अज्ञानाचे बळी - लेखक - प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे, B.A., B.E., M.B.A., L.L.B
राजेश : मुलगा होण की मुलगी ह्याबबात 50-50 टक्के संधी असते म्हणून 100 पैकी फक्त मुलगाच म्हटले तर 50 वेळा तरी तें खरे ठरणार हे निश्चितच असते. ज्या 50 टक्के लोकांचे भविष्य खर निघते ते मग त्या ज्योतीषमहाराजांचा जिकडेतिकडे प्रचार करतात. पण ज्यांचे भविश्य खोटे निघतात ते गप्प का बसतात ? त्यांनीही जर असा प्रचार केला की त्यांना सांगीतलेले भविष्य खोटे निघाले, तर भोंदू जोतीषशास्त्राच्या प्रचाराला निश्चित आळा बसेल. मग हे 50 टक्के लोक गप्प का बसतात ?
मी : भविष्य खोटे निघाले की याविरूद्ध वा ज्योतीषशास्त्राचा खोटेपणा प्रचारीत करण्या एैवजी ही मंडळी म्हणतात, तो तमुक ज्योतीष ह्या शास्त्रात पारंगत नाही. त्याच्या व्यक्ती म्हणून ज्योतिष महाराजांवरचा विश्वास उडाला असतोपण ज्योतीषशास्त्रावरचा नाही. शाम मानवांनी लिंग परिवर्तन करणार्या एका महाराजांचा भांडाफोड प्रकरणात लिहीले आहे की, हा महाराज आपल्या मंत्रसामर्थ्याने गर्भातील स्त्री लिंगाचे पुरूषलिंगात परिवर्तन करायचा. ह्या महाराजाच्या भेटीसाठी एक चांगली जीन पॅन्ट व शर्ट घातलेली स्त्री रांगेत उभी होती. तिच्यासोबत तिची 3 वर्षाची एक मुलगी पण होती. अनिसच्या कार्यकर्त्यांने तिला विचारले की बाई तुम्ही प्रथमच येत आहा ना ? त्यावर ती बोलली, ‘नाही.’ पहिल्यावेळेस पण मी महाराजांकडे आली होती मुलासाठी. महाराजांनी मंत्रसामर्थ्याने माझ्या पोटातील स्त्रीलिंगाला पुरूष लिंगात परिवर्तीत केले होते. पण महाराजांनी मला देवघरात ठेवण्यासाठी एक पवित्र नारळ दिले होते आणि जेव्हा मला मुलगीच झाली व मी महाराजांकडे आली तर महाराजांनी विचारले की ‘काय तुझ्याकडे एखादी अस्पृश्य स्त्री कामासाठी आहे का ?’ मी म्हटले, ‘हो माझी मोलकरीन ही खालच्या जातीची आहे.’ महाराजांनी ताबडतोब सांगीतले, की, ‘ह्या स्त्रीनेच चुकन काम करताकरता त्या पवित्र नाराळास हात लावला आणि आपण केलेल पुर्ण कृत्य वाया गेले. पुरूषलिंग स्त्रिलिंगात परिवर्तीत झाले.’ ती पुढे म्हणाली ‘आता मात्र ह्यावेळेस, मी त्या मोलकरणीलाच कामावरून काढून टाकले ह्यावेळेस मला निश्चितच मुलगा होणार’ राजेश, जीन पॅट आणी टी शर्ट घालणार्या ह्या शहरी सुशिक्षित 35 व्या वयातील महीलेची जर ही मानसिकता असेल, तर खेड्यापाड्यात राहणार्या आमच्या लाखो करोडो भगिनी किती अंधश्रद्धेत जगत असतील, ह्याचा अंदाज न लावलेला बरा. पुरातन ब्राम्हणवादी व्यवस्थेच्या विचारांचे आम्ही आजही गुलाम आहोत, हेच ह्या प्रसंगावरुन आपल्या लक्षात येईल. अनिसमध्ये काम करणार्या माझ्या मित्रांनी अशा चारदोन बाबांच्या भांडाफोड केला तरी त्यापेक्षा, समाजमनात खुप खोलवर रूतलेला ब्राम्हणवादी पुरूषप्रधान संस्कृतीचा विचारच जर खोडून काढला, तर लिंग परिवर्तन करणार्या बाबों धंदा आपोआपच बंद होईल. बाबांचा भांडाफोड हे जखमेवरील मलम आहे. तर ‘पुरषश्रेष्ठ व स्त्री कनिष्ठ’ हा ब्राम्हणवादी विचार मुळातूनच नष्ट करणे ही समस्येवरिल शस्त्रक्रिया होय. वारंवार जखम होण्याचे मुळ कारणच संपुष्टात आणले तर मलम लावायची गरज उद्याच्या भारतात रहणार नाही.
राजेश : काका मुलगा की मुलगी ? ह्याबाबत दोनपैकी एकाचा अंदाज करणे म्हणजे 50 टक्के सत्याची खात्री. परंतू बरेचसे दारोदारी फिरणारे ज्योतीष, एखाद्या फुलाचे नाव मनात घ्यावयास लावतात आण बरोबर त्या फुलाचे नाव सांगणे म्हणजे निश्चितच काही तर गुढ शक्ती वा टेलीपॅथी ह्या बाबामहाराज ज्योतीषीत असणारच नाही का ?
मी : टेली पॅथी म्हणजे दुसर्यांच्या मनातले ओळखणे हा प्रकार समजविण्यासाठी मी माझ्या कॉलेज दिवसातील किस्सा सांगतो. बहुधा इंजिनीयरींगच्या तिसर्या वर्षाला होतो. मिलींद नावाचा माझा एक वर्गमित्र होता. एक दिवस तो बोलला - ‘प्रदिप, अरे काल आमच्याकडे माझी आई कटी घरी असताना, एक चमत्कारी महाराज येऊन गेला. त्यानी माझ्या आईला एका फुलाचे नाव मनात घ्यावयास लावले आणि आश्चर्य त्या चमत्कारी महाराजांनी लागलीच फुलाचे नाव ओळखले. आईने ताबतडतोब त्या महाराजांना 100 रुपये दक्षिणा दिली. प्रदीप तू ते अंधश्रद्धे विरूध्द काहीही बोल, पण असे चमत्कारी महाराज आजही जगात आहेत.’ मी मित्राला विचारल, ‘अरे फुलाचे नाव मी आईला विचारयचेच विसरलो. पण फुलाच्या नावाचे एवढे काय ? आईच्या मनातले त्या महाराजांनी ओळखणे हा चमत्कार मोठा’ मी म्हटले, ‘तसे नव्हे. मी त्या महाराजांपेक्षा मोठा चमत्कारी आहे. तो महाराज तुझ्या घरी येऊन तुझ्या आईशी बोलला. मी येथुनच तुझ्या आईने कुठल्या फुलाचेनाव मनात घेतले ते सांगु शकतो,’ तुझ्या आईनी मनात आणलेले व महाराजांनी ओळखलेल फुलाचे नाव एका चिठ्ठीवर आताच लिहीतो. तू उद्या तुझ्या आईला विचारून एका चिठ्ठीवर त्या फुलाचे नाव लिहुन आणले होेते. सर्वासमक्ष पहिले मिलींदची चिठ्ठी उघडण्यात आली फुलाचे नाव होते कमळ आता मी लिहलेली चिठ्ठी उघडली आणि सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का, मी लिहीलेल्या चिठ्ठीवरही लिहीले होते ‘कमळ’ आता मात्र मिलींदचा चेहरा पुरता पडला होता. कारण सर्वांसमक्ष त्याला माझ्या पाया पडायच्या होत्या. उपस्थित माझ्या काही मित्रांना माझे कुतहलही वाटले. व काहींच्या मनात माझ्यात काहीतरी गुढ वा चमत्कारी शक्ती आहे, असाही भ्रम निर्माण झाला. मिलींद म्हणाला, ‘प्रदीप यु आर ग्रेट. मी तुझ्या पाया पडतो, पण मला एक सांग तू माझ्या आईच्या मनात आसलेले फुलाचे नाव, इथ बसल्या बसल्या कसा ओळखु शकला.’ मी म्हणालो, ‘मिलींद पाया पडण्याची काही गरज नाही. पाया पडून घेऊ देणार्या बाबुवासरखा मी बदमाश नाही. भोळ्या भाबड्या लोकांची माथी आपल्या पायावर ठेऊन ती माथी गुलाम करणार्यांच्या कुळाचा तर मी निश्चितच नाही. मी जे प्रबळ आत्मविशवासाने बोललो होतो, तो खरं तर माझ्या अंदाजच होता. पण ह्या अंदाजापर्यंत पोहाचविण्याचे काम मी माझ्या आकलन शक्तीने केले. आणि ही आकलन शक्ती, थोडाफार तरी बुद्धीचा उपयोग करणार्या प्रत्येक माणसापाशी असतेच. जे आपली बुद्धी बाबामहाराजाच्या पायावर गहान ठेवतात. त्यांच्या आकलन शक्तीचा विकास तर होतच नाही, पण असलेली थोडीफार आकलन शक्तीही हे बाबामहाराज खत्म करून टाकतात. आकलनशक्तीच्या द्वारे अंदाजावर पाहोचल्यावर बाबामहाराज आतिशय बिनदास्तपणे भक्तांना सांगतात, तुझ हे असच होणार.’ म्हटल्याप्रमाणे झाले, तर भक्ताचा परमभक्त होतो आण झाले नाही तर बाबाबुवांनी माहीती असते की आपल्या भक्ताला अजीबात आकलन शक्ती नाही, कारण ती त्यांनी केव्हाच माझ्या चरणी वाहीली आहे. म्हणुन मग एखादे धार्मीक कारण जसे की आताच सांगीतल्याप्रमाणे त्या टी शर्ट व पॅन्टवाल्या बाईला म्हटल्या प्राणे की, तुझ्या घरच्या पवित्र नारळाला एखाद्या अस्पृश्य स्त्रीने हात लावला असेल, असे म्हणून, वेळ मारून नेतात, जिथे भक्ताच्या डोकयाचीच दिवळखोरी झालेली असते, तेथे भक्तही महाराजांचे कुठलेही कारण चालवूनच घेतो.
राजेश : पण काका मिलींदच्या आईच्या मनात कमळाचे फुलच होते, हा अंदाज तुम्ही कसा बांधला ?
मी : मिलींद माझा मित्र, त्याच्याकडे मी, नेहमीच जायचो. तो बौद्धधर्मीय. त्याच्या घरच्या बैठक खोलीतच, कमळावर आरूढ गौतम बुध्दाचे चित्र आहे. मिलींदची आई अतिशय धार्मीक स्वभावाची. ह्याच स्वभावामुळे तीने त्या ज्योतीषाला घरासमोर उभे राहु दिले. त्याच्या घराच्या दरवाज्यात जरी उभे राहीले तरी, कमळावर आरूढ गौतम बुध्दाचे चित्र अतिशय स्पष्ट दिसते. धार्मीक स्त्री आणि कमळावर आरूढ बुध्द. बस एवढ्या माहीतीच्या आधारावर ज्योतीषाने मनातील फुलाचे नाव ताबडतोब ओळखले. आणि मिलींदच्या आईस तो ज्योतीषी महान चमत्कारी साक्षात्कारी वाटु लागला. तरूण वयातील दहा जणावर मी हा ‘फुल ओळखतो,’ प्रयोग केला तर 10 पैकी 9 जणांनी ‘गुलाब’ हेच फुल घेतले होते.
राजेश : काका, संघात जाणार्या दहा व्यक्तीपैकी 9 व्यक्ती निश्चितच ‘कमळ’ हेच फुल मनात आणणारा नाही का ? पण काका निष्कर्ष ह्यातून निश्चितच निघतो की, रस्त्यावर फिरणारे हे ज्योतीषी निश्चितच हुशार बुद्धीचे असतात. त्याशिवाय का त्यांना एवढी आकलनशक्ती असते.
मी : बरोबर राजेश. ही मंडळी बुध्दीनी निशिचतच तरबेज असतात. बुद्धी ही चाकुसारखी असते. डॉक्टर चाकुचा उपयोग पेशंटव ऑपरेशन करण्यसाठी करून मरत्या पेशंटला जीवंत करतो. तर हाच चाकु, एखादा गुंडाच्या हातात असला तर तो पैशासाठी जीवंत माणसाला चाकु भोसकून मृत ही करतो. चाकुचा उपयोग करणार्याची भावना सकारात्मक आहे की नकारात्मक, ह्यावर चाकुचा उपयोग सिदध होतो. बुद्धीचा उपयोग करून लोकांना प्रशिक्षित करतो, त्यास लोक ‘शिक्षक’ म्हणतात आणि जो ह्याच बुद्धीचा उपयोग करुन लोकांना लुबाडतो त्याला ‘ठग’ म्हणतात.
ह्या संदर्भात प्रख्यात तर्कशास्त्री अब्राहम कोवूर ह्यांची गोष्ट मी तुला सांगतो. अब्राहम कोवुर कोट्टाकॉरा गावात नोकरीसाठी रूजु झाले. उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा ते आपल्या कुटूंबीयांस भेटावयास येत तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना परत येतांना गंगेचे पाणी आणावयास सांगीतले. सुट्या संपल्यावर परत येतांना श्री. कोवूर गंगेचे पाणी एका बाटलीत घेऊन आले. व ते आपल्या मित्रास दिले. ह्यानंतर ह्या मित्राकडे जेव्हा केव्हाही कोणास ताप किंवा काही दुखत असेल तर हा मित्र गंगाजल कुटूंबातील त्या व्यक्तीला पाजत असे. ‘हे गंगाजल आहे आणि ह्यामुळे आपली तबयेत बरीच होणार’ ही मानसशास्त्रीय विचाराने संबोधित व्यक्तीची तब्येत दुरूस्तही व्हायची. खरं तर मनुष्याच्या शरीरातील प्रतिकार क्षमता कुठल्याही त्याच्या दुखण्याविरूद्ध नेहमीच कार्य करीत असते. निसर्गदत्त ह्या प्रतिकारक्षमतेमुळेच मोठमोठ्या साथी आणि रोगराईवर मात करून मानवजात आजही जीवंत आहे. जेव्हा हे वैद्यकीयशास्त्र नव्हते तेव्हा शरीरस्वास्थ व वयोमान, ह्यानुसार व्यक्तीगणीक प्रतिकारक्षमता कमी जास्त असायची. अब्राहम कोवूर हयांच्या मित्रान गंगाजळी चमतकार गावातील इतर लोकांनाही सांगितला. आता दुसर्या वर्षी गावातील 50-60 मंडळी आपआपल्या रिकाम्या बाटल्या घेऊन श्री. कोवूर हयांच्याकडे आली व त्यांच्यासाठी ही गंगाजळी आणावी अशी प्रार्थना करू लागले.रेल्वे स्टेशन गावापासुन 7-8 किलोमीटर दुर अंतरावर व पायीच जावे लागायचे पण तरीही लोकांच्या भावानांचा आदर करीत त्यांनी रिकाम्या बाटल्यांचे हेही. ओझे वाहीले. सुट्याहून परत आल्यावर श्री. कोवूरनी गंगाजळी भरलेल्या बाटल्या गावच्या लोकांना वितरीत केल्या. आता घरोघरी गंगाजळीचा वापर व्हायला लागला. गावातल्या प्रत्येक आजारी माणसाला गंगाजळी म्हणजे अमृत वाटायगाला लागले. तिसर्या वर्षी जेव्हा पुन्हा श्री. कोवूर गावाकडे निघाले, पुन्हा 70 - 80 लोक रिकाम्या बाटल्या घेऊन तयार. 8-10 किलोमीटर ओझे कोवुरांनी पुन्हा पायी वाहीले. स्टेशनवर पोहाचताच कळले, की गाडी आज 3 - 4 तास उशीरा येणार, म्हणून ते, रिकाम्या बाटलांनी भरलेले पोत, स्टेशन मास्तरकडे ठेऊन, फेरफटका मारायला निघाले, 3-4 तासांनी तोच गाडी प्लॅट फॉर्मवर उभी. श्री. कोवूर धावतच गाडीत चढले. सुट्या संपल्यावर जेव्हा ते परत आले, तेव्हा स्टेशन मास्तरांनी रिकाम्या बाटल्यांंचे पोते त्यांना दिले. श्री. कोवुरांना वाटले, अरेरे, माझ्या हातुन फार मोठी चुक झाली. गरीब बापूडे आता माझ्यावर रागवतील एखाद्या वेळेस मारतीलही. रिकाम्या बाटल्यांचे ओझे वाहत असतांना, त्यांना समोर एक विहीर दिसली. लोकांचा राग टाळण्यासाठी म्हणून त्यांनी त्या विहीरीतील पाण्यांनी सर्व बाटल्या भरल्या व गावाकडे निघाले आता हे गंगाजळी नाही, हे फक्त कोवूरांनाच माहीत होते. भोळेभााबडे लोक कोवूर आले कळतांच, त्यांच्या घराकडे धावले. प्रत्येकाने आपआपली बाटली घेतली. कोवूरांना वाटले ह्यावर्षी मात्र गावात बरेच लोक मरतील व आपण केलेला खोटेपणा उघडकीस येईल. पण तसे काहीच झाले नाही. ते साध्या विहीरीचे पाणी असले तरी प्रत्येक आजारी पिणार्या व्यक्तीला ते गंगाजळीच वाटत असल्यामुळे मानसशास्त्रीय विचाराने आजारी बरेच झाले. वर्षाशेवटी पुन्हा एकदा 90 - 100 रिकाम्या बाटली घेऊन गावातील जनता कोवुरांकडे आली. रिकाम्या बाटल्या खांद्यावर वाहुन कोवर पुन्हा रल्वे स्टेशनकडे पायी निघाले आणि विचार करू लागले, की ह्यावेळेस तर गावच्या लोकांना मी फसवीले. खरं तर गंगाजळाच्या ठिकाणी मी इथल्याच साध्या विहीरीच पाणी त्यांना दिले. तरीही त्यांंचे आजार बरे झाले. त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मी जरी लोकांना फसविले, तरी सांगतांना, मी त्यांना हे गंगाजळच आहे असे सांगितले आणि त्याचमुळे गंगाजळ म्हणुनच त्यांनी ते प्राशन केले. आणि सकारात्मक मानसशास्त्रीय विचाराने ते बरे झाले. श्री. कोवुरांच्या मनात विचार आला, ‘ही साधी सरकारी नोकरी करण्यापेक्षा तर मी एक बाबा वा महाराज बनुन लोकांना बरे करण्यासाठी हे गंगाजलच घेऊन फिरलो तर मी काहीच दिवसात लखपती होईल आणि प्रतिष्ठितही.’ पण एक गोष्ट ह्याचवेळेस त्यांना बोचली. की ह्या मागील तीन वर्षाच्या काळत गावात प्रत्येक वर्षी 4-5 लोक मृत्युमुखीही पडली. भोळ्या भाबड्या गावकरी लोकांनी, ह्याबाबत अजीबात विचारही केला नसेल. पण हा विचार मी करायला पाहीजे. असे कोवुरांना वाटले. एका मुलास विषारी सापाने चावल्यावर त्यांच्यावर सापाचे विष उतरायचा मंत्र मारूनही व गंगाजल पाजुनही तो मेलाच. मानसशास्त्र घाबरलेल्या वा भेकड लोकांना मानसीक बळ देऊ शकते पण जिथे आजार हा शारीरीक म्हणजेच ‘विषारी साप चावणे’ हा प्रकारे असेल तर कितीही सकारात्मक मानसशास्त्र काही करू शकत नाही. कारण वेष हे आपले काम करणारच. गंगाजलाचे अमृतही विषाला अमृतात बदलु शकणार नाही. कोवुरांकडे आता जीवन जगायचे दोन मार्ग होते. पहिला ह्या देशातील भोळ्याभाबड्या व धर्मीक लोकांना लुबाडण्यासाठी एखादा बाबा महाराज बनणे. दुसरा ह्या देशातील भोळ्याभाबड्या अंधश्रद्धाळू बहुसंख्य लोकांना वैज्ञानीक दृष्टीकोनातून तयार करणे. पहिला मार्ग फारच सोपा होता. पण हा मार्ग भोेळ्याभाबड्या गरीब जनतेला लुबाडण्याचा होता. दसरा मार्ग तेवढाच कठीण. हा मार्ग सत्यशोधकाचा होता. अज्ञानी लोकांना ज्ञानी बनविण्याचा होता. आपल्यापाशी जे आहे तेही गमविण्याचा होता. लुच्च्या लफंग्या बाबामहाराजांच्या विरोधात उडी टाकतांना पावलोपावली जीव गमविण्याचाही धोका होता. मार्ग कठीण जरी असला, तरी कोवुरांना स्वत:शीच बेईमानी करायची नव्हती. त्यांनी कठीण मार्ग निवडला. पावलोपावली संघर्ष, त्यांच्या वाट्याला आला. आज जी अमेरिका विज्ञानात सर्वश्रेष्ठ आहे त्या अमेरिकेतील पहिली रॅशनलिस्ट काँग्रेस कोवुरांनी स्थापन केली.
राजेश : पण काका आजही खेड्यापाड्यात दवाखाने नाहीत. एखाद्या व्यक्तीस बीन विषारी साप चावल्यास, मानसीक धक्यानेही ‘साप चावला’ म्हणुन तो माणुस मरू शकतो. तेव्हा त्या गावातील एखाद्या मांत्रिकाने साप उतरायचा मंत्र फुंंकला, तर आपल्या अंगातील साप उतरला, ह्या भावनाने त्या व्यक्तीचे प्राणही वाचु शकते. साप उतरवणारे मांत्रीक ह्याठिकाणी आपणास उपयोगाचे वाटत नाही का ?
मी : पण राजेश साप विषारी असला तर तो मांत्रीकाच्या मंत्रानेही उतरणार नाही व त्या व्यक्तीचा मृत्यु होणारच. ह्यावर गावागावात दवाखाने असणे व गावातील मांत्रीकांनाच प्रथमोपचारी वैद्य बनवीणे हा उपाय आहे. व्यवस्था नाही म्हणुन अंधश्रद्धेला तोपर्यंत उपाय मानणे हा पर्याय असू शकत नाही. सरकारने सक्तीने ‘एक गाव एक दवाखाना’ हा कार्यक्रम राबवून ह्यावर उपाय काढला पाहीजे. सरकारची भूमिका ही मायबापाची आहे. लहान मुलांना आगीच्या भितीची माहीती नसते, म्हणुन काय मायबाप त्याला आगीशी खेळू देतात का ? एकतर ते त्याला बालपणी सक्तीने आगीपासुन दूर ठेवतात व जसजसा तो मोठा होतो त्यास, ‘आगींमुळे हात भाजतो, त्यामुळे त्यापासुन दुर रहा’ असा इशारा देतात. अग्नीची दाहकता समजण्यासाठी प्रत्येकालाच अग्नीत हात घालण्याची आवश्यकता नसते. तर त्याबद्दलच्या ज्ञानाची गरज असते. ब्रिटीशांच्या काळात देवीच्या रोगाच्या साथीत गावच्या गाव मृत्युमुखी पडायची. ह्यावर उपाय म्हणुन ब्रिटीशांनी सक्तीनं गावोगावी लसीकरणाची मोहीम रागविली. आमच्या भारतीय भोळ्या भाबड्या लोकांना वाटत होते की देवीची साथ म्हणजे देवीचा कोप होय आणि म्हणुन दवस रात्र देवळात देवीला आणाभागा चालायच्या, प्रर्थना चालायच्या. पण इतक करन सुद्धा गावातले लोक मृत्युमुखी पडायचे व काही काळने ह्या साथीचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर, लोक समजायचे देवीच्या कृपेमुळे आपण वाचलो. ब्रिटीशांनी केलेल्या सक्तीमुळे देवीची साथ समाप्त झाली. आणि आता आम्हीही आमच्या लहानग्यांना बाळपणीच लसीकरण करतो, तेव्हा ह्याच गोष्टीला देवीचा कोप मानायचे, हे आम्ही विसरतो. लसीकरणामुळे ह्या रोगाचे उच्चाटन आम्ही करू शकतो ह्याच्या उच्चाटनासाठी आता कुठल्या देवीची प्रार्थना करायची गरज नाही पण त्याकाळात ह्या मोहीमेच्या विरूद्ध भारतातीलच अनेक पंडीत असा धार्मीक प्रचार करीत होते की ब्रिटीशांना ह्या देशात कायमचे वास्तव्य करायचे आहे म्हणुन ह्या लसीकरणाद्वारे ते आम्हा भारतीयांना नंपुसक बनवून आमची लोकसंख्या घटविण्यचे काम करीत आहोत ह्या प्रचाराला बळी पडून बर्याच ठिकाणी ब्रिटीश डॉक्टरंवर हमलेही झाले पण तरीही ब्रिटीशांनी सक्तीने ही मोहीम राबविली. स्वतंत्र भारतात पल्स पोलीओच्या निमीत्ताने पुन्हा आशीच स्थीती निर्माण झाली आहे. जागतीक आरोग्य संघटना वा युनीसेफच्या मदतीने भारतभर पोलीओला भारतातून कायमचे हद्दपार करण्याचे प्रयत्न चालु आहेत. ह्या वळेस मुसलमानातील काही मुल्ला मुस्लीम लोकांत हा प्रचार करीत आहेत की ह्या पालीओ ड्रापमुळे मुसलमांनाना नंंपुसक बनवून त्यांची लोकसंख्या रोखण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत व मुसलीम बांधव हया प्रचाराला बळी पडत आहे. नुकत्याच झालेल्या 2002 च्या पडताळणी अहवालात असे लक्षात आले आहे की उत्तर भारतातील मुस्लीम बहुल आझमगढ ह्या जिल्ह्यात पोलीओच्या सर्वात जास्त म्हणजे 81 केसेस आढळल्या आहेत. धार्मीक प्रचाराला बळी पडून कायमचे अपंगत्व पत्करणार्या आमच्या ह्या मुस्लीम बांधवातही ज्ञानाचा दिवा पोहोचविण्याची आजच्या काळाची गरज आहे. प्लेग वा देवीची साथ हिंदु वा मुस्लीम असा एक करून गावकर्यांना मारत नाही, एवढतरी ज्ञान खेडोपाड्यात पोहोचणे जरूरीचे आहे. जीवघेण्या रोगाविरूद्धची लढाई आम्हा सर्व भारतीयांना एकत्रितपणेच लढावी लागेल. देवाधर्माच्या नावाने आम्ही विभाजीत होतो तर विमानाच्या शक्तीने आम्ही एक होतो. देवादिकाच्या वा धर्माच्या नावाने आपला उद्देश साध्य करणे, हा काही लोकांचा खानदानी धंदाच आहे. ह्या खानदानी धंदवाल्यापासुन सावध राहणे आजची गरज आहे. ह्यावेळेस हरीवंशराय बच्चनच्या खालील ओळी मला दिलासा देऊन जाात.
मंदीर मस्जिद बैर बढावे
मेल कराती मधुशाला
मुझको तो प्यारी मधुशाला