बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
वर्णव्यवस्था कायम ठेऊन ब्राम्हणांचे बहुजन समाजावर वर्चस्व कायम ठेवणे. वर्णव्यवस्थेवर आधारीत समाजाची विभागणी आहे तशीच कायम ठेवण्यासाठी प्रयत्नरत राहणे व नव्या संदर्भात ती टिकवणे हे संघाचे मुख्य ध्येय आहे. संघ ही मुलतत्ववादी वंशश्रेष्ठत्वाला मानणारी पॅसीस्ट संघटना आहे. वंशश्रेष्ठत्व आणि इतर धर्मियांचा द्वेष यावर आधारित हिंदू धर्मात बहुजनाना कोणतेही स्थान नाही. केवळ ब्राम्हणांचे सामाजीक महत्व, स्थान व वैदिक मुल्याना जपणारी हिंदूत्वाची विचारधारा ही बहुजनांच्या आत्मनाशाची नांदी आहे. बहुजन विचारधारा ही स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या लोकशाही मुल्यांच्या संवर्धनाची आहे. भारतीय राज्यघटना हीच बहुजन समाजाची धर्मग्रंथ संपदा होय. त्या ग्रंथ संपदेनुसार सारे भारतीय नागरीक समान आहेत. ऊच्चनिचतेला त्यात स्थान नाही. बहुविधतेतुन परस्पर विषयक सन्मान व सह अस्तित्वाची जाणीव ही भारतीय संस्कृतीची देण आहे. संघीय विचारधारा हि बहुजनाचा केवळ गुलामीचा दस्ताऐवज ठरु शकतो. बहुजन संस्कृती हीच भारतीय संस्कृती आहे. ह्या बहुजन विचारधारेचा अभाव संघीय हिंदुत्वात असल्यामुळे संघ हि बहुजनांची मारेकरीच होय. ब्राम्हणी धर्माखाली सर्व ब्राम्हणेत्तर समाज कायमचा धार्मिक गुलाम बनून राहावा यासाठी संघाची धडपड चालु असते.
संघाच्या आजपर्यंतच्या इतिहासात संघाने कधीही जाती निर्मूलनाचे कार्यक्रम राबविले नाहीत, अस्पृश्यता विरोध, अंधश्रध्दा व स्त्रिमुक्ती साठी आंदोलन ऊभारले नाही. बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा, पिण्याच्या पाण्यासाठी व मंदीर प्रवेशासाठी जे सत्याग्रह केले त्याला संघाने कधीही पाठींबा दिला नाही उलट भारतीय जनता पक्षाने केंद्रात सत्तेवर येताच बहुजनाचा सन्मान ग्रंथ भारतीय राज्यघटना बदलविण्याची भाषा केली. रथयात्रा, गंगाजल व मंदीर वही बनायेंगे च्या घोषणानी संपुर्ण देशात अस्थिरतेचे वातावरण तयार केले. बाबरी मस्जीद पाडून हजारो लोकांच्या रक्ताचे पाट वाहविले. निरपराध बहुजन लोकाचे बळी घेण्याचे राजकारण केले. सतत खोटे बोलत राहणे हा त्यांचा कुटनितीक कावा आहे. आज ते मुसलमांनाविरुध्द लढताना इतराना सोबत घेत आहेत. मुसलमान संपले की ख्रिश्चनांविरुध्द ऊठतील, ते संपले की बहुजनांविरुध्द उठतील हा त्यांच्या रणनितीचा एक भाग आहे. देशात इतर हिंदू मरतात वा उपाशी राहतात याची चिंता संघवाद्याना नसते परंतु काश्मीर मधील पंडीताला थोडाही धक्का लागला तरी संघीय ब्राम्हणांचे पित्त खवळते. स्वत:च्या जातीचा अहंकार ब्राम्हणानी सतत तेवत ठेवलेला आहे. बहुजन समाजाला धर्माभिमानाच्या नावाखाली त्याला सतत आक्रमणकारी ठेवणे. हिंदूची मने कायम मध्ययुगीन मानसिकतेत अडकवून ठेवणे ही संघाची निती आहे.
संघवादी मानसिकते चे लोक बहुजनांच्या बेकारीचे कारण दलीतांना मिळणारे आरक्षण हे आहे असा बहुजन समाजासमोर बागुलबोवा ऊभा करीत परंतु मंडल कमिशन लागु करुन ओ.बी.सी. हा सुध्दा आरक्षणाचा फायदे घेणारा घटक झाल्यामुळे संघपरीवाराला दलीताविरुध्द लढण्यास सैनिक मिळत नाही म्हणुन ते बहुजनाला मुसलमानाविरुध्द भडकविण्याचे काम करीत आहेत. मुस्लीमांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे हिंदू समाज अल्पसंख्य बनेल, मुस्लीम राज्यकर्ते बनतील,मुसलमानाना वेगळा न्याय व हिंदुना वेगळा न्याय, हिंदू आपल्याच देशात असुरक्षित झाला आहे अशी अनेकानेक कारणांची जंत्री ते बहुजन समाजासमोर ठेऊन बहुजनाला उसकविण्याचे काम करीत आहेत तर दुसरीकडे ते बहुजनांच्या दारीद्र्याच्या अवस्थेचे कारण हे पुर्वजन्मीचे फळ आहे असे सांगुन बहुजनाच्या दारीद्र्याचे समर्थन करीत पारंपारीक श्रध्दा, रुढी व माती दगडाच्या मुर्ती याचा खुबीने वापर करीत बहुजनाना त्यात गुंतवून ठेवायचे काम मोठ्या चलाखीने चालू आहे. हिंदूधर्मातील देवीदेवतांचे स्तोम माजवून गणपती उत्सव, दुर्गा उत्सव, विजयादशमी, रामनवमी, जगन्नाथ, तिरुपती, साईबाबा यांच्या कथा लिहुन व त्याचा विविध माध्यामाद्वारे प्रसार करून बहूजन समाजाला कर्मकांडाचे वेड लावायचे कारस्थान देशात सुरु आहे. बाहेरच्या गोष्टीचा अभ्यास व चिंतन करायला बहुजनाना वेळ मिळू द्यायचा नाही हे वर्णवर्चस्ववाद्यांचे पुर्णवेळ काम आहे. बहुजन जातीला जातीनिहाय कनिष्ठ पायरीवर ठेवण्यासाठी व ऊच्चवर्णीयांची मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी बहुजनाना धर्मवेडी व श्रध्दाळू बनविण्याचे प्रयत्न सातत्याने चालु आहेत. गणपती दुध पितो या अफवेने संपुर्ण बहजन जनतेने लाखो टन दुध गणपतीवर ओतले. गणपती दुध पितो हि बातमी क्षणात जगभर पसरली. हा सारा प्रकार योजना आखून करण्यात आला. बहुजन समाज किती जागृत व किती श्रध्दाळू आहे याची चाचणी घेण्यासाठी विदेशी वैदिकानी आखलेली ही योजना होती.