Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन, पुणे (२००६) अध्यक्षीय भाषण

     दि २६ जुलै १९०२ रोजी लोकराजे छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर ससंस्थांना मध्ये शूद्रातिशूद्रांना ५० टक्के आरक्षण देऊन एका नव्या क्रांतीचे बिगुल फुकले होते. त्याहीवेळी वर्णवर्चस्ववादी संस्कृतिवाद्यांनी प्रचंड प्रक्षोभ व्यक्त करीत विरोध केला होता. त्याच जिनोमचे आमचेच भाईबंध आजही विराध करीत आहेत. अरे बाबा, आम्ही तुमचेच ना ! आम्ही तुमच्याबरोबर यायला नको  ! का रे बाबा ! आम्ही कोणी दसरे नाही रे बाबा ! आम्ही तुमच्याचसारखे. आम्ही हजारो वर्षांपासून फार माघारलेले; त्याची कारणंही जापण जाणताहात ना? मग का रे बाबा असा कठोर विरोध? अरे, आम्ही खरच सर्वच बाबतीत फार-फार माघारलेले; इतके की आमच्यापैकी लाखो मळघाट आणि गडचिरोलीत कुपोषणाने तडफडत मरत आहेत. 

     'मूल आईला हुंदकत म्हणाले  
     'आई गं, मला फार भूक लागली' 
     'मग माझे मांस खा' 
     'मला तुझे मांस खायची हिंमत होत नाही' 
     'मग तुझ्या बापाचे खा 
     त्याचेही खायची हिंमत होत नसेल
      तर तुझे तूच खा 
      बेटा, देशासाठी किमान तुला 
      एवढेतरी आता करता आले पाहिजे
     अशावेळी आपल्याला 
      आपलेच मांस मन लावून खाता आले पाहिजे.'
 
     बाबांनो, अशी अवस्था आजही आमच्यापैकी करोडोंची आहे. आमच्या वाट्याला आजवर फक्त, बेरोजगारी, उपासमार आणि प्रचंड उपेक्षा येत होती आणि आजही येत आहे. म्हणून आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून त्यात आमच्यावरचा अन्याय दूर व्हावा, आम्हालाही तुमच्यासारखं जगता यावं, सुखाचे चार नाही तर किमान दोन दिवस आम्हालाही बघता यावे म्हणून कलम ३४० मध्ये आरक्षण नमूद केले. अशी वेळ त्यांच्यावर - आमच्यावर आपण येऊ दिली नसती, तर आम्ही कायद्याला मदत मागितली नसती. अन् आमचा बाबाही या भानगडीत पडला नसता बाबा.

     बाबांनो, केंद्र सरकारने आम्हा ओबीसींना लागू केलेल्या शिष्यवृत्तीत आमच्या छत्रपती शाहूंच्या महाराष्ट्रात आमच्याच राज्यकर्त्या बांधवांनी २९ ऑगस्ट २००६ पासून ५० टक्के कपात करून टाकली, आमचेच लोक आमच्यावर असा अन्याय करतात. बाबांनो, या आधीही दि. ६ ऑक्टोबर २००३ रोजी असाच, उपद्व्यापी निर्णय एकदा घेण्यात आला होता. बाबांनो आता आम्हाला पुन्हा ५०टक्के शिष्यवृत्तीसाठी ५२ टक्के आंदोलन करावेच लागेल ना!

     आमचे नेते आ. गणगणे आणि आमच्या राज्य संघर्ष समितीच्या संघर्षशील प्रयत्नाला मा. ना. विलासराव देशमुख मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी हिरवी झेंडी दाखवून त्या वेळी शिष्यवृत्ती लागू केली याबद्दल ते खऱ्या अर्थाने "ओबीसी मित्र' ठरले आहेत. पण आता हीच शिष्यवृत्ती ५०टक्के कपातीत आल्यामुळे आम्ही चिंताग्रस्त आहोत आणि आता खासगी कॉलेजेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शासनाने बंद केल्यामुळे हे विद्यार्थी हवालदिल झालेले आहेत. यात प्रामुख्याने गरीब शेतकऱ्यांची मुले आहेत. ही शिष्यवृत्ती त्वरित पुन्हा लागू करावी, अशी आमचे ओबीसी मित्र मा. ना. विलासराव देशमुख यांना आमची कळकळीची विनंती आहे.
तसेच महाराष्ट्रात २७ टक्के आरक्षण ओबीसींना लागू व्हावे. ८ टक्क्याची कपात तामिळनाडू किंवा साऊथ पॅटर्नने भरून काढावी आणि गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींशी होत असेलला पक्षपात दूर करावा.

     येथे उपस्थित मर्द हो; आपण या निर्णयाच्या विरोधासाठी या क्षणापासून एल्गार कराल ना? बोला माझ्या मित्रांनो ! मग शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळेस्तो म. रा. संघर्ष समितीचा संघर्ष चालूच राहील असा निर्धार करा अन् आजपासून संघर्षाला लागा. “असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही." असा आमच्या वृत्तीचा बाणा आहे. 


     ओबीसींना साहित्य संमेलन भरवायची गरज आज भासली. हे उत्तम झाले. ते याआधीच व्हायला हवे होते. पण त्याकरिता तसे नेतृत्व लागते - अन् ते आता आमच्या सुधाकरभाऊ गणगणेमुळे आम्हाला लाभले. त्यांना जाणवलं की, ओबीसी वर्गातील प्रज्ञावंत-कलावत एकत्र आले आणि मोठा परिणाम दिसून येईल. प्रज्ञावंतांची जनजागरण झाले तर परिवर्तनात फार मोठा परिणा वाणी आणि सृजनशील लेखण्यांनी बंदुकीना अन रोमणांनी बंटकींना अनेकदा हरविले आर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास त्याची साक्ष आहे. 

     ज्या समाजाची सांस्कतिक उंची जास्त, तो समाज अधिक श्रीमंत सोन्याचा मुकुट धारण करणारा समाजही त्याची बरोबरी करू शकत नाही. 

      Akhil Bharatiya other backward class (OBC) Sahitya Sammelan बाबानो, आमची कास्तकार माय कशी जगते तुम्हाला ठाऊक आहे? सांगतो बघा; ती वयाच्या १५-१६ पर्यंत कसंबसं शिकत-शिकत बाप शेतात राबते. रोज शेतात बापाची शिदोरी घेऊन जाते. पोरगी पुनवेवाणी अगात भरत आल्याचे बघन माय-बाप तिच्या लग्नाचा विचार करतात प्रसंगी शेताचा तुकडा सावकाराच्या घशात घालतात. कर्ज काढतात नि लेकीचं लग्न ठरवतात. लेकीला घरातली ही हळदीची चाहूल सुखावन टाकत. आता आपल्याला एक नवं लुगडं मिळेल आणि गळ्यात सोन्याच्या मण्याचं डोरलं राहील.' या कल्पनेनं ती एकदम हरखून जाते. लग्न होते; ती सासरी नांदायला जाते. माहेरी तिला बापाची शिदोरी तयार करून शेतावर जावं लागायचं. आता नवऱ्याची शिदोरी घेऊन शेतावर जावं लागतं. राबराब राबता-राबता तिला दिवस जातात. तिच्या उदरी लेकरू जन्माला येतं. ते पुढं मोठं होतं. शिकायला पुण्यासारख्या गावी येतं. तिकडे माय हाडाची काडं करीत सतरा गाठीचं लुगडं सांभाळीत सारखी राबत असते. गावातली मालगुजार बाई तिला टोकते; म्हणते, “अगं ए- यमुने, तुझं लुगड्यातून सारं अंग दिसतं. एखाद-दुसरं लुगडं का घेत नाहीस?" त्यावर ती मोठ्या आशेनं उत्तरते-“बाईसाहेब घेईल की, माझा लेक तिकडं पुण्यात नौकरीला लागला की, आपल्या पहिल्या पगारातून तो मला एक नवं कोरं लुगडं घेईल." या आशेवर राबता राबता एके दिवशी ती शिवारात कोलमडून पडते. शेतातील लोक तिला उचलून तिच्या घरी आणतात. तिचं प्राणपाखरू उडालेलं असतं. घरात उंदराला खायला दाणा नाही. नवरा आजारी. तिला तिच्या स्वप्नातलं नवं लुगडं मिळतं, ते गाव वर्गणीतून। तिच्या बेरोजगार लेकापर्यंत तिच्या शेवटच्या इच्छेचा निरोपही पोचलेला नसतो.

     सांगा, माझ्या भावा-बहिणीनो आम्ही मागितलेले नव्हे, तर आम्हास घटनेने दिले ते आरक्षण आम्ही अंमलात आणले, तर त्यासाठी एवढा दुजाभाव का माझ्या भावंडांनो ? 



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209