पुणे करार :-
ब्रिटीशांच्या पारंपारीक भुमिकेनुसार या देशाचे हिंदु व मुस्लीम दोन वारसदार होते. परिषदेतील आंबेडकरांच्या भुमिकेमुळे अस्पृष्य वर्ग वारसदाराच्या श्रेणीत आला. परिणामत: ब्रिटीशांनी अस्पृशांसाठी स्वतंत्र मतदार सघांची घोषणा केली या घोषणेनंतर महात्मा गांधींनी 22 सप्टेंबर 1932 रोजी येरवडा कारागृह येथे (पुण्यास) आपले प्राणांतीक उपोषण केले त्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधीजींची भेट घेतली आणि चर्चा केली आणि गांधी व आंबेडकर यांच्यात करार होऊन अस्पृशांचे आरक्षणाचे तत्व महात्मा गांधी नी मान्य केले यालाच पुणे करार असे म्हंटले जाते.