Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

कांशीरामजी खरे बुध्द अनुयायी

बहुजन नायक कांशीराम -  बापू राऊत 

     कांशीरामजी हे बाबासाहेबांच्या संपूर्ण चळवळीचे केंद्र बिंद बनू इच्छित होते त्यासाठी त्यांनी काळानुरुप पावले उचलत शेवटच्या टप्प्यात म्हणजे धर्मपरिवर्तनाच्या परिघापर्यंत येऊन पोहोचले होते परंतू त्या परिघात काळाने त्यांना प्रवेश करु दिला नाही. कांशीरामजीच्या चळवळीचे संपुर्ण केंद्रबिंदु डॉ. बाबासाहेब होते. मा. कांशीरामजीनी बौध्द धम्माचा प्रसार, प्रचार व संशोधनासाठी बुध्दिस्ट रिसर्च सेंटर ची स्थापना केली होती. नागपुर येथील अंबाझरी परिसरात बुध्दीस्ट रिसर्च सेंटर द्वारा एक संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात भाग घेताना भदंत आनंद कौशल्यायनजी कांशीरामजी विषयी म्हणतात बौध्द धम्म मे भदंत के लिए कुछ नियम बनाये है ! भंते संसार से अलिप्त होते है ! वह संपत्‍ती का संचय निजी काम के लिए नहीं करते और प्रबोधन कार्य के लिए निरंतर भ्रमण करता है ! मा.कांशीरामजी ने भले ही भंते के वस्त्र न पहने हो मगर भंते कि सारी कसौटीयो पर वे खरे उतरे है । उनकी हर सांस बुध्दमय है !


True Buddhist Kanshiram     मा. कांशीरामजींची रोजची दिनचर्या हि बौध्द पध्दतीची होती.त्याना आपल्या लाखो अनुयायासोबत हिंदु धर्माला ठोकर मारुन बुध्द धम्म स्विकारवयाचा होता. अचानक आलेल्या आजारामुळे त्यांना आपल्या जिवंतपणात बुध्दाला शरण जाता आले नाही. परंतु आपले अंत्यसंस्कार हे बौध्द पध्दतीनेच झाले पाहिजे असा आदेशवजा सल्ला आपल्या अनुयायाना दिला होता व आपल्या अंतिम इच्छेप्रमाणेच असंख्य बौध्द भंतेंच्या उपस्थितीत ते बुध्दतत्वात विलीन झाले.

संदर्भ सुची


डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण चरित्र - धनंजय किर

बामसेफ एक परिचय - मा. कांशीराम

चमचा युग - मा.कांशीराम

मेरे संघर्षमय जीवन एंव बहुजन मूव्हमेंट का सफरनामा - कु. मायावती

साप्ताहिक बहुजन नायक : संपादक - मा. कांशीराम

पोस्टमार्टम ऑफ आर.पी.आय - भिमराव गजभिए

आंबेडकरी चळवळीची दिशा - के ना. सुखदेवे

आंबेडकरवाद तत्व आणी व्यव्हार - डॉ. रावसाहेब कसबे

ऊत्तर प्रदेश में बसपा की सफलता - एच. एल. दुसाध

भारतीय समाज और दलित राजनीति - चंद्रभान प्रसाद

तेज विकास की रोशनी से वंचित : बहुजन समाज - एच. दुसाध

आंबेडकरी विचारधारेचा राजकीय पक्ष: रिपा की बसपा - ले. माणिक एस. निकोसे

दै.महानायक : संपादक - सुनिल खोब्रागडे
 



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209