समाजसुधारकांचे कार्य :-
महात्मा ज्योतीबा फुले :- आतापर्यंत जेवढ्या समाज सुधारकांनी जनतेच्या हिताची कार्य केलेले आहेत. त्यामध्ये महात्मा ज्योतीबा फुलेंच नाव आग्रहाने घेतले जाते. महात्मा फुलेंनी सर्वसामान्य जनतेच्या प्रत्यक्ष सहभागाची संकल्पना मांडली. विविध जातीमध्ये विभागला गेलेला बहुजन समाज हा शेती संस्कृती मधुन निर्माण झालेल्या व्यावसायिकांचा गट असुन त्यांचा मुळ पुरुष एक असल्याने ठाम प्रतिपादन केलेले आहे. या सर्व जाती केवळ जाती नसुन व्यावसायीक गट असल्याचे त्यांनी ठासून सागीतले. त्यांची झालेली वाताहत ही शैक्षणीक, सांस्कृतीक, साहित्यीक, सामाजीक, मागासलेपणामुळे झाली असुन त्याच मुळ शैक्षणीक मागासले पणा मध्ये त्यांनी शोधले म्हणुन फुले म्हणतात विद्यावीना मती गेली, मतीवीना निती गेली, नतिविणा गती गेली, गतीवीना वित्त गेले एवढे अनर्थ एका अविद्येन केले. हे सर्व अनर्थ जर थोपवायचे असतील, तर विद्येला म्हणजेच शिक्षणाला, महत्त्व दिलं गेल पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी शैक्षणीक संस्था काढुन स्त्री शिक्षणाचा पाया घालता इंग्रजांमुळे शैक्षणीक धोरणाच्या प्रचार प्रसाराला त्यांना पाठबळ मिळत गेलं. महात्मा फुलेंच्या शैक्षणीक प्रसाराला इंग्रजांनी आडकाठी कधीच आणली नाही. परंतु ती या देशातील, सनातन्यांनी आणली आपल्या देशामध्ये बळीच राज्य येवो ही त्यांची प्रचंड इच्छाशक्ती होती. सनातन वृत्तीच्या विरोधाला महात्मा फुले न घाबरता आपले बहुजनांचे काम त्यांनी निरंतर चालू ठेवले.
11 मे 1888 रोजी ज्योतीबा फुले यांना मुंबईत मांडवीच्या कोळीवाड्यात जनतेने समारंभ पुर्वक महात्मा ही पदवी दिली होती. तशी पदवी गांधींना व टिळकांना कोणी दिली नव्हती गांधीना महात्मा व टिळकांना लोकमान्य हे मिडीयानेच केले होत.