बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
पेशवाईच्या अगोदर सत्यनारायणाच्या पुजा होत असल्याचे कोठेही नमुद नाही. परंतु पेशवाई लयास गेल्यानंतर ब्राम्हणाच्या पोटापाण्यासाठी ती प्रथा सुरु करण्यात आली. आज झोपडी पासून ते पाच तारा बंगल्यापर्यंत सत्यनारायणाच्या पुजा घातल्या जातात.या सत्यनारायणाच्या पुजेत आर्थिक नुकसान पुजा ठेवणार्याचे होते तर फुकटचा गल्ला भट-ब्राम्हण घेऊन जात असतो. पुजे साठी आणलेले फळे, बदाम, काजु या वस्तू तर असतातच वरुन धोतर व पैसे पण द्यावे लागतात. आजकाल भटपुजारी पुजेत सोन्याच्या वस्तु ठेवायला सांगतात. म्हणजे काहीही श्रम न करता पैशाची कमाई. पुजा करणारे भट हे मालदार व धनवान बनतात पण पुजा ठेवणा-यांच्या परीस्थितीत कोणताही बदल घडून येत नाही. या सत्यनारायणाच्या पुजेत असते तरी काय ? त्यात एक कथा सांगितल्या जाते. त्या कथेत एक ब्राम्हण अतिशय दरिद्री अवस्थेत राहात होता. खायला अन्न मिळत नसल्याने तो दारोदारी भिक्षेसाठी भटकत असे. त्याची दुर्दशा पाहून देवाला दया आली व त्याने सुख समृध्दिसाठी सत्यनारायणाची पुजा करावयास लावली. पुजा केल्यानंतर मग तो ब्राम्हण सुखी व श्रीमंत झाला अशी ती कथा आहे.
बहुजन समाजात अशाही कथा प्रसृत केल्या की एक उल्कामुख नावाचा राजा होता .त्याच्या राणीचे नाव भद्रशीला.ती तरूण व रुपवती होती. तिच्याजवळ एक साधु आला व म्हणाला कोणतीही इच्छा असल्यास सत्यनारायणाची पुजा घाल, इच्छा पुर्ण होईल. तिने व्रत केले. सत्यनारायणाच्या कृपेने तिला अपत्य झाले. परंतु नंतर ती सत्यनारायणाचे व्रत व पुजा करणे विसरली व तिचे वाईट झाले अशा अनेक कथा भटानी बहुजन समाजात प्रसृत केल्या आहेत. ह्या कथा बहुजन समाजाला भिती दाखविण्यासाठी निर्माण करण्यात आल्या. घरी पुजा घातली नाही तर तुमचे हाल कथेतील लोकाप्रमाणे होतील. असी त्यातुन सरळ सरळ बहुजन समाजाला धमकी दिलेली आहे.
सत्यनारायण कथेच्या माध्यमातुन ब्राम्हणांची रोजगार हमी योजना सुरु झाली आहे. सरकारी कार्यालये, कंपन्या,बँका यात बिनधास्तपणे पुजा घातल्या जातात. यात सरकारी पैसा व वेळ याचा अपव्यय होत असतो. एक ब्राम्हण कर्मचारी हवा तयार करीत असतो तर बहुजन कर्मचारी कार्यक्रमाचे ओझे वाहत असतात. सरकारी कार्यालयात कोणत्याही धर्माची पुजा अर्चना हे घटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्वाची पायमल्ली करणे होय. सरकारी पैशातुन ब्राम्हणांना पोसण्याचे काम चालु आहे. हे बंद व्हायला पाहीजे. आजकाल तर काही लोक निनावी पत्रके छापतात.ही पत्रके वाचुन याच्या दोन हजार पत्रिका काढून वाटा, न वाटल्यास आपले बरेवाईट होऊ शकते. आपल्या घरातील व्यक्ती मरु शकते व घरात नेहमीसाठी अशांती राहील असा मजकूर त्यात असतो. बिचारा बहुजन अशी पत्रके पाहून धास्तावून जातो. पत्रके नाही वाटली तर आपले काही तरी होईल या भितीनेच त्याचे मानसिक संतुलन बिघडते. तो पत्रके काढून वाटतो. अशा पत्रकाच्या माध्यमातुन देवाचा व त्याच्या काल्पनीक दहशतीचा प्रसार व प्रचार होत राहावा ही त्यामागची भुमिका आहे. हे केवळ भटब्राम्हणांचे षडयंत्र आहे. बहुजन समाजाला मुर्ख बनविण्यात भटब्राम्हण पटाईत अहेत. बहुजनांना भिती दाखवीत पुजापाठाचे कार्यक्रम बहुजनांनी करीतच राहावे. ते त्यानी बंद करु नये. यासाठी ब्राम्हणाचा हा सगळा काल्पनिक कथांचा आटापीटा चालू असतो.
आता तर 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिवशी सुध्दा सत्यनारायणाच्या पुजा प्रत्येक सोसायटी मध्ये घातल्या जात आहेत. 26 जानेवारी 1950 पासुन मनुवादी धार्मिक आचारसहिंता बेकायदा ठरऊन घटनेद्वारा देशाचा राज्यकारभार चालविण्यास सुरुवात झाली. परंतु या दिवसाला सुध्दा भटा-ब्राम्हणानी कॅश करुन आपले खिसे भरण्याचे साधन बणविले आहे. बहुजनाला प्रश्न विचारावासा वाटतो की, सत्यनारायण जर अस्तित्वात होता तर या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी व प्रजासत्ताक राष्ट्र बणण्यासाठी लोकाना फासावर का जावे लागले ?, इंग्रजांच्या लाठ्या काठ्या का खाव्या लागल्या ? चळवळी का कराव्या लागल्या ? सत्यनारायण हा सर्वाचा तारणहर्ता व शक्तीमान होता तर त्याच्या एका हाकेने हा देश गुलामगीरीतुन मुक्त का झाला नाही ? लोक स्वातंत्र्यासाठी बळी गेले तेव्हा त्याना अमृतमंथाने का जिवंत केले नाही ? बहुजन हो, ज्या पेशव्यानी सत्यनारायणाच्या पुजेची प्रथा रुजविली त्यांचेही राज्य सत्यनारायणाने वाचविले नाही, तर तुम्हा बहुजनाना कसा वाचविणार ? यातुन कोणी तगणार असेल तर तो फक्त ब्राम्हणच तगणार, कारण सत्यनारायणाच्या पुजेतुन तो हजारों रुपयांची माया जमवीत असतो. म्हणून बहुजनानो तुम्हाला साथ न देणार्या, दुसर्यांचे खिसे भरणा-या सत्यनारयणाची तुम्ही पुजा का करावी ? प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) अशी पुजा करुन तुम्ही वाईट कृत्य का करावे ? सार्वजानीक पैशाचा तुमच्याकडुन अपहार का घडावा? आम्ही बहुजन याचा कधी विचार करणार आहोत की नाही ?.