अज्ञानाचे बळी - लेखक - प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे, B.A., B.E., M.B.A., L.L.B
साळवी : ह्या अफवा फैलविणार्या अवैज्ञानीक लोकांपासुन आपण लोकांना सावध करायला हवे, नाही का ? गणपती दुध पिण्याची अफवा कशी दिवसभरात पूर्ण भारतभर फैलली आणि चांगले सुशिक्षित लोक गणपतीला दूध जापण्यासाठी, ऑफीसचे काम सोडून, मोठमोठ्या रांगेत लागले होे. दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रातही तत्काली मुख्यमंत्री ह्यांचे ही व्यक्तव्य छापून आलेे की त्यांच्या घरच्या गणपतीनेही दुध पिले.
मी : गणपती दूध पितो ह्यावर तुमचा विश्वास बसला होता का ?
साळवी : अहो मुख्यमंत्री पण म्हणतो, त्यांच्या घरच्या गणपतीने दुध पिले, तर मी बापूडा कसा विश्वास ठेवणार नाही. पण दुसर्या दिवशी स्टार टिव्हीवर, एका चांभाराने, त्याच्या तिपाईला दूध पाजून दाखविण्याचे चित्रीकरण मी पाहिले. चांभार म्हणत होता, ‘गणपती दूध पिणे हे खोटे आहे आणि गणपती दूध पितो तर माझी ही तिपाईपण दुध पिते,’ त्या चांभाराच्या चिकीत्सक बुद्धीचे मला फार कौतुक वाटले आणि हा चांभार मला तत्कालीन मुख्यमंंत्र्यापेक्षा बुद्धीने श्रेष्ठ वाटला. एवढा श्रेष्ठ बुद्धीचा हा माणूस अजुनही चांभाराचेच काम करतोय, ह्याबद्दल वाईटही वाटले. आपल्या देशात बुद्धीमान लोकांना अजुनही पाहीजे तेवढा वाव मिळत नाही, असे मनोमन वाटले.
मी : साळवी अगदी मुद्याचे बोलले. आपल्या पुरातन परंपरावादी ब्राम्हणवादी जातीयवादी व्यवस्थेमुळे आजही जेमतेम बुद्धीचे लोक मलाई खात आहेत, तर मागसलेल्या जातीतील पट्टीचे हुशार अजुनही अतिशय मागासलेले जीवन जगत आहेत. ह्या मागासलेल्या वर्गातील लोकांना त्यांच्यातील गुणश्रेष्ठता सिद्ध करता यावी म्हणूनच डॉ. बाबासाहेबांनी भारतीय संविधानाद्वारे ह्या वर्गासाठी आरक्षाची तरतूद केली.
साळवी : बलाढ्य राष्ट्र बनायचे तर आम्हाला भ्रष्टाचार मुक्त देश ही बनावावा लागेल. वृत्तपत्रात आजकाल ह्या व त्या प्रकारचा भ्रष्टाचार वाचायला मिळतो. एकटे अण्णा हजारे जरी भ्रष्टाचारा विरूद्ध आंदोलन चालवीत असेल तरी त्यांच्या संघटनेतील 90 टक्के लोक भ्रष्टाचारी आहे असेही वृत्तपत्रात लिहुन आले होते. आपल्याच एका सहकार्याच्या कागदोपत्री भ्रष्टाचार उघड झाल्यावर, अण्णांनी त्यास पदावरून बरखास्त केले. आणि अण्णा म्हणतात, ‘मला पुरावे द्या माझे भ्रष्ट पदाधिकारी बरखास्त करील.’ भ्रष्टाचाराविरूद्ध धडाडीने लढणार्या अण्णांच्या नावाचाही भ्रष्टाचाराची रक्कम दुप्पट वसुलण्याकरीता उपयोग होत असेल तर ही व्यवस्था कितपत भ्रष्ट झाली आहे. ह्याचा अंदाज आम्ही लावू शकतो.
साळवी : कमीत कमी अण्णांसोबत काम करणारी माणस तरी भ्रष्टाचारमुक्त असावी अशी अपेक्षा होती, पण तोही भ्रष्टाचारी आढळले. पण ह्यात अण्णांंचा काय दोष ?
मी : अण्णा जी भ्रष्टाचार विरूद्ध लढाई लढत आहे, ती अतिशय वरकरणी आहे. आणी त्यानी कितीही प्रयत्न केला तरी भ्रष्ट्राचारमुक्त देश ते कधीच करू शकणार नाही. त्यातल्या त्यात अण्णांनी लढाई महाराष्ट्रातील भ्रष्ट नेत्यां पुरतीच मर्यादित आहे. सामाजीक आणी धार्मिकव्यवस्थेच्या भ्रष्ट आचरणा विरूद्ध त्यांची लढाई नाही. ह्या व्यवस्थेच्या भ्रष्टाचारावर बुंध्यासकट जर अण्णा घाव मारतील, तर फांद्यासकट भ्रष्टाचाराचा वृक्ष ह्या देशातून नष्ट होईल. आण्णा फकत आर्थिक भ्रष्टाचाराविरूद्ध बोलतात, सामाजीक व धमीर्र्क भ्रष्टाचारा विरूद्ध नाही.
साळवी साहेब थोड कडवट बोलतो, पण समजून घ्या. भ्रष्टाचार आम्हीच घराघरात पाळला आहे. लहानपणी देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आमच्या घरी कोणीच जेवत नसे. मी आईला विचारायचे, ‘अग हा नैवद्य आपण देवाला का देतो ?’ आई म्हणायची, ‘बेटा देवाला नैवैद्य दिला की देव आपल्या जेवणाची व्यवस्था करतो.’ बर्या कुटूंबाना जेव्हा मुलंबाळ होत नाही तेव्हा ते एखाद्या देवाला साकडे घालतात आणि म्हणतात ‘देवा आम्हाला मुले दे. आम्ही तुला सोन्याचा कडा वाहू.’ ह्या आमच्या धार्मिक आचरणाच्या मुळातच भ्रष्टाचाराचे बीज आहे. नाहीतर सरकारी अधिकारी व मंत्री यापेक्षा वेगळे काय बोलतो ? आहो राव, तुमचे काम होऊन जाईल, पण मला 10,0000 रूपये तुम्हास द्यावे लागतील.’ मग नैवेद्य दिला, तर जेवण मिळत, सोन्याचा कडा वाहला, तर मुल मिळत, ह्यासार्या गडद संस्कार झालेल्या भारतीय जनमानसात काम करून घेण्यासाठी पैसे मोजायची मानसिकता तयार होते. भ्रष्ट्राचार यााहून काय वेगळा आहे ? आणि भ्रष्टाचारासारखे एखादे पाप केल की त्यापासून मुक्ती एकदम सहज आहे. गंगेत जायचे आणि स्नान करायचे. गंगा सगळे पाप धुवन काढते. पापासुन मुक्तता ज्या देशातील जनमानसाच्या संस्कारात आहे. त्यास पाप करायला व भ्रष्टाचरकरायला कुठले मोठे भय लागणार आहे. मागील कुंभमेळाव्याच्या वेळेस 5 कोटींनी गंगेत स्नान केले अशी वर्ता होती. आता 5 कोटी लोकांची पाप धुवायची तर गंगाच थरारली आणी त्याच वेळेस भारतात भुंकप झाला. खरंतर कुंभमेळाव्याच्या पवीत्र काळात भुकंप व्हावा आणी हजारोंनी आमची बांधव मृत्युमुखी पडावी ह्यावरून तरी आम्ही असा प्रश्न करू शकलो पाहीजे की देवानेही कसे कुंभमेळ्याच्या पवित्र काळातच आमच्या देशावर भुकंपाची ही गदा का आणली ? भारतभर ह्या भुकंपानंतर वाराणसी येथून एका साधुने, स्टार टी. व्ही. वरून वक्तव्य केले की, भुकंप हा वारणसीलाच होता, पण आम्ही फुंक मारून त्यास दुर हाकलला. वारे साधु, जरा फुंक अजुन जोराने मारता नाही आली ?भुकंप कमीत कती पाकीस्तानात तरी झाला असता. हलकी फुंक मारल्यामुळे आपल्याच देशातील, गुजरात प्रांतातील आपले हजारो बांधवच मृत्युमुखी पडले व देशाचे कोट्यावधीचे नुकसान झाले. असे हे थापाडेबाज साधू. अशिक्षित आणि भोळीभाबडी बहुजन जनता ह्यांच्या असल्या विधानावरही विश्वास ठेवेलच, याचमुळे असे काही व्यकतव्य हे साधू करू शकतात. भुकंप हा नैसर्गिक कोप होता पण त्यानंतरच्या काळातही हिंदु मुस्लीम दंगे होऊन शेकडोच्या संख्येत आपलेच हिंदु मुस्लीम बांधव एक दुसर्याच्या हातून कापण्यात आले. भुकंपावर जरी आदयाप पर्यंत आपले नियंत्रण नसले तरी धार्मीक दंगे नियंत्रित करण्याचे काम आम्ही करू शकलो असतो. हया गुजरात राज्यातूनच देशभरात शांतीचा संदेश पोहोचविणारे अनेक बापू करीत असतांना ह्या बापुच्या राज्यात माणस माणसांना कापतात हे कसे घडते ? ह्या दंगलीच्या वेळेस समाजात शांतता निर्माण करण्यासाठी कुठलाच बापू दंगलग्रस्त गुजरातच्या रस्त्यावर फिरला नाही. भारत स्वातंत्र्य झाल्यावर पश्चिम बंगालमध्ये हिंदु मुस्लीम दंगे पेटले होते. त्यावेळेस दिल्लीत स्वातंत्र्यत्सोव साजरा करण्याऐवजी दंगे शमविण्यासाठी गांधी बापू एकटेच व त्या वस्त्यात फिरत होते. आजही त्याच महात्मा बापूच्या राज्यातील, लुच्चे लफंगे, बापू ही बिरदावली लावून समाजात धार्मीक तेढ निर्माण करण्याच काम करीत आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणजे गुजरातमध्ये झालेले हिंदु - मुस्लीम दंगे होत.
मी. मोठ मोठे राजकीय नेत मोठमोठ आर्थीक भ्रष्टाचार करतात, भ्रष्टाचार करतांना सुरवातीला आत्मग्लानी होते पण त्यनंतरच काळात बरेचस पुढारी निर्ढावलेले भ्रष्टाचारी बनतात त्यांच्या भ्रष्टाचाराचे कारनामे जेव्हा वृत्तपत्रातील ठळक जागा घेतात, त्याचवेळेस ही मंडळी एखाद्या मोठ्या होमहवन वा यज्ञाचे नाटक करतात. भोळेभाबडी जनता मग मनाशीच म्हणते - ‘हा नेता कसा का असेना, पण बिचारा धार्मीक दिसतो.’ आपली प्रतिमा उंचविण्यासाठी बरेचसे नेते मग पंढरपुरला वा वैष्णवी देवीला जातात. जेथे फार मोठ्या प्रमाणात भोळ्या भाबड्या जनतेला लुबाडण्याचा धार्मीक भ्रष्टाचार धर्माच्या नावावर चालत असतो. काहीच दिवसाआधी वृत्तपत्रात बातमी आली होती की, ‘पंढरपूरला बडव्यांचा सूळसूळाट तिर्थाच्या पाण्यात बडव्याने लघवी केली,’ अरेरे ही बडव्याची लघवी माझे भोळेभाबडे बांधव तीर्थम्हणून ही प्याला तयार असतात. किती हा त्यांच्या अज्ञानाचा कळस. कोणीच का ह्यांना ह्या अज्ञानातून मुक्त करणार नाही का ?
साळवी : भ्रष्टाचाराचा भाग सोडला तरी, मंदीर - मस्जिदवादी नेत्यांना, बराच प्रतिसाद मिळतो. ह्यामागाचे अजून काही कारण आहे काय ?
मी : हया देशाील मंदीर - मस्जिद वाद पेटवून लोकांच्या मूलभुत समस्या जसे की बेकारी, बेरोजगारी, शिक्षण हयाकडे दुर्लक्ष करायचे हा ही मनुवाद्याचा डाव असतो.
साळवी : पण लोकांना तर आपल्या मुलभुत समस्या बेकारी, बेरोजगारी ह्या आहेत. हे माहित असूनही, ते ही ह्या मंदीर - मस्जिद वादात कसे अडकतात ?
मी : ह्यास कारण आहे भारतीय माणसाची प्रतिगामी मानसीकता. कारण की बेकारी, बेरोजगारी ह्या समस्या सोडविण्यासाठी तो ही देवाकडे आशेने बघत असतो. तो मुळीच ह्या समस्येसाठी राज्यकर्त्यांना जबाबदार मानत नाही. राज्यकर्त्यांनाही हेच हवे असत. राज्यकर्त्याचेही फावते आणि तेही मंदीराचा मुद्दा बनवितात. आणि मग देश रामभरोसे चालतो.
साळवी : बडव्यांच्या धार्मीक भ्रष्टाचारातून भोळ्या भाबड्या बहुजन जनतेला मुक्त करण्याचे प्रयत्न आजवर केले नाहीत का ?