बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
सध्या भारतावर 5 टक्के ब्राम्हणांचे शासन आहे.या देशावर 5 टक्के ब्राम्हण जर सत्ता गाजवीत असतील तर 16 टक्के दलितांनी ती सत्ता आपल्या हातात का घेऊ नये ? परंतु जोपर्यंत दलित येथील साधन संपदा ,संस्थाने आणी संस्कृती वर कब्जा करीत नाही तोपर्यंत दलित या देशाचा शासक बनणे अवघड आहे. ज्या दलित समाजाची आधिकाधिक लोकसंख्या हि भमिहीन कृषी मजुरांची आहे की ज्यांना दोन वेळचे साधे जेवण मिळत नाही, ज्याला साधे गाडीचे नंबरही वाचता येत नाही. असा समाज स्वतंत्र विचार कसा करु शकेल ? शासक बनणे तर फार दुरची गोष्ट आहे. कांशीरामजीनी यावर बराच विचार केला व वर्तमान परिस्थितीत स्वतंत्र सत्तेपेक्षा सत्तेमध्ये भागीदारीचा नारा दिला. मुलायमसिंग यादव व भाजपासोबत सत्तेत भागीदारी केली. परंतू हाती आलेल्या साधनाच्या माध्यमातूनही अपेक्षित साध्य होत नसल्यामुळे संपूर्ण सत्ताच हातात घेऊन शासक बनण्याकडे वाटचाल सुरू केली.
कांशीरामजी एकदा म्हणाले होते, भारत मे दलितोकी दुर्दर्शा देखकर में बहुत दु:खी होता हु ! दलितपन दलितों की सबसे बड़ी कमजोरी बन गई है ! जिस प्रकार कोई भिकारी कभी शासक नही बन सकता, उसी प्रकार बिना अपना दलितपन छोडे कोई समाज शासक नहीं बन सकता. माँगनेवाले हाथो को माँगनेवाले हाथ के बजाए देनेवाला हाथ बनना होगा ! यानी की उन्हें शासनकर्ती जमात बनना होगा ! अगर आप शासक बन जाते है तो आप आपके सभी समस्याओका हल आप स्वंय कर सकते हो !
कांशीरामजींच्या "जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी” या नाऱ्याने जाती जातीच्या भिंती पक्क्या होतात आणि हा नारा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती विनाशाच्या तत्वाच्या विरोधात आहे असा आक्षेप घेण्यात येत होता पण यावर कांशीरामजी समर्पक उत्तर देतात. ते म्हणतात एक बार यदी आप कोई व्यवस्था बना दे, तो उसको चलाना तथा कायम रखना अधिक मुश्किल काम नही है ! जाती से फायदा उठानेवाले लोगो ने जातीया बनाया ताकी इसकी सहायता से वे दुसरो पर राज कर सके! इसिलिये जाती का इस्तेमाल अपने फायदे के लिए करना चाहिए ! जब जाती जनजाती मे भाईचारा पैदा हो जाएगा ! जाती की दिवारे अपने आप ढह जाएगी ! जाती तोडो समाज जोडो अभियान कामयाब होगा ! ते दलिताना आव्हान करुन सांगतात. वोट कि राजनीती समझो, डॉ. बाबासाहाब ने हमे वोट का अधिकार दिया है ! राजा या शासक राणी के पेट से नही बल्कि वोटिंग मशिन से पैदा होता है ! करोडपती हो या भिकारी वे अपने पसंद का राजा चुन सकते है और सरकारे बहुमत के आधारपर बनती है ! ते म्हणतात, हमारी सुरुवात हारने से होती है, फिर जितने लगते हैं, फिर बॅलेंस ऑफ पावर कि स्थिती में पहुंचते हैं ! मौका मिला तो दूसरो कि मजबुरी का फायदा उठाकर हम इस देशके शासक बनेंगे ! और ऐसे स्थिती में हमे इस देश को सम्राट अशोक का भारत बनाना है !
कांशीरामजींचा भागीदारी सिध्दांत हाच आर्थिक सिध्दांताचा मुळ पाया आहे.भारतातील मुळ समस्या हि आर्थिक विषमतेची आहे आणि आर्थिक विषमतेची हि दरी भरुन काढण्यासाठीचे उत्तर कांशीरामजींच्या भागीदारी दर्शनात आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हा तो सिध्दांत. Power is the instrument for change. सत्ता हे बदलाचे साधन आहे.साधनाशिवाय नवा प्रयोग शक्य नाही.साध्य असेल तर साधनाची जुळवाजुळव करता येते व साधनाने आपला उद्देश सफल करता येतात. विज्ञानाच्या प्रयोगशाळेत वेगवेगळ्या पदार्थाच्या संयोगातुन नवे पदार्थ निर्माण करता येतात तसे प्रयोग सामाजिक व आर्थिक बदलासाठीही वापरात येऊ शकतात. जे या तथाकथीत समाजव्यवस्थेची यथेच्छ फळे खातात अशा प्रस्थापितांना समाजव्यवस्थेत कोणताही बदल नको आहे. ते अशा बदलांचा नेहमी विरोध करणार परंतु ज्यांना या व्यवस्थेची झळ बसलेली आहे व बसत आहे त्यांनी या बदलासाठी आपले बलदंड पुढे केले पाहिजे. आपण ज्या बदलासाठी लढतो त्याचे परिणाम अल्पकाळातच मिळतील असे नाही .आपले लढण्याचे व्हिजन (उद्देश) भविष्यकाळासाठी असले पाहिजे.आपला लढा येणाऱ्या पिढ्यासाठी मार्गदर्शक ठरला पाहिजे.
काॅंग्रेस दलित, ओबीसी व मुसलमान यांच्या मतांच्या आधारावर वारंवार सत्तेमध्ये येत आहे परंतू सत्तेची फळे उच्चवर्णीय खात आहेत याची जाणीव दलित, ओबिसी व मुस्लिमांना होत नाही.कांशीरामजीनी बहुजन समाजाला समजावून सांगितले, की बहुजन समाजाची संख्या हि 85 टक्के आहे परंतु 15 टक्क्याचा सवर्ण समाज तुमच्यावर राज्य करतो आहे.तो क्रम तुम्हाला बदलवयाचा आहे. 85 टक्के वाल्यांना या देशाचे शासक बनायचे आहे.ओबीसीसाठीचा मंडल आयोग लाग व्हावा म्हणन त्यांनी आंदोलन केले कांशीरामजीनी दलितांना मताचे महत्व समजावून सांगितले. दलित समाजात स्फुलिंग चेतवीले. तुम्हाला या देशाचा शासक वर्ग बनायचे आहे. तुम्हाला तुमचे मत कोणालाही द्यायचे नाही वा ते कणावर लटवायचे नाही तर आपले मत केवळ अपल्या पार्टीला द्यायचे. असे केले तरच पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढेल व एक दिवस असा येईल की तुम्हीच सर्वापेक्षा ताकदवान बनाल. पंचायत समितीच्या पातळी पासून ते दिल्ली पर्यंतच्या सत्तेचे तुम्ही वाहक व्हाल. कांशीरामजी हे केवळ राजकीय सत्तेतील भागीदारी संदर्भात बोलत नाहीत तर त्यांचे समोर मुख्य महा होता तो आर्थिक गैर बरोबरीचा.देशातील वंचित व मुलनिवासी लोकांच्या हातात वेगवेगळ्या प्रकारची डिलरशिप, ठेके, पार्किंग, परिवहन, फिल्म, टी. वी. प्रिंट व इलेक्ट्रानिक मिडीया इत्यादी मध्ये बहुजन समाजाला भागीदारी भेटली पाहिजे. कांशीरामजीचा हा भागिदारी सिध्दांत अमेरिकेच्या डाइवर्सिटी या सिध्दांता सारखा आहे. या भागीदारी सिध्दांताने आर्थिक गैर बराबरी नष्ट होऊन उच्च वर्णीयांच्या परंपरागत वर्चस्वाला तोडता येईल व सामाजिक तनाव, हिंसा व जातीय द्वेष रोकण्यात यश मिळेल. 1950 च्या दशकात अमेरीकेत मार्टीन ल्युथर किंग (ज्युनिअर) यानी केलेल्या संघर्षामुळे अमेरीकेतील निग्रोना सामाजिक(स्वतंत्रता, समानता),राजनैतिक(विधायीका ,कार्यपालिका व न्यायपालिका आर्थिक (सप्लाय, कृषी, डिलरशिप, ठेके, पार्किंग,परिवहन फिल्म.टी,वी मिडीया),उद्योग व शैक्षणीक तथा सांस्कृतिक ( महाविद्यालये, कला, नाटक, मनोरंजन , वैर गानिक , तांत्रिक, उद्योगधंदे ) इत्यादी क्षेत्रात पुढे गेले आहेत व त्यांची धडक ही थेट व्हाईट हाऊस पर्यंत जाऊन निग्रो बराक ओबामा जगातील सर्वात मोठा शक्तीशाली व्यक्ती बनला आहे. ( जर अमेरीकेतील गुलाम निग्रो शक्तीशाली शासक बनू शकतात तर भारतातील दलित या देशाचा सत्ताधारी काबनू शकत नाही ? )
कांशीरामजीनी ऊद्योग व कृषीनीतीवर सुध्दा आपले मत मांडले आहे. ते म्हणत केंद्र की सत्ता हमारे हाथ मे आने पर हमारी पार्टी का लक्ष होगा राज्यो द्वारा धीरे धीरे प्रमुख उद्योगोका अधिग्रहन, निर्वाह योग्य मजदुरी और काम करनेकी समुचीत परिस्थितीयो का निर्माण, उच्चतम तकनिकी मिशनरी कि स्थापना तथा खनिज संस्थानोपर सरकारी नियंत्रन,सरकार किसानो से जमिन लेकर भूमिहीनो को देने की अपेक्षा खाली पड़ी जमीन का सरकारी अधिग्रहन कर भुमीहीनो मे वितरीत करेंगे,हम उद्योगपतीयोसे उनके उद्योग नही लेंगे ! उद्योगपती लोग सरकार के पैसे से उद्योग चलाते है,अपनी पुंजी बहुत कम लगाते हैं!हमारी सरकार उनकी मदद नही करेगी,उनको अपने पैसे से उद्योग लगाने और चलाने होंगे तथा निश्चित सुविधाए मजदुरो को देनी होगी. त्यानी दुसऱ्याच्या जमीनी हिसकावून घेण्याची परीकल्पना केली नव्हती. परंतू खाली पडलेल्या सरकारी जमीनीच्या अधिग्रहनाच्या मागणीचा मुद्दा उचलला होता. ते म्हणत जो जमीन सरकारी है वह जमीन हमारी है. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाकडे सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री मायावतीने पक्षाच्या धोरणानुसार सरकारी जमीनीचे वाटप भुमिहिनांना केले.