सध्या ओबीसी समाजाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे आणि त्यातुनच अनेक समस्या निर्माण होत आहेत. ओबीसीचा शैक्षणीक व आर्थिक विकास होण्यासाठी ओबीसीच्या सर्व जातींना एकत्र येवुन लढा देण्याची गरज आहे.
बोगस ओबीसी आरक्षण, ओबीसी शिष्यवृत्त्या जात पडताळणी समस्या, उद्योग व्यवसायातील समस्या, राजकीय व सामाजीक समस्या, क्रिमीलेअरची आर्थीक समस्या महागाई वपगार वाढ मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सर्व सामान्य ओबीसी व्यक्तीही क्रिमीलेअर ठरते व ओबीसींच्या सर्व फायद्यापासुन वंचीत रहाते. आणि ओबीसी विद्यार्थ्यांना 27% जागा असुन केवळ क्रिमिलेअर ठरल्यामुळे पात्र असणार्या जागा ओपन करूण इतरांसाठी त्याचा फायदा होतो. शासनाने ओबीसीसाठी देण्यात येणारी 50% फी सवलत वेळेवर मिळत नाही त्यामुळे कमी उत्पन्नाच्या गटातील मुलांचे शिक्षण पुर्ण होत नाही आणि ज्याचे उत्पन्न जास्त आहे. त्याला या जागेचा फायदा होतो आणि त्याचे शिक्षण पुर्ण होते आणि जो खरोखरच ओबीसी असतो ते या सर्व शैक्षणीक सुविधांना मुकतो. खर्या ओबीसींचे फायदे बोगस जातींच्या दाखल्याचे आधार मिळवितात. शासणही अशाच लोकांना साथ देत आहे. खरे ओबीसी या सर्व सुविद्यांपासुन लांबच आहे. सध्या कोणत्याही राज्यकर्त्यांकडुन कसलीच अपेक्षा करणे चुकीचे आहे.
भारतीय संविधानाच्या 340 व्या कलमानुसार सर्व ओबीसींना डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आरक्षण मिळाले आहे. अगोदरच ओबीसींची शैक्षणीक स्थीती अत्यंत मगासलेली असुन त्यांच्या मुळ 27% आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय होईल अणि 340 व्या कलमास काही अर्थ रहाणार नाही. ओबीसी समाजात मोडणार्या सर्व जाती या कष्ट करूण उपजीवीका भागविणार्या आहेत. मोलमजुरी केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळी जेवण मिळत नाही. ओबीसींवर होणार्या अन्याया संदर्भात ते लढू ही शकत नाही व कसल्याच प्रकारचे आंदोलन ते करू शकत नाही. काम नाही तर रोजगार नाही. रोजगार नाही तर पगार नाही पगार नाही तर घरी जेवण नाही. अशा प्रकारची परिस्थिती समाजात पहावयास मिळते.
ओबीसी समाज हा आनेक वेगवेगळ्या जातीमध्ये विखुरला गेलेला आहे. व अनेक भागात विखुरलेला आहे. त्यामुळे त्यांचा संपर्क ही होऊ शकत नाही. हाच फायदा सर्व सत्ताधारी व राज्यकर्ते घेत असुन खर्या असणार्या ओबीसींवर अन्याय होत आहे. कारण खरा ओबीसी लढा देवू शकत नाही त्यांची परिस्थिती हलाखीचीच आहे. अतापर्यंत सर्व ओबीसी समाज राजकारण शिक्षण आणि आर्थीक बाबतीत फारच मागे राहिला आहे. नोकर्यांपासुन वंचीत राहिला आहे. खर्या अस्तीत्वात असणार्या ओबीसी सवलती त्यांना मिळत नाही. व मिळाल्यावरही त्यात बरेच अडथळे निर्माण होतात. महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती राजर्षी शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण सर्वजन विसरलेले आहेत.
मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार 52% ओबीसींना 27% आरक्षण हा कुठला न्याय महाराष्ट्रातील मराठा समाज गेल्या 50 वर्षापासुन सत्ता भोगत आहे. सहकार संस्था, शिक्षण संस्था, साखरकारखाने, दुधसंघ, सामाजीक संस्था, बँका, पतपेढ्या या सर्व ठिकाणी त्यांचेच वर्चस्व आहे आणि बहुसंख्य ओबीसी समाज विकासापासून दुर आहे. व विकासही होत नाही सत्ता आणि पैशाच्या जोरावर अनेकांनी ओबीसींचे खोटे दाखले मिळवले. आणि खर्या ओबीसींच्या सवलतीत वाटेकरी झाले. त्यामुळे खरे ओबीसी सत्तेपासुन आणि शासकीय सवलती पासुन दुर राहिले आहेत त्यासाठी सर्व ओबीसी समाजाने एकत्र येवुन लढा देण्याची गरज आहे. आणि ते जर शक्य नसेल तर आपल्यावर होणारा अन्न्याय सहन करण्याखेरीज पर्याय नाही.
यासाठी आपल्याला ओबीसींची व्होट बँक तयार करणे गरजचे आहे. आणि हे सर्व करायचे असेल तर आपण सर्वांनी जागरूक असायला हवे तरच राजकीय नेते ओबीसी समाजाला किंमत देतील.
1948 पासुन आपले महापुरूष आम्हाला हक्क व अधिकार देण्यासाठी संघर्ष करीत होते. त्यावेळी प्रत्येक गोष्ट आपले लोक इंग्रजांना माणायचे व इंग्रजही द्यायला तयार व्हायचे. आणि युरोशीयन ब्राह्मण मात्र विरोध करायचे विशेष म्हणजे आपल्या महापुरूषांनी युरोशियन ब्राह्मणांना कधीच काही मागीतले नाही. त्यांनी इंग्रजांनाच मागीतले पण विरोध मात्र युरोशियन ब्राह्मणांनी केला. महापुरूषांच्या संघर्षामुळे आणि इंग्रजांच्या सहकार्यमुळे बर्याच गोष्टी पदरात पाडुन घेण्यात आपल्या महापुरूषांना यश आले. त्यातलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संविधान होय. युरोशियन ब्राह्मणांनी विरोध करूणही आपले महापुरूष संविधानातुन हक्क व अधिकार मिळविण्यात यशस्वी झाले. आज भारतात 83 कोटी लोक भुकबळीच्या शिखरावर आहेत. आज भारतात 83 कोटी लोकांचे दरडोई उत्पन्न केवळ 20 रूपये आहे. आज भारतात 27 कोटी लोकांचे दरडोई उत्पन्न 11 रूपये आहे. आज भारतात 24 कोटी लोकांना एकवेळचे जेवण मिळाल तर दुसर्या वेळचे जेवण मिळत नाही.
आज भारतात 21 कोटी लोकांना दोन्ही वेळचे जेवण मिळण्याची शाश्वती नाही. आज भारतात गेल्या दहा वर्षात एक लाख शेतकर्यांनी आत्महात्या केल्या आहेत. आज भारतात 12 कोटी लोक झोपडपट्टीत रहातात. आज भारतात 25 % लोकांना प्यायला शुद्ध पाणी मिळत नाही. आज भारतात 20 लाख लोक भिकारी आहे. आज भारतात 20 लाख महिलांवर अत्याचार झाले आहेत.
इंग्रज देश सोडुन गेले तेंव्हा 18 कोटी लोक दारिद्र रेषेखाली होते. आज भारतात 70 करोड लोक दारिद्रय रंषेखालील जीवण जगत आहे. इंग्रज देश सोडुन गेले तेव्हा 18 % लोक निरक्षर होते पण आज स्वतंत्र्य भारतात 60 % च्या वर लोकनिरक्षर आहेत.
आपल्या मुलनिवासी महापुरूषांनी या सर्व 6000 जातींना जागृत करूण जोडण्याचा, संघटीत करण्याचा, त्यांचा एकसंघ समाज बनविण्याचा त्यांच्यात न्याय - स्वातंत्र्य- समता बंधुभाव ही मुल्ये रूजविण्याचा जीवनभर प्रेयत्न केला. त्यासाठी त्यांना खुप त्रास सहन करावा लागला.