बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
या देशात ब्राम्हण हेच हुशार आहेत. त्यांच्यामुळेच देश चालत आहे. देशाला सुध्दा ब्राम्हणांमुळेच स्वातंत्र्य मिळाले आहे असा बकवास ब्राम्हणवर्ग नेहमी करीत असतो. त्यासाठी ते त्यानीच लिहलेला इतिहास समोर करतात. बहुजनाच्या क्रांतीकारी पुरूषाच्या पराक्रमाची दखल घेण्यातच येत नाही. इतिहास लिहण्याची जबाबदारी ब्राम्हणावरच असल्यामुळे ते बहुजनांच्या हिरोंना झिरो बनवितात तर ब्राम्हणांतील झिरोना हिरो बणवितात. बहुजनातील ऊमाजी नाईक, क्रांतीसिह नाना पाटील, बिरसा मुंडा, म.ज्योतिराव फूले, अहिल्याबाई होळकर, सावित्री बाई फुले व झलकारी बाई हे पराक्रमी वीर व महानायक दिसत नाही. मात्र माफीनामा लिहुन स्वत:ची सुटका करवून घेणारे व 1942 च्या चलेजाव व भारत छोडो चळवळीला विरोध करणा-या विनायक दामोदर सावरकराला ते स्वातंत्र्यवीर ही पदवी देतात. एकदा संसदेत देवगौडा प्रधानमंत्री असताना त्यानी काही सेकंदासाठी डोळे मिटले होते होते तेव्हा बाहेर चर्चा होती देखो देश का प्रधानमंत्री संसदमे सोता है परंतु अटलबिहारी वाजपेयी जेव्हा संसदेत झोपले तेव्हा तेच लोक म्हणत देखो देश का प्रधानमंत्री सोते सोते चिंतन करा रहा है. यात विडंबना हि आहे की एकाच देशाच्या दोन प्रधानमंत्र्याना एकाच कारणासाठी दोन वेगवेगळे निकष लावण्यात आले. पुण्यात झालेल्या प्लेग च्या साथीत सर्व जातीच्या स्त्रियाना जबरदस्तीने एकाच ठिकाणी कोंबून ठेवण्यात आले या गोष्टीचा संताप येऊन रॅडचा खुन करणा-या व बहुजन विद्यार्थ्याच्या सत्कार समारंभाचा मंडप जाळणा-या चाफेकर बंधुना क्रांतीकारी संबोधण्यात येते. बळवंत फडक्याला आद्य क्रांतीकारक ठरविले जाते.
हिंदूत्ववाद्याची एक आवडती घोषणा आहे "पहले कसाई बादमे ईसाई". बाबरी मस्जिद पाडून त्यांनी मुसलमानाना इशारा दिला आहे. तर फादर स्टेन्स ला त्यांच्या दोन लहानग्यासह जीवंत जाळुन आपला अमानुषपणा दाखविला. हिटलर, मुसोलिनी यांच्या फॅसीस्ट उगमस्थान असलेल्या वैदिक आर्यांच्या संस्कृतीच्या वंशजानी आज या देशाच्या लोकशाही व स्वातंत्र्यापुढे मोठे आव्हान उभे केले. विदेशी वैदिकांचे वंशज विक्रम सावरकर ब्राम्हणेतराना सांगतात की "जिवनातील परमोच्च श्रेय हे हिंदुने आयुष्यात एकतरी मुसलमान ठार करणे होय" असे रानटी आव्हान मुळनिवासी बहुजन करु शकत नाही. एखाद्या मुसलमानाने असे विधान केले असते तर संघाच्या पिलावळीने 'देश खतरे में है' असे म्हणत मुसलमानांविरुध्द देश पिंजून काढला असता परंतु विक्रम सावरकर हा ब्राम्हण असल्यामुळे त्याचे कोणीही वाकडे करु शकत नाही. मनुवादी वर्तमानपत्र तर त्याची साधी दखलही घेत नाही. संत तुकाराम व रामदास स्वामी हे दोघेही समकालीन आहेत. परंतु रामदासाला तुकारामापेक्षा श्रेष्ठ ठरविण्याचा असे आटोकाट प्रयत्न होतो. रामदास स्वामीच्या दासबोधाची दखल घेऊन रामदास स्वामीची मंदिरे उभारण्यात येत आहेत. सज्जनगडावर मोठा ऊरुस भरवून त्याच्या पादुकांची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरविण्यात येते. तर तुकारामाचे साहित्य तिनशे शतकापूर्वीच विदेशात पोहोचले असतानाही या देशात स्वत:ला सारस्वत म्हणणारे हे लोक त्यांच्या साहित्याची गंभीरपणे दखल घेत नाहीत.
संत नामदेवांच्या विचाराची दखल शिखांचा धर्म ग्रंथ “गुरु ग्रंथसाहिब" मध्ये घेण्यात आली. पण महाराष्ट्रात संत नामदेवाला कमी लेखन ज्ञानेश्वराला मोठे करण्यात आले. 'ज्ञानदेवे रचले पाया,तुका झालासे कळस' हे खरे नसून 'नामदेवे रचले पाया, तुका झालासे कळस' हे वचन खरे आहे. संत नामदेव हे ज्ञानेश्वरापेक्षा वयाने व विचाराने जेष्ठ होते. त्यामुळे संत नामदेवाला मानसन्मान मिळने आवश्यक होता परंतु जातीच्या अहंकारानी पछाडलेल्या सारस्वतानी संताच्या बाबितही जातीभेद करुन केवळ ज्ञानेश्वराला डोक्यावर घेतले.
अथनी येथील सभेत तेली, तांबोळी व मराठ्यांनी कौन्सिलात जाऊन काय नांगर चालवायचा आहे की तागडी धरायची आहे ? असे संबोधून टिळकांनी तेल्यातांबोळ्याचे राजकीय अधिकार नाकारले तरी आर्य ब्राम्हणांनी टिळकांना तेल्यातांबोळ्याचे पुढारी ही बिरुदावली लावली. शाहू महाराजानी ब्राम्हणाप्रती भुमिका बदलली नाही तर इंग्रजाकडुन कोल्हापुर संस्थान खालसा करण्याची धमकी टिळकांनी दिली होती. अशा विघातक वृत्तीच्या टिळकांना लोकमान्य ही पदवी बहाल केली तर शाहू महाराजाला स्वातंत्र्यविरोधी ठरविण्यात आले. देशासाठी राज्यघटना लिहणा-या, अखिल भारतीय महीलाच्या सशक्तीकरणासाठी हिंदू कोड बिल सादर करणा-या व समस्त बहुजन ओबीसी च्या विकासासाठी घटनेत 340 वे कलम घालुन ओ.बी.सी साठी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणा-या बाबासाहेब आंबेडकरास दलीतांचे नेते अशी बिरुदावली लाऊन त्याना काही समाजघटकांपुरते मर्यादीत केले. ज्या काळात देव व धर्माचे स्तोम माजले होते त्या काळात प्रचलित व्यवस्थेविरुध्द उभे ठाकणे ही साधी बाब नव्हती. एखादा महापुरुषच तसे करु शकतो. म.फुलेनी प्रचलित व्यवस्था बदलण्याचे महतकार्य केले.त्यानी अनेक पुस्तके लिहली. तरीही वि.का.राजवाडे यानी महाराष्ट्राच्या कर्तबगार पुरुषाच्या यादी मध्ये म.ज्योतीराव फुले व छ.शाहु महाराजाचे नावाचा अंतर्भाव केला नाही. म.फुले यांच्या मृत्युची देशातील मोठ्या वृत्तपत्रानी साधी बातमी सुध्दा छापली नाही.निबंधमालाकार चिपळूनकर शास्त्री यानी महात्मा ज्योतिबा फुले विषयी म्हटले होते की, या ज्योतीबा फुल्याना पुणे व हडपसर च्या पुढे कोणीही ओळखनार नाही परंतु काळ कोणासाठीही थांबत नसतो. म.फुल्यांचे नाव संपुर्ण जगभर घेतले जात आहे. त्यांच्या जयंत्या देशाच्या बाहेर होत आहेत परंतु त्याच निबंधमालाकार चिपळूनकराना आज त्याच्या जातभाई शिवाय कोणीही ओळखत नाही. हा काळाने उगवीलेला सुडच आहे. गाडगे महाराज हे विज्ञानवादी दिनोद्वारक कर्मयोगी संत. स्वत:च्या संसाराची चिंता नाही पण अवघ्या संसाराची त्याना चिंता होती. अंधश्रध्दा व पापपुण्याच्या अवडंबरातून बहुजन समाजाला बाहेर काढण्याचे महतकार्य केले. परंतु आज त्याना केवळ ग्रामसफाई व स्वच्छता अभीयानपुरतेच मर्यादीत ठेवण्यात येत आहे. त्यांचे खरे कार्य व विचार दडपण्यात येत आहे. शिक्षण, संस्कृती व सत्ता या क्षेत्राची मक्तेदारी सुरुवातीपासून ज्या ब्राम्हण समाजाकडे आहे त्यानी बहुजनांतील शूर व विद्वान पुरुषाना डावलले तर ब्राम्हण समाजातील लोकाना फार मोठी उंची प्रदान केली.
संदर्भ सुचीः
1. श्रिचक्रधर -बापूजी संकपाळ
2. शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण: मंहमदी की ब्राम्हणी - शरद पाटील
3. हिंदू इतिहास : हारो की दास्तान - डॉ.सुरेंद्र कुमार शर्मा 'अज्ञात'
4. दशावतार निर्माण करण्यामागची ब्राम्हणी मनोवृती - उद्दव पोपलवार
5. आस्तिकशिरोमणी चार्वाक - डॉ. आ.ह.साळुखे
6. विद्रोही तुकाराम - आ.ह.साळुखे
7. महात्मा रावण - डॉ.वि.भि.कोलते
8. शिवाजी कोण होता ? -गोविंद पानसरे
9. हिंदूमुस्लिम तनाव आणि भारतीय एकात्मता - सुलभा ब्रम्हे
10. गुजरात कांड - सुलभा ब्रम्हे
11.धर्मवादाचे राजकारण - राम पुनियानी
12 .आस समतेची - राम पुनियानी
13.Fascism of Sanghaparivar - Ram Puniyani
14.लो.टिळक आणी राजर्षी शाहु एक मुल्यमापन - धनंजय कीर
15.महात्मा फुले समग्र वाड्मय - य.दि.फडके
16.आता आमच्या धडावर आमचेच डोके - डॉ.आ.ह.साळुखे
17.संघाचा बुरखा-मुकुंद शित्रे