प्रत्येक जात दुसर्याला कट्टर शत्रुु मानते जाती जातीत आपसत अविश्वास आहे. दुरावा आहे. एकमेकांत भरपुर गैरसमज आहेत.एकमेकांबद्दल प्रचंड घृणा आहे. एकमेकांचा भरपुर द्वेष व तिरसकार करतात. एकमेकांना उच्चनीच मानतात. खालच्या जाती वरच्या जातींचा द्वेश करतात तर वरच्या जाती खालच्या जातीचा तिरस्कार करतात. प्रत्येक जात आपल्या खाली कोणीतरी आहे यात समाधान मानते, आनंद मानते. खालच्या जातीच्या बाता सहन होत नाहीत परंतु वरच्या जातींच्या लाथा आनंदाने खातो. ही दरिद्री आणी लाचार मानसिकता निर्मण झाली आहे. नव्हे युरोशियन ब्राह्मणांनी ती जाणीवपुर्वक, मुद्दाम निर्माण केली आहे. कारण उद्देश एकच की यांना एकत्र येवू द्यायचे नाही.
आपल्या मुलनिवासी महापरूषांनी या सर्व 500 जातींना जागृत करूण जोडण्याचा, संघटीत करण्याचा, त्यांचा एकसंघ समाज बनविण्याचा - त्यांच्यात न्याय - स्वातंत्र्य - समता बंधुभाव ही मुल्ये रजविण्याचा जीवणभर प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना खुप त्रास सहन करावा लागला. अपमान, मानखंडना, आत्मवंचना सहन करावी लागली युरेशियन ब्राह्मणांनी त्यांच्यावर मारेकरी घातले. त्यांची हत्या करण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या विचार धारणेत मिलावट भेसळ केली. तथागत सिद्धाथ गौतम बुद्धाने येथील मुलनिवासींना बहुजन या नावाने जोडण्याचा प्रयत्न केला. सर्व मुलनिवासींना बहुजन या नावाने जोडण्याचा प्रयत्न केला। सर्व मुलनिवासी संतानी येथील मुलनिवासींना वारकरी या नावाने जोडण्याचा प्रयत्न केला. कुळवाडी भुषण बुहुजन प्रतिपालक छ. शिवाजी महाराजांनी येथील मुलनिवासिंना मावळे या नावाने जोडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रपीता जोतीबा फुंलेंनी येथील मुलनिवासी गैरब्राम्हणी / अब्राम्हणी / ब्राह्मणेत्तर तसेच सत्यशोधक या नावाने जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनंतर राजर्षी छ. शाहु महाराजांनी 50 % आरक्षण घोषीत केले. विश्वरत्न महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील मुलनिवासींना संवैधानीक भाषेत ST, SC, OBC, - धर्म परिवर्तीत आणि महिला या संवैधानिक नावाने जोडुन एक नवीन समाज बनविला.
त्यामुळे लोकांच प्रबोधन झाले. लोकंमध्ये जागृती वाढली शत्रु मित्रांची ओळख झाली. अपले कोण, परके कोण हे समजु लागले. युरोशियन ब्राह्मणांची षडयंत्रे लक्षात येवु लागली. जातीजातीत सलोखा, सुसंवाद व संपर्क वाढु लागला न्याय, स्वातंत्र्य , समता, बंणुभाव या मानवी मुल्यांवर आधारित नवा समाज, नवा भारत, नवा देश, नवे राष्ट्र निर्माण होऊ लागले. अडी-अडचणीत एकमेकांना मदत करु लागले... त्यामुळे युरोशियन ब्राह्मणांची तळपायाची आग मस्तकाला गेली यांच्या सर्वांगाचा तिळपापड झाला. त्यांची फोडा-झोडा आणि राज्य करा ही कुटील नीती विफल झाली. जागृतीमुळे मुलनिवासी लोक त्यांना शत्रु मानु लागले. प्रबोधनामुळे मुलनिवासी लोक त्यांचा धर्म सोडुन चालले. त्यांच्या इशार्यावर, खालच्या जातीशी भांडणारे, खालच्या जातींना छळणारे खालच्या जातीची घरेदारे जाळणारे , खालच्याजातीशी बंधुभावाने वागु लागले. जातीव्यवस्थेमुळे जे एकत्र येत नव्हते ते एकत्र येवु लागले. हे पाहुन युरोशियन ब्राह्मण चिंताग्रस्त झाले. आणि ते चिंतन बैठका घेवू लागले. व चिंतन बैठका घेवुन त्यांनी नवी षडयंत्र आमलात आणण्याचे ठरवले त्या षडयंत्राचे नाव आहे. आरक्षणाच्या नावावर जातीजातीत पुन्हा भांडणे लावणे . संघर्ष घडवुन आणने व मुलनिवासी लोकांमधील असलेली एकी तोडणे.
त्यासाठी त्यांनी दक्षिण भारतात माला, मादिगा या दोन जातीत भांडणे लावली. उत्तर भारतात चमार वाल्मिकी या दोन जातीत भांडणे लावी. राजस्थानमध्ये मीना गुर्जर या दोन जातीत भांडणे लावली. महाराष्ट्रात पुर्वी महार चांभार मातंग अशी भांडणे लावली होती. आता त्यांनी मराठा कुणबी ओबीसी असे नवीन भांडण सुरू केले आहे. आणि अशा प्रकरची जातीजातीतील भांडणे लावण्यासाठी त्या त्या संबधीत जातीतील लोकांचा उपयोग करूण घेत आहेत.
ज्यावेळी लोकशाही मार्गाने लोकांच्या समस्या सुटत नाहीत, संवैधानीक मार्गाने लोकांच्या सुटत नाहीत, ज्यावेळी धरणे धरूण, विनंत्या करून, मोर्चे काढुन लोकाच्या समस्या सुटत नाहीत, ज्यावेळी सनदशीर मार्गाने लोकाच्या समस्या सुटत नाहीत, ज्यावेळी (उभा राहून किंवा मत देवुन) समस्या सुटत नाहीत. त्यावेळी लोकांसमोर एकच मार्ग शिल्लक रहातो आणि तो म्हणजे हातात शस्त्र घेणे. खरे तर हातात शस्त्र घेणे हा शेवटचा उपाय आहे.
सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिले असेल की आता लोकांची, नेत्यांचे एैकुण घेण्याची तयारी नाही. साधारण लोक आता बुट आण चपला फेकुन मारू लागले आहेत. सभेत उठुन प्रश्न विचारू लागले आहेत. पुर्वी सारखी कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या सभेला गर्दी दिसत नाही. 125 वर्षाच्या काँग्रेसने दगड जरी उभा केला तरी पण तो निवडुन यायचा. आज बुट आणि चपला खाव्या लागत आहे. रामाच्या नावाने प्रचार करणार्या भाजपाच्या प्रधानमंत्रीपदाच्या उमेदवारालाही चप्पल खावी लागत आहे. तोच प्रसाद नट नट्यांनाही मिळत आहे. हा सामान्य लोकांचा आक्रोश आहे, संताप आहे, असंतोष आहे, क्रोध आहे राग आहे भेलेही त्यांची त्यांना राग व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असेल.
सामान्य लोकात हा विद्रोह का निर्माण झाला ? कारण त्यांच्या मुलभुत गरजाही अद्याप पुर्ण झाल्या नाहीत गरीब अधिकच गरीब आणि श्रीमंत अधिकच श्रींमत होत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आरोग्य आणि मनोरंजन या मुलभुत गरजा आजही पुर्ण होत नाहीत. आणि म्हणुनच लोकांमध्ये विद्रोह निर्माण झाला आहे. खरे तर लोकांना परिर्वतन हवे आहे. लोक आज क्रांतीसाठीसज्ज आहेत. लोक हक्क व अधिकारासाठी, स्वाभिमान आणि स्वातंत्र्यासाठी मारायला आणि मरायला तयार आहेत.
ओबीसी सेवा संघाने 2011 च्या जणगननेत जातवार जणगनना करण्यासाठी जनहित याचीका मुंबई उच्च न्यायालयात दाखल, केली होती. उच्च न्यायालयाने गंभीर रित्या या याचीकेची दखल न घेतल्यामुळे जातवार जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळे आजमीतीस कुठल्याच जातीची स्पष्ट संख्या माहित नसताना जातीनिहाय नेते आपल्या जातीची संख्या फुगवून, अन्य जातींना आपणासोबत समाविष्ट करूण निवडणुकीतील विजयाचे कोष्टके मांडत असताना आरक्षणाच्या मुख्य सिद्धांतासच विसरत आहेत असे चित्र आजमितीस पहावयास मिळत आहे. आरक्षणाद्वारे मागसलेल्या जातीचा विकास होऊन त्या प्रगत व्हाव्यात ह्यापेक्षा आरक्षण वर्गात नसलेली जात आरक्षणा वर्गात येण्यासाठी प्रयत्नशील आहे.