Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

बुद्ध आणि कार्ल मार्क्स

बुद्ध आणि कार्ल मार्क्स - लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

     ९. मग बंधूंनो, त्या राजाने मंत्र्यांची व इतर बाकी सर्वांची एकत्र परिषद बोलावली व त्यांना सम्राट श्रेष्ठ योद्धयाच्या आर्य कर्तव्याविषयी विचारले व त्यांनी ते त्याला सांगितले. आणि त्याने त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर योग्य देखरेख ठेवण्याची व्यवस्था केली. परंतु निर्धनांना त्याने धन दिले नाही व असे न केल्याकारणाने गरिबी सर्वत्र वाढली.

     गरिबी अशा प्रकारे जेव्हा भरमसाठ वाढली तेव्हा एका माणसाने जे त्याला देण्यात आलेले नव्हते ते घेतले, त्यालाच लोक चोरी म्हणत. त्याला राजाच्या सेवकांनी पकडून राजासमोर आणले व म्हणालेः 'हे राजा, ह्या माणसाने जे त्याला देण्यात आलेले नाही ते घेतले आहे व ती चोरी आहे." त्यावर राजा त्या माणसाला म्हणाला, “काय रे, हे खरे आहे काय? कोणत्याही माणसाने तुला दिलेले नाही ते तू घेतले आहेस. त्यामुळे लोक ज्याला चोरी म्हणतात ती तू केली आहेस?"

Buddha ki Karl Marx Book Written by Dr Babasaheb Ambedkar      "महाराज, हे खरे आहे.” 

     "परंतु का?”

     महाराज, मला जगण्यासाठी कोणतेही साधन नाही ! "तेव्हा राजाने त्या माणसाला धन दिले व म्हटले, “या धनाने त स्वतःचा निर्वाह कर. तसेच तुझ्या मातापित्यांचे व पत्नी-मुलांचे पालनपोषण करून तुझा चरितार्थ चालव.'

१०. मग बंधूंनो, दुसऱ्या एका माणसाने जे त्याला देण्यात आले नव्हते ते चोरी करून घेतले. त्याला त्यांनी पकडले, राजासमोर आणले व राजाला सांगितले.

     आणि राजा (आधीच्या माणसाला जसा म्हणाला व त्याने त्याला जशी वागणूक दिली तसा) याही माणसाला म्हणाला व तशीच वागणूक दिली.

११.  मग बंधूंनो लोकांनी असे ऐकले की, चोरी करून ज्यांनी त्यांना न दिलेले घेतले होते त्यांना राजा धन देत आहे आणि हे ऐकल्यावर त्यांनी असा विचार केला, आपणास जे देण्यात आले नाही ते आपण चोरी करून घ्यावे. मग एका माणसाने तसे केले आणि त्याला राजाच्या सेवकांनी पकडले. त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला. तेव्हा चोरी का केली होती असे राजाने त्याला (अगोदरच्याप्रमाणे) विचारले.

     "कारण, महाराज, मी माझा चरितार्थ चालवू शकत नाही."

     तेव्हा राजाने विचार केलाः मी जर कोणी चोरी करून त्याला न दिलेले घेत असेल अशा कोणालाही धन दिले तर त्यामुळे या गोष्टीला पूर्ण पायबंद घातला पाहिजे व त्याला कठोर शिक्षा दिली पाहिजे, त्याचा शिरच्छेद केला पाहिजे.

     म्हणून त्याने त्याच्या सेवकांना बोलावले व म्हटले, “तर तुम्ही असे करा. या माणसाचे हातपाय मजबूत दोराने पाठीमागून घट्ट बांधा, त्याच्या डोक्याचे मुंडन करा, जोराजोराने नगारे वाजवून त्याला रस्तोरस्ती, गल्लीबोळांतून सर्वत्र फिरवा त्याला दक्षिण दरवाजातून बाहेर काढून, नगराच्या दक्षिण बाजूस न्या व त्याचा कायमचा बंदोबस्त करा. त्याला परमोच्च शिक्षा द्या, त्याचा शिरच्छेद करा.'

     "होय महाराज. तसेच करू." त्या सेवकांनी उत्तर दिले व आज्ञा पार पाडली.

     १२. तेव्हा बंधूंनो, लोकांनी असे ऐकले की, जो कोणी चोरी करून त्यांना न दिलेले घेतात त्यांना अशा प्रकारे मृत्युदंड मिळतो आणि असे ऐकल्यावर त्यांनी विचार केला :

     धारदार तलवारी आपल्याकडे तयार ठेवाव्यात आणि आपणास जे दिले गेले नाही ते आपण ज्यांच्याकडन घेतो-ते त्यास काहीही म्हणतो - त्यांचा आपण शेवट घडवून आणावा, त्यांना परमोच्च शिक्षा द्यावी व त्यांच्या शिरच्छेद करावा.

     आणि त्यांनी धारदार तलवारी घेतल्या व गाव, नगर, जनपदे लुटण्यासाठी व महामार्गावर वाटमारी करण्यासाठी ते पुढे आले आणि मग ज्यांना त्यांनी लुटले त्यांना शिरच्छेद करून संपविले.

१३.  अशा प्रकारे बंधूंनो, निर्धनांना धन देण्यात न आल्यामुळे गरिबी बेसुमार वाढली, गरिबी बेसुमार वाढल्यामुळे चोरी करण्याचे प्रमाण वाढले, चोरी करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हिंसा फोफावली. हिंसा फोफावल्यामुळे प्राणघात ही सामान्य गोष्ट बनली, खुन वारंवार झाल्याने त्या माणसांचा जीवनकाल आणि त्यांचे सौजन्य हे दोन्ही ही संपुष्टात आले.

     मग बंधूंनो, त्यानंतरच्या काळात माणसांमधील काहींनी त्यांना जे दिले गेलेले नाही ते चोरी करून घेतले आणि इतरांप्रमाणे त्यांच्यावर जरी राजासमोर आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना विचारण्यात आले की तुम्ही चोरी केली आहे हे खरे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिली, "नाही महाराज, ते जाणूनबुजून खोटे बोलत आहेत." ..

१४.  अशा प्रकारे निर्धनांना धन देण्यात न आल्यामुळे खोटे बोलणे ही सामान्य गोष्ट होईपर्यंत गरिबी--- चोरी--हिंसा--- खून--- यात बेसुमार वाढ झाली. तसेच एखाद्या माणसाने दुसऱ्या एखाद्या माणसाविषयी चहाडी करतांना, “अशा म्हणत राजाकडे तक्रार केली.

१५.  आणि अशा प्रकारे बंधूंनो, निर्धनांना धन न देण्यात आल्यामुळे गरिबी बेसुमार वाढली--- चोरी--- हिंसा--- खून--- खोटं बोलणे-- चहाडी करणे अमर्याद वाढले.

१६.  खोटे बोलण्यामुळ व्यभिचार वाढला.

१७. अशा प्रकारे निर्धनांना धन देण्यात आल्यामुळे गरिबी--- चोरी---हिंसा--- खून--- खोटे बोलणे--- चडाडी करणे--- अनैतिकता बेसुमार वाढली.

१८.  बंधुंनो, त्यांच्यामध्ये तीन गोष्टी वेगाने वाढल्या. निषिद्ध नात्यांतर्गत व्यभिचार, दुष्ट लोभ व विकृत हाव. मग या गोष्टी वेगाने वाढल्यावर मातापित्यांविषयीचा आदर नष्ट झाला, साधुवृत्तीच्या माणसांविषयी धार्मिक सद्भावना नष्ट झाली, कुलप्रमुखाविषयी अनादर निर्माण झाला.

१९.  बंधूंनो, असा काळ येईल की, तेव्हा त्या लोकांच्या वंशाजांचे आयुर्मान दहा वर्षांचे असेल. या आयुर्मानात माणसांमध्ये कुमारिकांचे विवाहाचे वय पाच वर्षांचे असेल. अशा माणसांमध्ये तूप, लोणी, तिळ, तेल, साखर, मीठ या प्रकारच्या चवी लोप पावतील. दहा अनैतिक वर्तनाने मार्ग अत्याधिक वाढतील अशा मानवप्राण्यांमध्ये नीतीसाठी कोणताही शब्द असणार नाही, नैतिक मार्गदर्शन मिळणे अगदीच दुरापास्त असेल. आज जसा कुटुंबवत्सल मनाच्या माणसांना, धर्माचरण करणाऱ्यांना व जे त्यांच्या कुळाच्या प्रमुख्याला आदर देतात त्यांना आदर दिला जातो व त्यांची प्रशंसा केली जाते, त्याप्रमाणे अशा मानवप्राण्यांमध्ये बंधूंनो, ज्यांच्या मनामध्ये कुटुंबवत्सलतेचा व दयेचा अभाव आहे आणि जे कुलप्रमुखाला कसलाही आदर देत नाहीत त्यांच्या आदर व प्रशंसा करण्यात येईल.

२०. बंधुंनो, अशा मानवप्राण्यांमध्ये, माता किंवा मावशी किंवा मामी किंवा गुरूपत्नी हिच्याशी विवाह करणे निषिद्ध असावे, या प्रकारच्या विचाराची बूज राखली जाणार नाही. शेळ्या-बकांप्रमाणे, कोंबड्याडुकरांप्रमाणे, कोल्ह्या-कुत्र्यांप्रमाणे जगात स्वैचार माजेल.

     अशा मानवप्राण्यांमध्ये बंधूंनो, परस्परात तीव्र शत्रुत्व हा नियम होईल. त्यांच्यात तीव्र दुष्टेच्छा, तीव्र वैरभाव, आईने तिच्या मुलाला, मुलाने त्याच्या पित्याला, भावाने भावाला, भावाने बहिणीला, बहिणीने भावाला ठार मारण्याचे देखील भावनातिरेकी विचार येतील. तसे करताना एखाद्या

     खेळाडूला तसे आपला खेळ पाहून वाटते त्याप्रमाणे त्यांना आनंद वाटेल.

     का जेव्हा नैतिक शक्ती अयशस्वी ठरते व पाशवी शक्ती तिची जागा घेते तेव्हा जे काही घडते त्याचे हे बहधा अत्यंत सुंदर चित्रण आहे. बुद्धाला अपेक्षित होते ते हे की, प्रत्येक माणसाला नैतिकदृष्ट्या असे शिक्षण दयावे की, तो स्वतःच सदाचरणाच्या साम्राज्यासाठी एक सैनिक बनेल.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209