कारण कायद्याचा अर्थ स्वातंत्र्याचा शासन आहे तेथे देखील स्वातंत्र्य नाही. कारण कायद्याचा अर्थ स्वातंत्र्याचा अभाव असाच आहे. येथे हकूमशाही व संसदीय शासन यामध्ये फरक आढळतो. संसदीय शासनसंस्थेत प्रत्येक नागरिकाला शासनाने लादलेल्या निबंधावर टीका करण्याचा हक्क असतो. संसदीय शासनसंस्थेत तुम्हाला कर्तव्य आहे व हक्क आहे, त्यामुळे कायद्याचे पालन करण्याचे कर्तव्य आणि कायद्यावर टीका करण्याचा हक्क आहे. हकूमशाहीत केवळ पालन करणे एवढेच कर्तव्य आहे. परंतु तिच्यावर टीका करण्याचा हक्क नाही.

Buddha ki Karl Marx Book Written by Dr Babasaheb Ambedkar ७. कोणाची साधने अधिक परिणामकारक व टिकावू आहेत ?

    आता आपण कोणती साधने आधिक टिकणारी आहेत याचा विचार करूया. बळाने चालणारे शासन आणि नैतिक भावनेने चालणारे शासन यापैकी कुणा एकाची निवड करावी लागले.

     बर्कने म्हटल्यानुसार, बळ हे कायमस्वरूपी टिकणारे साधन असू शकत नाही. अमेरिकेशी समेट करण्यासंदर्भातील त्याच्या भाषणात त्याने ही धोक्याची सूचना दिली आहे.

    "महाशय, केवळ बळाचा वापर हा तात्पुरता टिकणारा आहे ही गोष्ट सांगण्यास मला परवानगी असावी. तो (वापर) क्षणभर ताब्यात आणील; पण पुन्हा ताब्यात आणण्याची आवश्यकता तो नाहीशी करत नाही आणि अशा प्रकारे जे राष्ट्र कायमचे जिंकलेले असेल त्या राष्ट्रावर शासन चालत नाही."

    "माझा यापुढील आक्षेप त्याच्या अनिश्चितेबाबत आहे. दहशत ही नेहमीच बळाचा परिणाम असते असे नाही व शस्रसज्जता हा विजय असत नाही. तुम्ही जर विजयी झाला नाहीत तर तुम्हाला पर्याय नसेल. कारण, समेट अयशस्वी ठरल्यावर बळाचा वापर करणे एवढाच मार्ग उरतो. परंतु बळाचा वापर अयशस्वी ठरल्यावर त्यापुढे समेटाची कसलीच आशा उरत नाही. सत्ता व अधिकार कधीकधी सदयतेने ठरल्यावर त्यापुढे समेटाची कसलीच आशा उरत नाही. सत्ता व अधिकार कधीकधी सदयतेने मिळतात, परंतु दारूण व पराजित हिंसेकडून त्यांची कधीच भीक मागितली जाऊ शकत नाही.

    "बळाविषयी आणखी एक आक्षेप असा आहे की, आपले साध्य टिकवून ठेवण्याच्या बळजबरीच्या हरेक प्रयत्नामुळे आपण आपले साध्य बिघडवून टाकतो. त्यामुळे आपण ज्या गोष्टीसाठी लढतो नि अपयशी ठरलो ती गोष्ट आपण पुन्हा मिळवू शकलो, तरी ती मूल्य हरवलेली, बुडित, स्पर्धेत वाया गेलेली व वापरलेली असते.”You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209