राजर्षी शाहु महाराज :- त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा ज्योतीबा फुलेंचे हेच पवित्र कार्य हाती घेतलं. ते राजे असल्याने त्यांच्या कार्याला प्रचंड पाठबळ मिळाले त्युळे बहुजन समाजाचा सहभाग त्यांच्या करवीरसंस्थानात दिसु लागला. याबाबत त्यांना विरोधांकडुन मनस्तापही सहनकरावा लागला तरी सुद्धा त्यांनी आपल सामाजीक सुधारणेचं धोरण प्रचंड वेगाने व नेटाने चालू ठेवलं. त्यांच्या संस्थानात शैक्षणीक वातावरण त्यांनी तयार केलं. ज्या बहुजनांना शिक्षणाचा अधिकारच नाकारला गेला होता त्यांना राजदरबारी पाठबळ मिळाल्यामुळे शैक्षणीक धोरण सर्वांसाठी खुले झालं माहात्मा ज्योतीबा फुलेंचं स्वप्न त्यांनी त्यांच्या संस्थानमध्ये प्रत्यक्ष साकार केले. त्यांच्या ह्या धोरणाचा लाभ घेवुन तयार झालेल्या बहुजनांमध्ये चैतन्य व उत्साह वाढला. संधी मिळाली तर हजारो वर्षाीपासुन वंचीत राहिलेला समाज आपली क्षमता सिद्ध करू शकतो हे बहुजनांनी सहज दाखवून दिले.
आरक्षणाची कल्पना महात्मा ज्योतीबा फुलेंची आहे. या राष्ट्रपीता ज्योतीराव फुलेंच्या आरक्षणाच्या कल्पनेला लागु करण्याचे कम राजर्षी छ. शाहु महाराज व डॉ. बाबासाहे आंबेडकर यांनी केल. राजर्षी छ. शाहु महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी 50 % आरक्षणाची (ब्राह्मण, पारशी, शेणवी प्रभू या चार जाती वगळुन) घेाषणा आपल्या संस्थानात म्हणजे करवीर संस्थानात केली.