Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

तरुण राजकीय कार्यकर्त्यांना पत्र - शहिद भगतसिंग

     (शासनसंस्थेच्या) स्वरुपाबद्दल बोलायचे तर आज आपल्या इथे दोन गृहे आहेत. बऱ्याचजणांचे मत असे आहे की वरिष्ठ सभागृह असणे ही केवळ एक भांडवली अंधश्रद्धा किंवा झालर आहे. माझ्या मते एकच गृह असणारे शासनाचे स्वरूप हे सर्वात चांगले ठरेल. 

     प्रांतीय स्वायत्ततेचाही उल्लेख येथे करायला पाहिजे. पण मी जे काय ऐकले आहे त्यावरून मी एवढेच म्हणू शकतो की वरून लादलेला. प्रांतांच्या विधिमंडळांच्या वर असणारा व विशेष अधिकार असलेला गव्हर्नर म्हणजे जुलमी सत्ताधीशापेक्षा वेगळा काही असू शकणार नाही. याला प्रांतांच्या स्वायत्ततेऐवजी प्रांतांवरची हुकुमशाही म्हणणेच जास्त योग्य ठरेल. शासनसंस्थेचे लोकशाहीकरण करण्याचा हा फारच चमत्कारिक प्रकार आहे.

     तिसरा मुद्दा अगदी स्पष्ट आहे. ब्रिटिशांची पोतडी संपेपर्यंत दर दहा वर्षांनी सुधारणांचा एक हप्ता देण्याचे माँटेग्यूचे आश्वासन रद्द करून घेण्याचे प्रयत्न गेल्या दोन वर्षामध्ये ब्रिटिश राजकारणी मंडळीनी चालवले आहेत.

     भविष्याबद्दल त्यांनी काय ठरवले आहे हे आपण पाहू शकतो.

     सध्याच्या परिस्थितीची चर्चा केल्यानंतर आपण कृतीची दिशा कोणती घ्यायची व आपला पुढचा कार्यक्रम काय असावा याची आता चर्चा करू. 

letters to young political activists - Shaheed Bhagat Singh

     अगोदरच मी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही क्रांतिकारक पक्षाला निश्चित असा कार्यक्रम असणे अत्यंत आवश्यक असते. कारण क्रांती म्हणजेच कृती करणे, हे तुम्ही जाणले पाहिजे. क्रांती म्हणजे संघटित व पद्धतशीर कार्याद्वारा जाणीवपूर्वक घडवून आणलेला बदल, तो एखाद्या अचानक, असंघटित व उत्स्फूर्तपणे घडणाऱ्या बदलाच्या वा उलथापालथीच्या अगदी विरुद्ध स्वरूपाचा असतो आणि कार्यक्रम निश्चित करण्यासाठी अभ्यास करणे आवश्यक असते.

  • अंतिम ध्येय 
  • जेथून आपण सुरुवात करायची आहे ती पूर्वस्थिती; म्हणजेच आज अस्तित्वातअसणारी परिस्थिती 
  • कृतीची दिशा, म्हणजेच कार्याची साधने आणि पद्धती 

     या तीन घटकांची स्पष्ट कल्पना असल्याशिवाय कार्यक्रमाविषयी काही बोलणेही शक्य नाही.

     सध्याच्या परिस्थितीची चर्चा आपण काही प्रमाणात केली आहे. अंतिम ध्येयाची सुद्धा थोडीशी ओळख करून घेतली आहे. आपल्याला समाजवादी क्रांती घडवावयाची आहे आणि तिची अत्यावश्यक पहिली पायरी आहे राजकीय क्रांती. आम्हाला हे हवे आहे. राजकीय क्रांतीचा अर्थ हा नव्हे की राज्यसंस्था (किंवा ढोबळमानाने बोलायचे तर सत्ता) केवळ ब्रिटिशांच्या हातातून भारतीयांच्या हातात घेणे, तर ती अशा भारतीयांच्या हाती येणे की ज्यांना आपले अंतिम ध्येय मान्य आहे. आणखी स्पष्ट बोलायचे तर क्रांती म्हणजे जनसमुदायांच्या पाठिंब्याद्वारा क्रांतिकारक पक्षाच्या हातात सत्ता येणे. त्यानंतर पुढचे काम म्हणजे संपूर्ण समाजाची समाजवादी पायावर पुनर्रचना करण्याचे कार्य संघटित करणे. क्रांतीचा हा अर्थ तुम्हाला अभिप्रेत नसेल तर माफ करा. 'इन्किलाब झिंदाबाद असे ओरडणे थांबवा. निदान आम्हाला तरी क्रांती हा शब्द इसका पवित्र वाटतो की त्याचा थिल्लर गैरवापर होता कामा नये. तुम्ही जर असे म्हणाल की तुम्हाला राष्ट्रीय क्रांती हवी आहे आणि तुमच्या लढ्याचे उद्दिष्ट भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना हे आहे तर मी तुम्हाला विचारतो की ही तुमची क्रांती घडवण्यासाठी तुम्ही कोणत्या शक्तीवर विसंबायचे ठरवले आहे? राष्ट्रीय असो वा समाजवादी असो. कोणतीही क्रांती करू शकणाऱ्या एकमेव शक्ती शेतकरी, कामगार याच आहेत. काँग्रेसच्या नेत्यांकडे या शक्तींना संघटित करण्याइतके धैर्य नाही. ह्या चळवळीत तुम्ही हे पाहिले आहे. या शक्तींविना आपण हतबल ठरू ही गोष्ट इतर कोणाहीपेक्षा त्यांना जास्त चांगली ठाऊक आहे. जेव्हा त्यांनी पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत केला आणि पूर्ण स्वराज्याचा अर्थ खरोखरीच क्रांती असा होतो तेव्हा वस्तुतः त्यांच्या मनात ते नव्हते. तरुणांच्या व्यावामुळे त्यांना तसे करणे भाग पडले आणि मग एक धमकी म्हणून या घोषणांचा वापर करून, ब्रिटिशांकडून त्यांना अत्यंत प्रिय असलेली एक गोष्ट मिळवायची होतीवसाहतीचे स्वराज्य (डोमिनियन स्टेटस). काँग्रेसच्या गेल्या तीन अधिवेशनांमधील ठराव अभ्यासून तुम्ही याबाबत सहज मत ठरवू शकता. कलकत्याला त्यांनी एका वर्षात डोमिनियन स्टेटस मागणारा ठराव संमत केला, कारण नाहीतर त्यांना पूर्ण स्वराज्य हे ध्येय ठरवणारा ठराव संमत करावा लागला असता. मग ३१ डिसेंबर १९२९ च्या मध्यरात्रीपर्यंत त्यांनी अशी काही भेट आपल्या पदरात पडते का याची गंभीरतापूर्वक वाट पाहिली. ती न लाभल्यानेच पूर्वी आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांना पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करावा लागला. न पेक्षा त्यांना ते नको होते. पण त्यानंतरही महात्माजींनी तडजोडीसाठी दार अजून उघडे आहे हे काही गुपित ठेवले नव्हते. खरी वृत्ती ती होती. सुरुवातीलाच त्यांना पक्के ठाऊक होते की आंदोलनाची सांगता कोणत्या ना कोणत्या तडजोडीतच होणार आहे. हाच तो अर्धवट उत्साहीपणा ज्याचा आम्हाला राग आहे, संघर्षाच्या एखाद्या अवस्थेत एखादी तडजोड करणे याचा आम्हाला राग नाही. असो. आपण चर्चा याची करत होतो की कोणत्या शक्तींच्या आधारे क्रांती होऊ शकते. पण जर तुम्ही शेतकरी व कामगारांकडे जाऊन त्यांचा क्रियाशील पाठिंबा उभा करणार असाल तर मला एक सांगू द्या की ते तुमच्या भावनाविवश बोलण्याने भुलणार नाहीत. ते तुम्हाला परखडपणे विचारणार की ज्या क्रांतीकरता तुम्ही त्यांना त्याग करायला सांगत आहात तिच्यातून त्यांना काय मिळणार आहे? हिंदुस्थान सरकारच्या शिरोभागी लॉर्ड रीडिंग असो वा सर पुरुषोत्तमदास ठाकूरदास, त्यांना काय फरक पडणार आहे? लॉर्ड आयर्विनची जागा सर तेजबहाद्दूर सऱ्यांनी घेतली तर शेतकऱ्याला त्याचे काय हो? त्याच्या राष्ट्रीय भावनेला आवाहन करण्याचा काही अयोग नाही. तुमच्या उद्दिष्टप्राप्तीसाठी तुम्ही त्याला 'वापरून घेऊ शकणार नाही. क्रांती ही त्यांची असणार आहे व त्यांच्या भल्यासाठी असणार आहे असे आधी मनोमन तुम्हाला वाटले पाहिजे आणि ते तुम्ही त्यांना समजून सांगितले पाहिजे. सर्वहारा वर्गासाठी, सर्वहारा वर्गाची क्रांती.

     जेव्हा तुमच्या ध्येयाची अशी सुस्पष्ट संकल्पना तुम्ही नक्की केलेली असेल तेव्हा तुम्ही उत्साहाने तुमच्या आधारभूत शक्तींना कृतीसाठी संघटित करायला लागू शकाल. आता दोन वेगवेगळ्या टप्प्यांमधून तुम्हाला जावे लागेल. पहिला टप्पा तयारी आणि दुसरा कृती.

     सध्याचे आंदोलन संपुष्टात येईल तेव्हा प्रामाणिक क्रांतिकारक कार्यकर्त्यांमध्ये घृणा आणि काहीसे नैराश्य आलेले तुम्हाला आढळून येईल. पण तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. भावनाविवशता बाजूस सारा वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. क्रांती ही एक अतिशय अवघड कामगिरी आहे. क्रांती करणे हे कोणाही एका माणसाच्या कुवतीच्या पलीकडचे आहे. तसेच ती एखादी महर्जाची तारीख ठरवूनही घडवून आणता येत नसते. विशिष्ट सामाजिक व आर्थिक परिस्थितीतून ती घडत असते. परिस्थितीने अशा समोर ठेवलेल्या संधीचा उपयोग करून घेणे हे सुसंघटित पक्षाचे कार्य असते आणि जनसमुदायांची तयारी करणे व क्रांतीच्या शक्तींना संघटित करणे हे फार अवघड काम असते. त्यासाठी क्रांतिकारी कार्यकर्त्यांना अत्यंत मोठा त्याग करावा लागतो. एक मला स्पष्ट करू द्या-जर तुम्ही एखादे व्यवसाय करणारे असाल किंवा सुस्थिर लौकिक अथवा प्रापंचिक जीवन जगणारे असाल तर कृपा करून या आगीशी खेळू नका. एक नेता म्हणून पक्षाला तुमचा काही एक उपयोग होणार नाही. आपल्याकडे मुबलक नेते आहेत की जे संध्याकाळचे काही तास भाषण करण्यासाठी मोकळे काढतात. त्यांचा काही उपयोग नाही. लेनिनचे शब्द वापरायचे तर आपल्याला व्यावसायिक क्रांतिकारकां' ची गरज आहे. अशा पूर्णवेळ कार्यकर्त्याची गरज आहे की क्रांतीव्यतिरिक्त ज्यांना दुसऱ्या कोणत्याही आकांक्षा नाहीत वा आयुष्य नाही. असे जितके जास्त कार्यकर्ते एका पक्षामध्ये संघटित होऊन काम करतील तितकी यशाची शक्यता जास्त.

     पद्धतशीरपणे पुढे जायचे तर, सर्वात जास्त जर कशाची गरज असेल तर अशा एका पक्षाची की ज्यात वरील प्रकारचे. सुस्पष्ट विचार असलेले. तीक्ष्ण आकलनब द्धी असलेले व पुढाकार घेऊन त्वरित निर्णय घेण्याची क्षमता असलेले कार्यकर्ते आहेत. या पक्षाची शिस्त पोलादी असेल. तो भूमिगत पक्षच असायला पाहिजे याची जरूरी नाही. खरे तर उलटेच आहे. तरी आपणहून तुरुंगात जाण्याच्या धोरणामुळे काहींना भूमिगत जीवन जगणे भाग पडेल. त्यांनीही आपले कार्य तेवढ्याच उत्साहाने पार पाडले पाहिजे आणि कार्यकर्त्यांच्या याच गटातून, खरीखुरी संधी येईल तेव्हा उपयोगी पडतील असे तयारीचे कार्यकर्ते निर्माण होतील.

     पक्षाला कार्यकर्त्यांची जरूरी आहे आणि फक्त युवक चळवळीतून त्यांची भरती करून घेता येईल. म्हणून युवक आंदोलन हा आपल्या कार्यक्रमाचा प्रारंभबिंदू आहे. युवक आंदोलनाने अभ्यासवर्ग संघटित केले पाहिजेत; व्याख्याने केली पाहिजेत; पुस्तके, पुस्तिका, पत्रके, नियतकालिके प्रकाशित केली पाहिजेत. राजकीय कार्यकत्यांची भरती करणे व त्यांना प्रशिक्षण देणे यासाठी हे सर्वोत्तम काम आहे.

     जे विचारांनी परिसक्व बनले आहेत व ध्येयासाठी जीवन वाहून टाकण्याची स्वत:ची तयारी आहे असे ज्यांना वाटते आहे अशा युवकांना पक्षामध्ये घेता येईल. पक्षातील कार्यकर्त्यांनी युवक चळवळीला सतत मार्गदर्शन केले पाहिजे व तिचे नियंत्रण केले पाहिजे. पक्षाने आपल्या कामाला जनसमुदायामध्ये प्रचार कार्य करण्यापासून सुरुवात केली पाहिजे. हे अत्यंत आवश्यक आहे. गदर पार्टीच्या (१९१४-१५) प्रयत्नांना अपयश येण्याचे एक मूलभूत कारण म्हणजे जनसमुदायांमधले आंदोलनाविषयीचे अज्ञान, उदासीनता व कधी कधी त्यांनी केलेला सक्रिय विरोध आणि याखेरीजही, शेतकरी-कामगारांची सक्रिय सहानुभूती प्राप्त करून घेणे व त्यांना संघटित करणे यासाठीसुद्धा अशा प्रचारकार्याची गरज आहे.

     अशा पक्षाचे नाव कम्युनिस्ट पक्ष असे असायला हवे. राजकीय कार्यकर्त्यांच्या या पक्षाची बांधणी कडक शिस्तीची हवी व त्याने इतर सर्व चळवळींची हाताळणी करायला हवी, त्यालाच शेतकऱ्यांचे व कामगारांचे पक्ष संघटित करावे लागतील, कामगार संघटना उभ्या कराव्या लागतील आणि पुढे काँग्रेस व इतर राजकीय संस्था काबीज करण्याचाही प्रयत्न करावा लागेल. राजकीय जागृती करण्याकरता, केवळ राष्ट्रीयच नव्हे तर वर्गीय राजकारणाच्या जाणीवा निर्माण करण्याकरता, प्रचंड प्रकाशन मोहीम संघटित करावी लागेल. सर्व त-हेच्या प्रश्नावर प्रचार करून समाजवादी सिद्धांताचा प्रकाश जनसमुदायापर्यंत पोचवण्यासाठी पुस्तके सहज उपलब्ध होतील व व्यापक प्रमाणावर प्रसृत होतील हे पाहिले पाहिजे. 

     कामगार चळवळीत काही मूर्ख कल्पना बाळगणारे काही लोक आहेत; त्यांना असे वाटते की राजकीय स्वातंत्र्य मिळवल्याशिवाय शेतकरी व कामगारांना आर्थिक मुक्ती मिळू शकेल. हे लोक नुसते बडबडे तरी आहेत किंवा त्यांच्या डोक्यात गोंधळ तरी आहे. असले विचार कल्पनेच्याही पलिकडचे व चुकीचे आहेत. आम्हालाही जनतेची आर्थिक मुक्ती हवी आहे आणि त्याचसाठी आम्ही राजसत्ता हाती घेण्याकरता धाडत आहोत. यात शंका नाही की प्रारंभी आपल्याला या वर्गाच्या लहानसहान आर्थिक मागण्या व सवलती यांच्याकरता लढावे लागेल. पण हे लढ़े म्हणजे राज्यसत्तेसाठी करायच्या अंतिम लढ्याकरता त्यांना शिक्षण देण्यासाठी अवलंबण्याचा मार्ग आहे. साधन आहे. 

     या सर्वाशिवाय पक्षाची एक संघटित सैनिकी शाखा असणे आवश्यक आहे. हे अतिशय महत्वाचे आहे. काही वेळा अशा येतात की जेव्हा सैनिकी बळाची तीच गरज भासते. पण त्यावेळी काही असे दल बांधणे व त्याला पुरेशी साधनसाम्बी अलब्ध करणे तुम्हाला शक्य नसते. कदाचित याच विचारावर अतिशय काळजीपूर्वक स्पष्टीकरण मी करायला हवे. कारण या विषयावरच्या माझ्या विचारांचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची फार मोठी शक्यता आहे.

     दिसायला असे दिसते की मी एखाद्या दहशतवाद्यासारखे वागलो आहे. पण मी दहशतवादी नाही. मी क्रांतिकारक आहे की ज्याने एका दीर्घकालीन कार्यक्रमाविषयी काही निश्चित विचार केलेला आहे. ज्याची चर्चा येथे आपण करत आहोत. माझे साथी ('कॉमेड इन आर्स) कदाचित रामप्रसाद बिस्मिल यांच्याप्रमाणे माझ्यावर असा आरोप करतील की फाशीच्या कोठडीत दिवस कंठताना माझ्या मनाची काही वेगळीच प्रतिक्रिया झालेली आहे. माझ्या मनाची चलबिचल झाली आहे. पण हे सत्याला धरून होणार नाही. तुरूंगाच्या बाहेर असताना माझ्या ज्या कल्पना होत्या, ज्या निष्ठा होत्या, जी जिद्द व जी प्रेरणा होती ते सर्व आजही तसेच आहे-नव्हे, जास्त चांगल्या प्रकारचे आहे. येथे मी वाचकांना इशारा देऊ इच्छितो की माझे शब्द त्यांनी काळजीपूर्वक वाचावेत. दोन ओळींच्या मध्ये त्यांनी काही दुसरेच वाचण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या सर्व शक्तीनिशी मी घोषित करतो की मी दहशतवादी नाही, व कदाचित माझ्या क्रांतिकारक जीवनाचा अगदी आरंभीचा काळ वगळला तर मी कधीच दहशतवादी नव्हतो, त्या पद्धतीने आपण काहीही मिळवू शकणार नाही अशी माझी खात्री झाली आहे. हिंदुस्थान सोशालिस्ट सिब्लिकन असोसिएशनच्या इतिहासावरून याचा निवाडा तुम्हाला करता येईल. आमच्या सर्व कार्याचे उद्दिष्ट एकच होते-त्या महान आंदोलनाची सैनिकी शाखा या नात्याने आम्हाला त्या आंदोलनाशी एकरूप व्हायचे होते.

     जर माझ्या प्रतिपादनाविषयी कोणी गैरसमज करून घेतले असतील तर त्याने स्वत:चे विचार सुधारून घ्यावे. मला असे म्हणायचे नाही की बॉम्ब आणि पिस्तुले निरुपयोगी असतात. उलट ती उपयुक्तच असतात. पण माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की केवळ बॉम्ब फेकणे हे निरुपयोगीच नव्हे तर कधी कधी हानिकारकही असते. पक्षाच्या सैनिकी शाखेने कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत वापरण्यासाठी जे काही गोळा करता येईल ते सर्व युद्धसाहित्य सदैव सज्ज ठेवले पाहिजे. तिने पक्षाच्या राजकीय कार्याची पाठराखण केली पाहिजे. पण ती स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाही व तिने तसे करणे योग्य नाही.

     या वर दिग्दर्शित केलेल्या मार्गाने पक्षाने आपले काम केले पाहिजे. नियतकालिक बैठका व परिषदा घेऊन पक्षाने आपल्या कार्यकत्यांचे सर्व विषयांवर शिक्षण व प्रबोधन केले पाहिजे.

     जर तुम्ही या धोरणाने काम सुरू करणार असाल तर तुम्ही अत्यंत शांत चित्त व साक्षेपी बनायला हवे. हा कार्यक्रम पूर्ण करायला किमान वीस वर्षे आवश्यक आहेत. 'दहा वर्षात क्रांती करण्याची तारुण्य सुलभ स्वप्ने दूर फेका. 'एका वर्षात स्वराज्य मिळवण्याची गांधीजींची मनोराज्ये टाकून द्या. क्रांतीला ना भावनाविवशतेची गरज आहे. ना मृत्यूला कवटाळण्याची. तिला गरज आहे सततच्या संघर्षमय जीवनाची, धीरोदत्तपणे यातना सहन करण्याची आणि त्यागाची. पहिल्या प्रथम तुमची व्यक्तिकेद्रितता चिरडून टाका. व्यक्तिगत सुखासमाधानाची स्वप्ने गळून जाऊ द्या. नंतर कामाला सुरुवात करा. तुम्हाला इंचाइंचाने पुढे जावे लागेल. त्यासाठी धैर्याची, चिकाटीची आणि अतिशय दृढ निर्धाराची गरज आहे. मग कोणत्याही अडचणी अन् कोणतेही कष्ट तुम्हाला नाउमेद करणार नाहीत. कोणत्याही अपयशाने व विश्वासघाताने तुम्ही खचणार नाही. तुमच्यावर लादलेल्या कोणत्याही यातनांनी तुमच्यातली क्रांतिकारक जिद्द विझून जाणार नाही. दुःखक्लेशांच्या आणि त्यागांच्या अग्निदिव्यातून तुम्ही विजयी होऊन बाहेर पडाल आणि असला हा प्रत्येक व्यक्तिगत विजय क्रांतीच्या साधनसामुग्रीच्या खजिन्यात पडलेली अमोल भर असेल. Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209