Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

राज्याची शिथिलता किंवा समाप्ति 

बुद्ध आणि कार्ल मार्क्स - लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

८. राज्याची शिथिलता किंवा समाप्ति 

     एक कायमची हुकूमशाही म्हणून राज्याविषयी असलेला साम्यवाद्यांचा सिद्धांत हा त्यांच्या राजकीय तत्त्वाज्ञानातील एक कमकुवत दुवा असल्याचे साम्यवादी स्वतःच मान्य करतात. राज्य' अखेरीस नष्ट होईल, या युक्तिवादाचा ते आश्रय घेतात. त्यामुळे दोन प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. ते केव्हा नष्ट होईल? राज्य नष्ट झाल्यावर त्याच्या जागी काय येईल? पहिल्या प्रश्नाला ते निश्चितच कालावधी देऊ शकत नाही. हकूमशाही अल्प कालावधीसाठी चांगली असेलही आणि लोकशाही सुरक्षित बनविण्यासाठी देखील ती स्वगातार्ह गोष्ट असेलही. पण हकूमशाहीने तिचे कार्य केल्यावर, लोकशाहीच्या मार्गातील सर्व अडथळे व दगडधोंडे दूर केल्यानंतर व लोकशाहीचा मार्ग सुरक्षित बनविल्यानंतर, तिने स्वतः संपुष्टात का येऊ नये? अशोकने उदाहरण घालून दिले नव्हते काय? त्याने कलिंगविरूद्ध हिंसा केली, परंतु त्यानंतर त्याने हिंसेचा पूर्णपणे त्याग केला. आजच्या आपल्या विजेत्यांनी जर त्यांच्या केवळ बळी ठरलेल्यांनाच निःशस न करता स्वतःलाही निःशस्र केले असते तर सर्व जगभर शांतता प्रस्थापित झाली असती. साम्यवाद्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. राज्य नष्ट झाल्यानंतर त्याची जागा कोण घेईल, हा प्रश्न राज्य केव्हा नष्ट होईल या प्रश्नापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. तथापि काही केल्या या प्रश्नाला कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यानंतर हकूमशाहीच्या जागी अराजक येईल काय? जर तसे असेल तर साम्यवादी राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न निरर्थक आहे. जर ते बळाशिवाय कायम राखता येऊ शकत नसेल आणि साम्यवाद्यांना एकत्र ठेवणारे बळ परत काढून घेतल्यावर जर त्याचे पर्यवसान अराजकात होत असेल तर साम्यवादी राज्य काय कामाचे ?

Buddha ki Karl Marx Book Written by Dr Babasaheb Ambedkar       ही बळ काढून घेतल्यावर ते राज्य कायम राखू शकेल अशी एकमेव गोष्ट म्हणजे धर्म होय. परंतु साम्यवाद्यांना धर्म हा वर्त्य आहे. त्यांचा धर्माविषयीचा द्वेष इतका खोलवर रूजला आहे की, ते कोणते धर्म साम्यवादाला सहाय्यक आहेत आणि कोणते धर्म तसे नाहीत यांमध्ये भेददेखील करायला तयार नाहीत. सामय्वाद्यांनी त्यांचा ख्रिस्ती धर्माविषयीचा द्वेष बौद्ध धर्मालाही लागू केला. त्या दोहोंमधील फरक तपासून पाहण्यासाठी ते थांबले नाहीत. साम्यवाद्यांनी ख्रिस्ती धर्माविरूद्ध केलेला आरोप दुहेरी होता. ख्रिस्ती धर्माविरुद्ध त्यांचा पहिला आरोप हा होता की, त्याने लोकांना परलोकात नेले आणि इहलोकात त्यांना गरिबी भोगायला लावली. या निबंधातील या आधीच्या भागात बौद्धधर्मापासून घेतलेल्या अवतरणांवरून दिसून येऊ शकेल की असा आरोप बौद्ध धर्माविरूद्ध करता येऊ शकत नाही.

    साम्यवाद्यांनी ख्रिस्ती धर्माविरूद्ध केलेला दुसराही आरोप बौद्ध धर्माविरूद्ध करता येऊ शकत नाही. या आरोपाचा सारांश 'धर्म ही लोकांसाठी अफू आहे' या विधानाने देण्यात आला आहे. बायबलमध्ये दिसून येणाऱ्या पर्वतावरील प्रवचनावर हा आरोप आधारलेला आहे. पर्वतावरील प्रवचन गरिबीचे व दुर्बलतेचे उदात्तीकरण करते. ते गरिबांना व दुर्बलांना स्वर्गाचे आश्वासन देते. बुद्धाने आपल्या शिष्यांपैकी अनाथपिंडीक या शिष्याला या विषयावर दिलेले प्रवचन मी पुढे देत आहे.

    एकदा भगवान राहत होते तिथे अनाथपिंडिक आला. आल्यावर त्याने भगवंताला वंदन केले व एका बाजूला बसून बसून विचारले, 'कोणत्या गोष्टी गहस्थाला स्वागतार्ह, आनंदादायी व इष्ट परंतु दुष्यप्राप्य असतात ते भगवंत सांगतील काय ?

    भगवंतांनी त्यांच्यापुढे मांडलेला तो प्रश्न ऐकून घेतल्यावर म्हटले, 'अशा गोष्टीपैकी पहिली गोष्ट, कायदेशीर मार्गाने संपत्ती मिळविणे ही होय.'

    'दुसरी गोष्ट, तुमचे नातेवाईकदेखील त्यांची संपत्ती कायदेशीर मार्गाने मिळवितात का हे पाहणे ही होय.

    तिसरी गोष्ट, दीर्घकाळ जगून वृद्धत्वाला पोहोचणे ही होय. 

    चौथी गोष्ट, सत्य ज्ञानाची प्राप्ती करणे होय.

   खरे तर या गोष्टी प्राप्त करण्यासाठी या जगात ज्या स्वागतार्ह, आनंददायी, इष्ट परंतु मिळविण्यासाठी कठीण आहेत अशा चार शर्तीदेखील त्याआधी येतात. त्या म्हणजे विश्वासाची इष्टसिद्धी, सद्गुणी वर्तनाची इष्टसिद्धी, उदारपणाची इष्टसिद्धी व ज्ञानाची इष्टसिद्धी.


    सद्गुणी वर्तनाची इष्टसिद्धी प्राण घेण्यापासून, चोरी करण्यापासून, व्यभिचारापासून, खोटे बोलण्यापासून व मादक पेय सेवन करण्यापासून अलिप्तं ठेवते.

    जीवनात द्रव्यलोभाच्या कलंकापासून मनाने मुक्त असलेल्या, दानशूर, मुक्तहस्त, दान देण्यात आनंद मानणाऱ्या, ज्याला दान मानावे व जो दानदानास वाहिलेला आहे अशा गृहस्थामध्ये औदार्याची इष्टसिद्धी वसत असते. 

   ज्ञानाच्या इष्टसिद्धीत कशाचा अंतर्भाव होतो? एखादा गृहस्थ असा असेल की त्याच्या मनावर द्रव्यलोभ, हाव, दुष्टइच्छा, आळस, सुस्ती, विचलन व मनःक्षोभ यांनी पगडा बसवलेला असतो. तसेच तो चुकीची कत्ये करत असतो व जी करायला पाहिजेत तिकडे दुर्लक्ष करत असतो व तसे केल्याने ते सुखापासून, मानापासून वंचित झालेला असतो हे तो जाणतो.

    द्रव्यलोभ, लालसा, दुष्टइच्छा, आळस, सुस्ती, विचलन, मनःक्षोभ व संशय हे मनाचे कलंक आहेत. ज्या गृहस्थाची अशा मनाच्या कलंकापासून मुक्तता होते तो महाज्ञान, प्रचंड ज्ञान, स्वच्छ दृष्टी व पूर्ण ज्ञान प्राप्त करतो. 

    अशा प्रकारे मोठ्या उद्योगशीलतेने मिळवलेली, बाहुसामर्थ्याने प्राप्त केलेली व निढळाच्या घामावर मिळविलेली संपत्ती कायदेशीर मार्गाने व न्याय्य मार्गाने संपादन करणे ही मोठी इष्टसिद्धीस आहे. तोच गृहस्थ स्वतःला सुखी व आनंदी बनवितो व पूर्ण समाधानी होतो. तसेच त्याचे आई-वडील, पत्नी, मुले, सेवक व मजूर, मित्र व सोबती यांना देखील सुखी व आनंदी बनवितो व त्यांना देखील पूर्ण समाधान देतो. '

    बळ काढून घेतल्यावर साम्यवाद कायम राखण्यासाठीचा एक अंतिम उपाय म्हणून रशियन लोक बौद्ध धर्माकडे अजिबात लक्ष देत नाहीत असे दिसते.

    रशियन लोकांना त्यांच्या साम्यवादाचा वर्ग आहे. परंतु ते एक गोष्ट विसरतात की, सर्व आश्चर्यातील आश्चर्य म्हणजे बुद्धाने संघामध्ये हुकूमशाहीशिवाय साम्यवाद प्रस्थापित केला. तो अतिशय छोट्या प्रमाणातील साम्यवाद असेलही, परंतु तो हुकूमशाहीशिवाय असलेला साम्यवाद होता व हे आश्चर्य लेनिनलासुद्धा करता आले नाही.

    बुद्धाला मार्ग वेगळा होता. त्याचा मार्ग माणसाचे मन बदलण्याचा, माणसाचा स्वभाव बदलण्याचा होता, जेणेकरून माणूस जे काही करतो ते तो स्वेच्छेने व बळाचा अगर जबरदस्तीचा वापर न करता करील. माणसाचा स्वभाव बदलण्याची त्याची मुख्य साधने त्याचा धम्म व त्याच्या धम्माची अखंड शिकवण ही होती. लोकांना जे करायला आवडत नाही ते त्यांना करायला लावण्यासाठी लोकांवर बळजबरी करणे हा बुद्धाचा मार्ग नव्हता, मग ती कृती त्यांच्या भल्यासाठी का असेना. त्याचा मार्ग लोकांचा स्वभाव बदलण्याचा होता, जेणेकरून त्यांनी जे अन्यथा केले नसते ते स्वेच्छेने करतील.

   रशियातील साम्यवादी हुकूमशाहीने अर्थातच आश्चर्यकारक यश मिळविले आहे, असा दावा करण्यात येतो. हे अर्थातच कोणीही नाकारू शकत नाही. म्हणूनच तर मी म्हणतो की रशियन हकूमशाही सर्व मागास देशांना उपयुक्त ठरेल. परंतु हा कायमच्या हुकूमशाहीसाठी युक्तिवाद नाही. मानवतेला केवळ आर्थिक मूल्यांची आवश्यकता नाही. आध्यात्मिक मूल्ये टिकवून ठेवण्याची देखील तिला आवश्यकता आहे. कायमच्या हुकूमशाहीने आध्यात्मिक मूल्यांकडे लक्ष दिलेले नाही आणि तसे लक्ष देण्याची तिची इच्छा नाही. कार्लाईलने ती चूक केली. कारण माणसाला भौतिक सुखांची गरज असते. परंतु साम्यवादी तत्त्वज्ञानादेखील तितकेच चूक असल्याचे दिसून येते. कारण त्यांच्या तत्त्वज्ञानाचे ध्येय इकरांना धष्टपुष्ट करण्याचेच दिसते. जणू काय माणसांमध्ये व डुकरांमध्ये कसला फरकच नाही. माणसाचा भौतिक त्याचप्रमाणे आध्यात्मिक विकास झाला पाहिजे. ज्याचा सारांश फ्रेंच राज्यक्रांतीने सहभाव, स्वातंत्र्य व समता या तीन शब्दांत दिला आहे. त्या नवीन पायावर समाजाची उभारणी करण्याकडे समाज वाटचाल करीत आहे. या घोषणेमुळे फ्रेंच राज्यक्रांतीचे स्वागत झाले. परंतु समता प्रस्थापित करण्यात ती अपयशी ठरली. आम्ही रशियन क्रांतीचे स्वागत करतो. कारण समता प्रस्थापित करणे हे तिचे ध्येय आहे. परंतु तिला अवास्तव महत्त्व देता येणार नाही. सहभाव वा स्वातंत्र्य याशिवाय समतेला कसलाही अर्थ नाही. बुद्धाचा मार्ग अनुसरला तरच या तिन्ही गोष्टी एकत्र राहू शकतील असे दिसते. साम्यवाद केवळ समता ही एकच गोष्ट देऊ शकतो, (समता, सहभाव व स्वातंत्र्य या) सर्व गोष्टी देऊ शकत नाही.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209