Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

बहुजन उपाशी भट ब्राम्हण तुपाशी

बहुजनांचे मारेकरी  -  लेखक  बापु म. राऊत


     आज बहुसंख्य जनता दरीद्री जीवन जगत आहै. कुपोषणाने लोक भुकबळी जात आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत.त्यांची आसवे पुसण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.गरीबीमुळे लोक आपल्या पोटची पोंर विकायला लागली आहेत. कित्येकांच्या घरात तीन-तीन दिवस चुली पेटत नाहीत. जगाच्या पाठीवर 33 कोटी देवाच्या भारतात सर्वात जास्त भुकबळी जात आहेत. भिकार्‍यांचा देश म्हणून या देशाची गणना होते. या देशात भरपुर साधनसंपत्ती असुनही बहुजनावर ही पाळी का यावी ? सरकारी गोदामात अन्नधान्याचा भरपूर साठा असतानाही लोक आत्महत्या करीत आहेत. तर दुसरीकडे लोक संपत्तीवर लोळण घेत आहेत. मजा व ऐश करताहेत. या देशातला शासक व ऊच्च वर्ग धष्टपुष्ट आहे तर बहुजनाचे पाठ व पोट एक झालेले आहे. ही असमानता या देशात हजारो वर्षांपासून आहे. या असमानतेला धक्का देण्याचे प्रयत्न  कोणीही करीत नाही. बहुजनाच्या पैशातुन बांधलेली मंदिरे ही भटाची आश्रयस्थाने व संपतीची भंडारे होत.

Bahujan hunger death in India      भट-ब्राम्हणांची लेकरे भारतीय न राहता अनिवासी भारतीत बनतात. एका सर्वेक्षणानुसार देशातील मंदिराचे वार्षिक उत्पन्न 10 लाख 1 हजार कोटी रुपये आहे तर भारत सरकारचे राष्ट्रीय ऊत्पन्न 4 लाख 54 हजार एवढे आहे. सरकारच्या वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पटीपेक्षाही मंदिराचे उत्पन्न आहे. हा सारा पैसा जातो कुठे ? मंदिरात जमा होणारा पैसा बहुजन समाजाचा असतो परंतु हा पैसा भटांच्या खिशात जातो. देशाच्या अर्थ, धर्म, शिक्षण, क्रिडा व उद्योग या सर्वांवर ब्राम्हणाचे वर्चस्व आहे. त्यामळे सारी यंत्रणा ही त्यांच्या फायद्यासाठी राबविली जाते.

     ज्याच्या हातात धर्मसत्ता तो अधिक शक्तीशाली असतो. धर्मसत्ता ही भटब्राम्हणांच्या अंगणातील खुट्याला बांधलेली आहे. ते हवा तसा तिचा वापर करतात. तिच्या साह्याने ते बहुजनाला कर्मकांड व अंधश्रध्येत ठेवून भिकारी बनवितात व स्वत: सारे फायदे घेतात. आर्यब्राम्हण हे गोहत्या बंदिची मागणी करीत आहेत. गोहत्येवर बंदी आणली तर त्यात नुकसान बहुजनाचे आहे तर फायदा ब्राम्हणाचा आहे. कारण ब्राम्हणाना भरपुर दुध मिळेल. आज त्यांची मरणप्राय झालेली यज्ञ संस्कृती उदय पावत आहे. यज्ञासाठी असली तुपाची गरज असते. ते तुप त्यांना फुकटात मिळेल. गायीचे गोपालन वाढवायला बहुजन लोक आहेतच. गायी जंगलात राखायला बहुजन मुले जाणार आहेत. बहुजनांची मुले ही गायी राखणारे गुराखीच होणार. गायीचे पालन करुनही बहुजन समाजातील लहान मुलाना दुध मिळत नाही. त्यामुळे बहुजन समाजातील मुले बघा कशी हाडकी हाडकी असतात. त्यांचे चेहरे कसे खप्पड असतात. पोट आणि पाठ एक झाली असते. रसत्यावर जसे खड्डे असतात तसेच खड्डे बहुजनाच्या गालावर बघायला मिळतात. पण गोहत्येची मागणी करणार्‍यांची औलाद बघा कसी तेलसी-तेलसी असते. त्यांचे गाल बघा कसे चेंडवासारखे गोल-गोल असतात. आर्यभटांची चंगळ तुमच्यामुळे होते.दही,तुप, बासुंदी, श्रीखंड, खवा यावर ते नेहमी ताव मारीत असतात. गाई पाळणारे गायी पासून बनविलेल्या पदार्थाचा स्वाद घेत नाहीत पण हे फुकटराम घेत असतात. गोहत्येवर बंदी आणा असे ते म्हणतात म्हणजे गायी चारायला भट ब्राम्हण जाणार आहेत काय? ते कदापीही जाणार नाहीत. ते तुम्हालाच गायी पाळायला लावणार व मलिंदा मात्र हे खाणार म्हणन बहजन लोक हो जागत व्हा. ब्राम्हणांचे कावे व कसब ओळखा.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209