बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
मा. कांशीरामजींचा म. गांधी वरील राग हा सर्वविदीत आहे.त्यांच्या म. गांधी वरील टिकेला प्रसार माध्यमे विरोधाभासातून प्रसिध्दी देत.परंतू ते गांधीवर का टिका करीत ? याचे विश्लेषन वर्तमानपत्रे कधीही प्रसिध्द करीत नसत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ब्रिटिशाकडून मिळालेले हक्क म. गांधीजींच्या येरवडा तुरुंगातील आमरण उपोषणामुळे गमवावे लागले होते. दलितांना हरीजन असे नाव देऊन तम्ही करीत असलेली घाणीची कामे देवाला प्रिय आहेत त्यामूळे ती कामे सोडता कामा नये हा संदेश गांधीना हरीजन या नावातून दलिताना द्यावयचा होता.जर केवळ दलित हे हरीची लेकरे आहेत तर बाकी जनता कोणत्या हेवानाची लेकरे आहेत ? असे प्रश्न दलित नेते व विचारवंताकडून विचारला जातो. म. गांधीजींच्या अशा अन्यायी प्रवृत्ती मुळे राजघाटावरील गांधी स्मारकाची आंबेडकरवाद्याकडून तोडफोड करण्यात आली होती. म. गांधीजीने पुणे कराराच्या माध्यमातून दलिताना ब्रिटिशाकडुन मिळणारे हक्क हिसकावून घेतेले. म.गांधीजीना सर्व समाजात त्यांचे पाठीराखे व चमचे बनवायचे होते. पुणे कराराच्या माध्यमातून दलित समाजात म. गांधीजीने चमचा युगाची निर्मिती केली हा कांशीरामजींचा गांधीजीवर स्पष्ट आरोप होता. दक्षिण आफ्रिकेत काळे व गोरे असा वंशवाद होता. आफ्रिकेत असतांना म.गांधीजीना गोऱ्या लोकांनी चालत्या गाडीतून ढकलून दिले होते याचा गांधीजीना खुप राग आला. त्या अपमानातून गांधीजीना गोऱ्यांच्या काळ्या लोकावरील अन्यायाचे, पिळवणूकीचे दर्शन झाले व काळयांना अधिकार देण्यासाठी त्यांनी द. आफ्रिकेत प्रयत्न केले. युरोप आफ्रिकेत जसा वंशवाद तसा भारतात जातीयवाद. इथल्या समाज व्यवस्थेत खालच्या स्तरातील लोकांना कुत्र्यामांजरा पेक्षाही कमी किंमत होती. काळयांच्या तुलनेत अस्पृशांच्या यातनांना तर काही सीमाच नव्हत्या. दक्षिण आफ्रिकेतील व भारतातील प्रश्न हे समान स्वरुपाचे होते, परंतू गांधीना भारतातील जातीयवादाचे, हिंदु धर्मातील अन्यायी चालीरितीचे व अस्पृशावरील अत्याचाराचे प्रश्न हे कधी अन्यायकारक वाटले नाही उलट सनातन संस्कृतीचे समर्थन केले. शुद्र शंबुकाचा वध करणारा, सिता स्वरुप स्त्रीला यातना व एक शुद्र स्त्री शुर्पनखा हिचे नाक, कान व स्तन कापण्याचा आदेश देणारा राम हा गांधीजींचा आदर्श होता. याच रामराज्याची स्थापना गांधीना करावयाची होती. गांधीजीच्या विरुध्दचा हाच आकस आज स्वाभिमानी दलितांच्या मनाला डिवचतो आहे.
आज गांधीजींचे भारतातील वारसदार अमेरीकेतील बराक हुसेन ओबामा यांचे विजयावर बेहद खुष आहेत .त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळून पेपरचे रकानेच्या रकाने भरल्या जात आहेत. ते अमेरिकन ओबामाचे स्वागत करतात परंतु भारतात अस्पृश्य मायावतीचा द्वेष करतात. अशा या दोन चेहरे असलेल्या लोकांना कांशीराम यांनी ओळखले होते म्हणून त्यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या शस्त्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी प्रथम बहुजन समाजातील जाती स्वाभिमान जागृत करुन ब्राम्हण व उच्चवर्णीयाचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या बाजूने त्यांची राजकीय सत्ता हिसकावून घेण्याचे आवाहन करुन उच्चवर्णीयाना सत्ताहीन करण्याचे ध्येय आखले होते.