Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

कुंभमेळा बहुजनाना गुलामीत ठेवण्याचे ब्राम्हणी षडयंत्र

बहुजनांचे मारेकरी  -  लेखक  बापु म. राऊत  


     मान्यतेप्रमाणे देशात चार ठिकाणी दर बारा वर्षानी कुंभमेळे भरतात. देशाच्या दक्षिण भागात सुध्दा नवीन कुंभमेळे भरायला लागले आहेत. म्हणजे एकुण सरासरी काढली तर दिड वर्षानी कुंभमेळे भरत असतात. प्रत्येक वेळेस सरकार शेकडो कोटी रुपये खर्च करते. लाखो लोक कुंभ मेळ्यासाठी येतात. 2003 साली नाशिक शहरात झालेल्या कुंभ मेळ्यात एका साधुने पैशाचे नाणे फेकले. पैसे घेण्यासाठी चेंगराचेंगरी झाली त्यात 33 लोक मृत्युमुखी पडले तर 200 लोक जायबंदी झाले. या भक्ताना तथाकथित देवाने वाचविले नाही. म्हणजे कुंभमेळ्यातील देव हे भक्ताना वाचविणारे नसतात तर मारणारे असतात हे सिध्दच होते. कुंभमेळ्यात आंघोळ केली तर सर्व पापे नष्ट होतात असा एक गैरसमज आहे. कुंभमेळा हा पाप व भ्रष्टाचार करण्यासाठीचा एक मार्ग आहे. पाप व भ्रष्टाचार करा व कुंभमेळ्यात जावून डुबकी मारा. केलेले पाप नष्ट होवून पुढचे पाप व भ्रष्टाचार करायला रान मोकळे होईल. मग परत पाप धुण्यासाठी कुंभमेळ्यात या. हे वर्षानुवर्षे चालतच राहणार आहे. याने सामाजाचा विकास होत नाही तर अधोगतीच होते. कुंभमेळ्यात आंघोळ केल्याने अनेकाना चर्मरोग व बिमार्‍या झालेल्या आहेत. कुंभमेळे हे भटब्राम्हणाचे पैसे कमविण्याचे साधन आहे तर बहुजनाचे खिसे खाली करण्याची प्रथा आहे.

     कुंभमेळ्यात येणार्‍या हजारो साधूंना पापमुक्तीची गरजच काय?. ते तर वैरागी असतात. पापमुक्त असतात. या साधुंना पापाची भिती का वाटावी.? हा देश देव देवतांनी समृध्द आहे. या देशात 33 कोटी देव आहेत तर मग या देशाची गरीबी नष्ट का होत नाही ? देवाचा एक भक्त भुका कंगाल तर दुसरा भक्त गर्भश्रीमंत. ही असमानता नष्ट का होत नाही ? देशात दुष्काळ का पडतो ? कुपोषणाने लोक मरण का पावत आहेत ? असे प्रश्न विचारण्याचा व त्याची उत्तरे शोधण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही. कोणी केलाच तर त्याला नास्तिक व धर्म विरोधी ठरविण्यात येते. समाजात गुलामीची झालर पांघरलेल्या गुलामाकडून अशा प्रश्नकर्त्याची कुचेष्टा करण्यात येते. दगडाला शेंदुर फासुन त्याला देवपण देण्याची प्रक्रिया काही विशिष्ठ लोक करीत असतात. त्यात त्यांचा स्वार्थ असतो हे जाणण्याइतका बहुजन समाज प्रगल्भ नाही.


     हिंदूधर्माचे आज व्यापारीकरण झाले आहे.देव दर्शनासाठी पैसे घेणे, नदीचे घाणेरडे पाणी पवित्र जल म्हणून विकणे, खराब तेलात काढलेली मिठाई प्रसाद म्हणून विकणे, भक्ताने देवाला वहिलेला नारळ परत मागच्या दारातून दुकानात येणे असे प्रकार राजरोसपणे चालू आहेत. हिंदू धर्म हा खोट्या व काल्पनिक गोष्टीचा समुच्चय आहे. कुंभमेळ्यात प्रथम आंघोळ कोणी करावी ? शाही मिरवणूक प्रथम कोणी काढावी ? यावर बैरागी साधु भांडण करीत असतात. मेळ्यात येणारे साधुंचे आखाडे एकमेकावर बहीष्कार टाकीत असतात. एवढेच नव्हे तर एकमेकाला मारण्याचे प्रकार घडत असतात. निर्मोही, दिगांबर, खालसा, निर्वाणी असे आखाडे आहेत. साधुंचे साधु मोठे हाय फाय असतात. यांच्याकडे मोठमोठ्या गाड्या, मोबाईल्स, मोठी सेक्युरीटी व शेकडो एकर जमिनी असतात. मोहमाया या पासुन दूर असलेल्या साधु कडे फार मोठी संपती असते. हे साधु चरस, गांजा, दारु सर्रास पिताना दिसतात. तरीही लोक नागड्या साधुच्या पाया पडत असतात. असे कुंभमेळे हे लोकाना दैववादी बनवीत असतात. इतर देशातील सरकारे लोकाना विज्ञानवादी बनवीत असतात. पण आपले सरकार लोकाना धर्मांध बनवित असते. गुंड व भ्रष्टाचारी प्रवृत्तितून तयार झालेल्या चंद्रास्वामी, नरेंद्र महाराज व आसाराम बापू सारख्या बाबांचा आदर्श समोर ठेवला जातो.

     कुंभमेळा कसा असतो ते बघायला 2003 साली नाशिकला गेलो होतो. बघीतले तर स्त्रीया नंग्या साधुच्या पाया पडत होत्या. साधु गांजा व चरस ओढत होते. अभद्र भाषेत लोकाना शिव्या देत होते. काही साधुजवळ मोबाईल व वातानुकुलीत मोटारी होत्या. भर पावसात मी व माझे मित्र प्रफुल मेश्राम व रामराव पवार त्र्यंबकेश्वरच्या पहाडीवर चढलो. रस्त्याच्या दोन्ही बाजुला बहुजन आदीवासीच्या झोपड्या आहेत. चणे-फुटाणे व पहाडीवरुन तिर्थ म्हणुन पाणी आणण्यासाठी बाटली विकण्याचा व्यवसाय करतात. वर टेकडीवर चढलो तेव्हा गोदावरीच्या उगमाजवळ असलेल्या मंदिरात एक ब्राम्हण मंदिरातील एका व्यक्ती कडुन पैशांचा हिशोब घेत होता. भट गेल्यानंतर मी त्या व्यक्तीला विचारले की तुम्ही या मंदिराची देखभाल करत आहात. त्याने तुमच्या कडून पैसे का घेतले ? तेव्हा तो बोलला आम्ही त्याचे नोकर आहोत. तो त्र्यंबकेश्वरचा भट-ब्राम्हण आहे. हजारो वर्षापासुन त्याच्या पुर्वजांची या जागेवर व मंदिरावर मालकी आहे. तो मला महीन्याला पाचशे रुपये देतो. रोज संध्याकाळी येऊन लोकानी दान केलेले पैसे घेऊन जातो. टेकडी वरच दुसर्‍या बाजुला नाथपंथीयांचे मंदीर आहे. तिथला साधु आम्हाला सिगारेट पिण्यासाठी माचीस मागीत होता. व इथे पैसे टाकल्याशिवाय पुण्य मिळत नाही असे म्हणत होता. पहाडीवरुन खाली उतरताना माचीस मागणारा साधु एका झोपडीत यथेच्छ दारु पित होता. त्रंबकेश्वरच्या पहाडीवर चमत्कारीक असे काहीच नव्हते. कोरलेल्या आखूड गुहेत काही देवांच्या मुर्त्या व पिंडी ठेवलेल्या आहेत. पण भटब्राम्हणानी त्यांच्या चमत्कारीक कथा लिहल्या. भटब्राम्हणांनी तयार केलेली तिर्थक्षेत्रे हे बहुजनांना लुबाडण्याची केंद्रे बनलेली आहेत.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209