Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

भारतीय समाजाच्या दुःखाचे मूळ जातिव्यवस्थेत

     जातिव्यवस्था नष्ट करण्याची खूपच कारणे दिली जाऊ शकतात. एक कारण मानसिकतेसंबंधीचे आहे. भारतीय व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये जात इतकी रुतून बसलेली असते की, तो तिच्या ओझ्याने वाकून गेलेला असतो. त्याच्या आयुष्यातील बराचसा वेळ आपल्या जातीचे रीतिरिवाज, रूढी, परंपरा, मानपान इ. बाबींमध्येच जातो. असे करणे म्हणजे काही तरी पवित्र कार्य आपण करीत आहोत असे त्याला वाटते. वस्तुतः सगळ्या बाबी म्हणजे काळाने त्याच्यावर लादलेले ओझेच असते. शिवाय या व्यवस्थेमुळे भारतातील बहुसंख्य व्यक्तींचे विश्व त्यांच्या जातीच्या बाहेर फारसे जातच नाही. त्याचे अवकाश जातीच्या सीमांनी बंदिस्त होऊन गेलेले असते. म्हणून त्यांची स्वप्नेही मर्यादित होऊन जातात. परिणामतः केवळ जगत राहणे एवढेच तो आपले जीवनकर्तव्य मानतो आणि आपल्याच बांधवांची या जोखडातून आपण जेवढी लवकर मुक्तता करू तेवढे भले होणार आहे.

    निरुपयोगी झालेल्या जातिव्यवस्थेचा किल्ला उद्ध्वस्त करणे कसे जरुरीचे आहे ते आपण पाहिले. जातिव्यवस्था आणि अर्थव्यवस्था यांचे नाते संपूर्ण तुटले आहे. हेही आपण पाहिले. परिणामतः दुसरी बाब आलेली आहे; ती म्हणजे भांडवली अर्थव्यवस्था. याचाही निर्देश वा ही बाब उदयाला ही निर्देश वर आला आहे.

     आता भांडवली अर्थव्यवस्था जर उदयाला आली असेल अतिशय प्रबळ झाली असेल, तर स्वाभाविकपणेच समाजजीवनात : प्रश्न आणि ताणतणाव निर्माण होणार.

Second Akhil Bharatiya other backward class (OBC) Sahitya Sammelan       कारण शेकडो वर्षे ज्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत लोक जग त्यातून त्यांची मानसिकता घडली होती, ती आता राहिलेली नाही, या नव्या अर्थव्यवस्थेत आपल्याला स्थान नाही याच्या जाणिवेने हतबल झाले आहेत. विशेषतः छोट्या छोट्या कारागीर जाती कारागिरीवर जगू शकत नाहीत. कारण त्यांचे व्यवसाय यंत्राने हिरावन और आहेत. परिणामतः या व्यवस्थेत ते एकदम उपरे होऊन गेले. या अर्थव्यवस्थेचा सर्वाधिक मोठा फटका ओ.बी.सी.मधल्या कष्टकरी, कारागीर जातींना बन असला तरी इतर जातीही या नव्या अर्थव्यवस्थेत होरपळून निघत आहेत. भारतभर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याही याच्या निर्दशक आहेत, असे मला वाटते.

     साधारणत: गेल्या २० ते २५ वर्षांमध्ये म्हणजे १९८० नंतर हे घडत गेले. तेव्हा खरा प्रश्न असा आहे की, गेल्या २०-२५ वर्षांमध्ये हे का वाढत गेले? औद्योगिकीकरणाची वाढ गेल्या दीडशे वर्षांतील असेल आणि आमचे विविध उद्योग देशोधडीला लागण्याची प्रक्रिया गेल्या दीडशे वर्षांत घडत गेली असेल तर तिची प्रतिक्रिया इतक्या उशिरा का आली ?

     स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आपण बाजूला ठेवू. परंतु स्वातंत्र्यानंतर पहिला ४५ वर्षे म. गांधी, पं. जवाहरलाल नेहरू यांचा प्रभाव समाजजीवनावर खुपच मोठ्या प्रमाणावर होता. परस्पर सहकार्य, सर्वधर्म समभाव, कल्याणका राज्य, बंधुता, पीडिताप्रति करुणा, समाजाचे उत्तरदायित्व अशा बाह्यांगाना संपर्ण भारताचे अवकाश भरून गेलेले होते. आपल्याला एका समृद्ध दशा उभारणी करायची आहे, या स्वप्नाने भारतीय समाज भारावून गेला होता. शिवाय स्वातंत्र्य मिळाल्याची एक ऊर्मीही होतीच. पुढे मात्र दोन प्रक्रिया घडत गेल्या. क्रमाने आपली अर्थव्यवस्था कल्याणकारी कार्यक्रम गुंडाळून ठेवून भांडवली व्यवस्थेकडे निघाली. पुढे १९९० पासून पुढे तर जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आपला देशही अडकून गेला. त्यातून अर्थव्यवस्था बदलू लागली. ती जसजशी बदलू लागली तसतशी दुसरी प्रक्रिया सुरू झाली. म. गांधी आणि पं. जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव क्रमाने ओसरू लागला. स्वातंत्र्य मिळाल्याची धुंदीही कमी होऊ लागली आणि भारतीय समाज एका प्रखर वास्तवावर येऊन उभा राहिला. ते वास्तव म्हणजे जीवघेणी स्पर्धा असलेली भांडवली अर्थव्यवस्था. या व्यवस्थेमध्ये उदारता, बंधुता, समता, सर्वधर्म समभाव इ. कल्पनांना मुळीच जागा नसते. ती एक कठोर अशी व्यवस्था असते. जातिव्यवस्थेत हजारो वर्षे वावरलेल्या भारतीय मानसाचा श्वास या नव्या व्यवस्थेत कोंडू लागला. आणि मग सुरू झाली एक प्रक्रिया. ती म्हणजे जातींचे संघटन करणे आणि काही तरी मिळविण्याचा प्रयत्न करणे. त्यातून शेकडो जात-संघटना उभ्या राहिल्या आणि त्या स्वतःच्या जगण्यासाठी काही तरी मागू लागल्या. या प्रक्रियेतून समाज पेटून निघत असेल तर ते भांडवली अर्थव्यवस्थेला हवेच आहे !



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209