Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

बहुजनांचे मारेकरी

लेखक -  बापू राऊत

प्रस्तावना

     बापुसाहेब राऊत लिखित “बहुजनांचे मारेकरी” हे पुस्तक फुले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यासाठी अतीशय महत्वाचा दस्तावेज आहे. प्रस्तुत लेखक फुले आंबेडकरी चळवळीतील एक प्रख्यात वक्ते तसेच लेखक आहेत. बहुजनांचा बुलंद आवाज “दैनिक वृत्तरत्न' सम्राट मधुन लेखकाने चळवळीसंदर्भात बरेच लेखन केले आहे. माझा लेखकाशी विशेष स्नेह ह्याकरीता की “सम्राट” ने दखल घेतलेल्या “इचगाव प्रकरणात” ज्या इचगावात मराठा मागासवर्गीय वाद पेटला होता व त्यावेळेस त्या गावातील मराठा मागासवर्गीयांची भेट घेऊन समेट घडविण्यासाठी ओबीसी सेवासंघाचा प्रतिनिधी म्हणुन मी व राऊत साहेब सोबत गेलो होतो. फुले आंबेडकरी चळवळीचे कर्तव्यनिष्ठ व्यक्तीमत्व हि थोडक्यात राऊत साहेबांची ओळख. चळवळीतील एक घनिष्ठ मित्र मान. महेंद्र गद्रे ह्यानी या पुस्तकाचे मुखपृष्ठ खैबर खिंडीतून हत्यारासहीत आलेले आर्याचे टोळके दाखऊन “बहुजनांचे मारेकरी” ह्या पुस्तकाची ओळख करून देण्यात गद्रे यशस्वी झाले आहेत.

  Bahujananche Marekari   आदिम काळात मनष्य हा सध्दा जनावराप्रमाणे वा पक्षासारखा एका भुभागावरुन दुस-या भुभागावर आपल्या शारीरिक गरजा भागविण्यासाठी स्थलांतरण करीत असे. परंतु हळूहळू मनुष्याने मानवीय संस्कृतिची निर्मिती केली व ह्या संस्कृतीमुळेच मनुष्य म्हणुन इतर प्राणीमात्रापेक्षा त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. मणुष्याने जंगली संस्कृती सोडुन नागरी संस्कृतीची निर्मीती केली. 'बळी तो कान पिळी' हा जंगलाचा कायदा सोडून त्याने मानवीय मुल्य जतन करणार्‍या कायद्याची निर्मिती केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित 'भारतिय राज्यघटना' ही ह्यातुनच निर्माण झालेली मोठी उपलब्धी आहे. प्रत्येक भारतीय नागरीकास स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणी सामाजीक न्याय प्रदान करणारी राज्यघटना आणी स्वातंत्र्याआधी वर्णव्यवस्थेवर आधारीत मनुस्मृती यातील संघर्ष आजही भारतात पहावयास मिळतो. मग तो राम मंदिराचा प्रश्न असो की शंकराचार्याची अटक. परंतु या संघर्षात भारतीय राज्यघटना मनुस्मृतीस वांरवार पराभुत करीत आहे. शंकराचार्याच्या अटकेतून कायद्यासमोर सर्व समान आहे हे प्रस्थापित झाले. तर निव्वळ बहुसंख्य हिंदुच्या जनभावनेचा आदर म्हणुन अल्पसंख्य मुस्लीमांच्या मस्जिदीला तोडुन मंदिर बांधना-यांचे मनसुबेसुध्दा राज्यघटनेने उधळून लावलेले आहे. 'मंदिर वही बनायेंगे' चा नारा देऊन देशाच्या पंतप्रधानपदावर आरुढ झालेल्या अटलबिहारी वाजपेईना सुध्दा त्यांच्या पंतप्रधानकीच्या सहा वर्षाच्या काळात मंदिर बांधता येत नाही व 'आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करु' असे म्हणत भारतीय राज्यघटनेची थोरवी मानावी लागते. मनुस्मृती हि “बहुजनांची मारेकरी” होती तर भारतीय राज्यघटना बहुजनांची उध्दारी आहे आणी म्हणुनच या देशातील अनुसुचीत जाती, जनजाती, अन्य मागासवर्गीय,अल्पसंख्यांक व मानवतावादी भारतीयांची भक्क्म साथ भारतीय राज्यघटनेला आहे. मनुस्मृतीला पोषक एकाध दुसरी घटना आजही भारतात घडते परंतु जेव्हा प्रत्यक्ष मनुस्मृतीचा कायदा होता त्यावेळेस या देशातील बहुजनांचे मारेकरी कोण होते हे समजाविण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केला आहे. बहुजनाना आपला मारेकरी कळला तर तो सावधपणे व विचारपूर्वक मार्गक्रमण करेल व यात केवळ आपला बचावच नव्हे तर मारेक-याना योग्य प्रसंगी बहुजन अद्यल हि घडवेल हा विचार हि पुस्तीका देते.  मारेकर्‍यांनाही आपला अंगरक्षक व अभ्यासक बनविणारे राष्ट्रपिता ज्योतीराव फुले ह्यांच्या विचार पद्धतीला अनुसरुनच या पुस्तिकेचे वाचन वाचकानी करावे. अशी अपेक्षा मी करतो.


     पुस्तकाचे लेखक मान.बापूसाहेब राऊत यांचे हे पहिलेच पुस्तक असल्यामुळे वाचकानीही या त्यांच्या उपक्रमास सकारात्मक प्रोत्साहन द्यावे. बापू राऊतांचे शतश: अभिनंदन करीत मी या पुस्तकास सुयश चिंतीतो.

आपलाच

प्रदीप ढोबळे



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209