मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, म्हणून तो समाजभानापासून फारकत घेऊ शकत नाही. एवढेच नव्हे; तर तो निसर्गाशी असलेले नातेही कधी तोडू शकत नाही. निर्मिकाने मनुष्याकडे सृष्टीचे पालकत्व बहाल केले आहे. म्हणून मानवावर सर्व प्राणिमात्र आणि वक्षवल्लींची मोठी जबाबदारी आहे.
जाणीव नेणीव । विश्वसंवदेना
पाषाण वेदना । कळो आम्हा
हत्ती आणि मुंगी । समान चेतना
वृक्षांच्या यातना । होवो आम्हा
तोडता ते पान । जणु वाटे कान
असे संज्ञाभान । लाभो आम्हा
आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडत आहेत. ही अत्यंत दःखदायी बाब आहे. केवळ शेतातल्या कविता' लिहून भागत नाही. तर त्याच्या मुळाशी आमच्या शब्दांना जाता आलं पाहिजे. जे सत्य हाती लागेल ते जगासमोर मांडता आलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी भांडता आलं पाहिजे; अत्याचार करणाऱ्यांना कांडता आलं पाहिजे.
शेतकरी संघटनेने तर आम्हा किसानांची फार दिशाभूल केली. आता आमचं आम्हालाच बघावं लागेल.
चला, नांगर-विळा फावड्यांना ; वरच्यावर घासा
उठा किसानांनो, कंबर कसा; लुटारूच्या उरावर बसा
दूरदर्शन रेडिओ आणि मीडियावाले आमची वरच्यांएवढी कधी दखल घेतात का बाबांनो? नाही ना ! एका प्रिन्सला वाचवायचे दृश्य मीडियाने साऱ्या जगाला सप्ताहभर दाखविले. त्यासाठी जगाची सहानुभूती मिळविली. पण आमच्या विदर्भातले हजारो प्रिन्स कुपोषणाचे शिकार झालेले आहेत. शेकडो कास्तकारांनी आत्महत्या केलेल्या आहे. त्यांच्यासाठी थोडाफार तरी आटापिटा या चॅनल्सवाल्यांनी केला असता, तर कदाचित जगाची मदत-सहानुभूती त्यांनाही लाभली असती.
विषय त्यांच्या आवडीचे
ऐश्वर्याचे लफडे कसे !
सलमान कुठे शिंकला
काढले त्याने कपडे कसे ?
बुवा लोकांनाही या चॅनल्सवाल्यांनी भरपूर भाव दिलेला आहे.
टीव्ही चॅनल्स बुवालोक
जगात फार वाढले
यांनी तर सामान्यांचे
बौद्धिक दिवाळे काढले !
पहाटेपासून यांचा रोज
सुरू होतो बोगस-बोध
फाईव्हस्टार चैनी यांच्या
यांचा कोण घेईल शोध ?
बेकारांनी एक करावे
बुवा किंवा बाबा व्हावे
मग बघा चमत्कार
जो-तो करेल नमस्कार
कनक-कांता वगैरेंचा
करावाच लागेल स्वीकार
तिकडे शिर्डीला बघा- जो महात्मा एक निर्मोही फकीर साईबाबा, त्यालाच श्रीमंतांनी सोन्याचे सिंहासन दाखिवले.
त्या फकीर साईसाधूला ।
तुमचं सोनं दाखवू नका ।
गरिबांच्या कैवाऱ्याला ।
श्रीमंतांनो दुखवू नका ।।
सोनलोभ्यांनो का दावता ।
साईला सोन्याची लंका ।
अरे तुमच्या या कर्माची ।
साईलाही येईल शंका।।
ज्यांच्या वस्तीत कधीच सूर्य मावळत नाही ते कामगार आणि त्याच साहित्य; हजारो वर्षाच्या अन्यायाविरुद्ध निश्चित भमिकेने उभे ठाकलेल आंबेडकरी साहित्य, जनसामान्यांच्या रुचीचे सदभिरुचीत घडण करणार जनसाहित्य, आदिवासीचे साहित्य, कृषी साहित्य- प्रामीण साहित्य, देशीवादी साहित्य आणि इतर सर्व वाङ्मयीन प्रवाह या सर्वांचे सात्विक प्रयत्न गया जीवन आनंदी करण्यासाठी आहे.
या सर्व परिवर्तनवादी साहित्य चळवळीना, अंधश्रद्धा, शोषण, अन्याय, याविरुद्ध आणि समता-बंधतेच्या बाजूने सतत लढत राहावे लागते. इतके सारे होत असताना धनदांडग्या ईश्वर दलालांचा अघोरी व्याप वाढतच आहे. जातीयवाद सुरूच आहे. अभिजनांना जातीयवादी म्हणणारे बहुजनही न कळत स्वत:ही जातीय चिखलात फसत आहेत- असो !
साहित्य हे केवळ स्वान्त सुखाय नसतं, ते संवाद रसायन असल्यामुळे समाजाच्या सुख-दुःखाचं अभिन्न अंग असतं, मग ती ज्ञानेश्वरी असो, व तुकोबाची गाथा, केशवसुत असो वा मर्हेकर, या साऱ्यांनाच समाजचिंतन करावंच लागतं आणि त्यांनी ते प्रामाणिकपणे केलेलेही आहे. आपणही करीत आहोत. करीत राहू, निरांजनाच्या वातीतूनही मशालीच्या ज्योती धगधगत ठेवू.
हे विज्ञानाचे युग आहे आणि युगधर्म काय म्हणतो याचा विचार बहुजनांनी करायला हवा. 'येई गा हरी देई गा पलंगावरी ।'असं शक्य नाही. आपल्याला आपल्या माणूसपणाचं चीज करता आलं पाहिजे.
मानवी मेंदूतील जनुकात अगणित ज्ञानस्मृती दबून असतात. आम्ही ज्याला पूर्वसंचित म्हणतो ते दुसरे-तिसरे काही नसून जनुक रेणूत गडप झालेल्या त्या पूर्वस्मृती आहेत. आपण आता थोडे जनुकविश्वाकडे वळू या. डॉ. हॅररच्या मते, मेंदू नावाच्या संगणकात एक मिलियन-बिलीयन बीटस किंवा शंभर मिलियन पुस्तके साठवून ठेवण्याची अदभुत योजना आहे. या मेंदमध्येच स्मृतींचे जिनोम म्हणजेच जिन्स असतात. कित्येकांच्या जनुकातील या स्मृती सतत खितपत पडून राहिल्यामुळे नंतर विस्मृत होतात. चिंतन साधनेने त्या पुनश्च जाग्या करता येतात. ज्याला ते साध्य झालं तो योगसिद्ध ठरतो. जनुकांमधून या स्मृती पिढ्या-पिढ्या शुक्रचक्रगतीत प्रवाहित होत असतात अन् हाच मानवप्राण्याचा पुनर्जन्मही ठरतो. मनुष्य जन मनुष्य जन्मच घडतो. पशुपक्ष्यांचा नाही. तसे कुणी सागत असेल तर ते थोतांड आहे.
पूर्वजन्म म्हणजे पूर्वसंचित, स्मृतींचे ज्ञान, तर पुनर्जन्म महस शुक्रजनुकरूपाने पुनःपुन्हा जन्म घेणे. काही महानुभवांना हजारो, लाल वषापूवीचे गतजन्मज्ञान, जिवंत जनुकजागृतीमुळे प्राप्त होते. म्हणनच निरक्षर बहिणाबाई अक्षरयात्रेची थोर कवयित्री होते.
'ईश्वराची विशेष देणगी' म्हणून लोक कलावंताचे अंतःकरणपूर्व कौतक करतात; पण खरे तर ही ईश्वराची देणगी नाही. तर ती जनुक देण आहे. अर ती साधनेशिवाय अप्राप्य आहे.
हे जनुकविश्व अमर नाही. तेही मर्त्य आहे. पण ते प्रदीर्घ काळ शुक्रचक्रासो कालक्षेप करायला समर्थ आहे...
बहुजन वर्गाने अपार मौखिक वाङ्मयनिर्मिती करून ठेवली. हा अमला खजाना आपण जपला पाहिजे.
विष्णुदास भाव्यांच्याही आधी बहुजनांकडे नाटक चळवळ होती. ते आपापल्या परीने कथानकं तयार करून आपली नाटकभूक भागवित होते, हे प्रत्यक्ष संत तुकोबांच्या खालील अभंगातून सिद्ध होते -
'नटनाट्य तुम्ही । केले यासाठी
कौतुके दृष्टि । निववावी
नाहीतरी काय । कळलेचि आहे
वाघ आणि गाय लाकडाची ।'
बहुजनहो, कोणते बहुजनत्व पुढे नेणारे तेही लक्षात घेतले पाहिजे. आम्हाला असे'. बहुजनत्व हवे ते बुद्धाला अभिप्रेत असणारे-‘बहुजन हिताय बहुजन सुखाय
आज आम्ही आरक्षणामुळे एक समाज झालो. आम्हाला उद्या राजकीयदृष्ट्यासुद्धा एक व्हायचे आहे. आम्ही एक असू तर या देशावर राज्य कुणाचे ते ठरवू. त्यासाठी आम्ही किमान ओबीसीमधील जाती तोडल्या पाहिजेत. माणसाला जात असते हे जीवनशास्त्रीयदृष्ट्यासुद्धा एक मोठे अज्ञान आहे. जात पशुपक्ष्यांना असते. मनुष्याला नाही. वैश्विक जाणिवेचा माणूस माणसा-माणसांत जात असते, हे मान्य करतोच कसा? म्हणून आता आम्ही ओबीसींनी बेटी व्यवहार केले पाहिजे, केवळ मतपेटी व्यवहाराने आम्ही मजबूत होऊ शकत नाही! असो.