Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

बहुजनावरील सामाजीक अन्याय व उपाय

डॉ. प्रल्हाद वडगांवकर, BSC, LSGD, LCEH, MD (Hom)  योग पंडीत अध्यक्ष :- राष्ट्रीय ओबीसी महासंघ


    बहुजनावरील सामाजिक अन्यायाचा विचार करताना प्राचिन काळापासून आर्वाचिन काळाचा मागोवा घ्यावा लागेल. भारतात जेव्हापासून हिंदू धर्म अस्तिवात आला त्या काळापासुनचा इतिहास पाहिला तर धमार्र्ने चार वर्ण पाडले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य शुद्र त्यातील शुद्र म्हणजे, ओबीसी आदीवासी भटके, विमुक्त व आतिशुद्र म्हणजे दलित  (ड.उ,ड.ढ.)

    यातील शुद्र अतिशुद्र याना कनिष्ठ वर्णीय - बहुजन समाज व पहिले तीन वर्ण उच्च गणले गेलेे.

    बहुजनावरील अन्यायात, बीसी., ओबीसी भटके विमुक्त आदीवासी या सर्वावरील अन्यायाचा एकत्रित विचार करणे क्रमप्राप्त आहे. 

    या प्रश्नासंबंधी विचार करताच साहजिकच खालील प्रश्न समोर येतात.

1) वर्णनिर्मिती कशी झाली ? त्याची कारणे कोणती ?
2) बहुजनावर अन्याय करणारे कोण ?
3) अन्यायाचे स्वरूप प्रकार, कोणते ?
4) प्राचिन मध्ययुगीन व अर्वाचिन काळात अन्यायाच्या स्वरूपात काय बद्दल झाले ?
5) अन्यायाला प्रतीकार, संघर्ष कोणते झाले ?
6) बहुजनांचे धार्मिक, सामाजीक, राजकीय आर्थिक क्षेत्रात स्थान काय होते व आहे ?

इतिहास मागोवा प्राचीन काळ 

    सुमारे 7500 ते 5500 वर्षापुर्वी इराण युरेशिया, इजिप्त या भागातून भारताच्या खैबर खिंडीतून आर्यांच्या टोळ्या आल्या. त्या वेेळी भारत जगात समृद्ध देश होता.

    आर्यांनी इथली संस्कृती उध्वस्त केलो मुलनिवासी भारतीयांना जिंकून त्यांना गुलाम केले जे विरोधात गेले ते मारले गेले, जे शरण आले ते शेती  करू लागले. काही जंगलात डोंगरात राहुन संघर्ष करीत राहीले ते आदीवासी वनवासी गणले गेले. शेळ्या मेंढ्या पाळून रानावनात भटकत राहीले ते भटके झाले.

    आर्य गोमांस खात, मद्यपिणारे म्हणून ते स्वत:ला सुर (सुरा -मद्य) म्हणवून घेत ज्या भागा तून आले तेथे त्यांना ’दिव’ शब्दाने ओळखत (दिवचे ते देव) ते आक्रमक होते.

    त्यांच्यापासून जे मुलनिवासी स्वत:चे रक्षण करत होते त्या रक्षक समाजाला ते राक्षस म्हणु लागले त्यांची वृत्ती रानटी रूप आक्राळ विक्राळ असा खोटा प्रचार व इतिहास ही लिहीला.

    संघर्ष करण्यासाठी जे गांवाबाहेर रानावनात राहु लागले त्यांचा गांवातल्याबरोबर संबंध येऊ नये म्हणून त्यांना अस्पृश्य ठरवले, त्यांना गांवात प्रवेशास बंदी केली (सीमा बंदी)

    भारताची मुळ संस्कृती जीला आपण पहिला प्रवाह म्हणतो ती शीवाच्या रूपात आर्य भारतात येण्यापूर्वी 1000 ते 1500 वर्षे आधी होती. ती आर्यांनी नष्ट केली.

    वैदिक धर्म स्थापना:- आर्यांनी वैदिक ब्राह्मणी धर्म निर्माण केला त्या धर्मानुसार तत्वाज्ञान, वेद, ब्राह्मणे, श्रुति, स्मृती, उपनिषदे यातून शब्दबद्ध केले.

    वैदिक धर्म :- खालील चार सिद्धांतावर आधारलेला आहे.फ

    1) वेद केवळ पवित्रच नव्हे तर ते अपौरूषेय अचुक  आहेत व त्यांचा अधिकार वादातीत आहे.

    2) योग्य ते वैदिक यज्ञ केले धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले, ब्राह्मणांंना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते.

    3) वेदांतील आदर्श समाज धर्माची कल्पना म्हणजे चातुर्वर्ण समाज रचना सर्वांना बंधनकारक व वादातीत आहे.

    4) कर्मवाद :- मागील जन्मातील बर्‍या वाईट कर्मानुसार आजचा जन्म आहे. त्या वर्णजातीचे काम करून धर्म पालन केल्यास पुढील जन्म चांगल्या ठिकाणी होईल.
    
    चातुर्वर्ण समाज रचना म्हणजे आदर्श समाजरचना कांही नियमावर आधारित आहे. :-

नियम 1) समाज  चार वर्णात 1 ब्राह्मण 2) क्षत्रीय 3) वैश्य 4) शुद्र यात विभागला जावा.

नियम 2) वर्णात सामाजीक समता नाही. वर्गवार विषमतेने ते बांधले पाहीजेत. ब्राह्मणाला हवे ते सर्व हक्क व पुर्ण अधिकार. क्षत्रिय, वैशांना कमी प्रमाणात हक्क शुद्रांचा अधिकार व हक्क कांहीच नव्हते. वरच्या तीन वर्णाना न दुखवता त्यांची सेवा करून जगणे एवढाच त्यांना हक्क होता.

नियम 3) व्यवसाय विभागणी 
1) ब्राह्मण :- अध्ययन अध्यापन, 2) क्षत्रीय - लढाई , रक्षण, 3) वैश्य - व्यापार, शेती 4) शुद्र - तिन वर्णांची सेवा.

नियम 4) शुद्रांना शिक्षणाचा विद्येचा हक्क नाही.

नियम 5) आयुष्याचे चार आश्रम  1) ब्रह्मचार्य 2) गृहस्थाश्रम 3) वानप्रस्थ 4) संन्यासआश्रम पैकी ब्रह्मचर्य व संन्यासआश्रम शुद्र व स्त्रीयांना घेता येणार नाही.

प्राचीन काळापासून धार्मिक अन्याय :-

    यावरून सिद्ध होते की शुद्र - बहुजनावर अन्याय खुद्द धर्मानेच कायदा करून प्राचिन काळापासून अमलात आणले.

    व्यवसायानुसार जाती प्रथा निर्माण केली व खालील बंद्या लादल्या.

    1) प्रत्येक जातींनी जातीतच विवाह करावा, 2) जातीचाच व्यवसाय करावा, 3) सीमा ओलांडू नये. 4) संपत्ती साठा करू नये. 5) विद्या शिकण्यास बंदी नियमांचे पालन केले नाही तर मनुस्मृतीच्या कायद्या नुसार कडक शासन देण्याची तरतुद. म्हणजे ओबीसी, बीसी, व्हीजेएनटीचेच्या अन्यायाचे सर्व मुळ धर्मातच आहे. जातीप्रथेच्या विषम तेचा चातुर्वर्णाचा सिद्धांत पुरूषसुक्तात मांडला हे अत्ंयंत गुन्हेगारी व समाजहित विरोधी सिद्धांत मांडून तो हजारो वर्षे समाजावर लादलेला आहे. त्याहूनही अत्यंत आश्चर्य कारक सिंद्धांत जो अत्यंत काल्पनीक अवैज्ञानीक आहे. तो म्हणजे ब्राह्मण वर्णाला सर्वश्रेष्ठ मानणेसाठी शरीरातील निरनिराळ्या अवयांतुन चार वर्णांची उत्पत्ती बाबतचा आहे. ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या मुखातून, क्षत्रीय बाहूतून, वैश्य  उदरातून, शुद्र पायातुन निर्माण झाले हा होय. त्यालाही पुढे प्रत्यक्ष देवांच्या जन्मा विषयीचा सिद्धांत तर अफाट काल्पनिक अवैज्ञानिक व अज्ञानी लोकांची दिशाभुल करणारा मांडला. तो म्हणजे देवांच्या दशावतारांचा, मासा, कासव, डुक्कर वगैरे विविध रूपाने देवाने अवतार घेतले. जगात कोणत्याही धर्माने इतके प्रचंड विषमतेचे बीजारोपण केलेले आढळत नाही.

    बहुजनांना जन्माआधीच अन्यायाचे ताट वाढून ठेवण्याची तरतूद धर्मात आहे. याविरूद्ध हजारो वर्षाच्या अन्यायात आज ही बहुजन, ओबीसी, असंतुष्ट पणे संघर्ष करीत असलेचे दिसतात कां ?

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हिंदु धर्म जाती संबंधी संशोधनपर अफाट ग्रंथ लेखन पुराव्यासह केले आहे. ते जरूर अभ्यासावेत आज ते जगातील विद्वानात सहाव्या स्थानावर आहेत. सर्व भारतीयांना अभिमान वाटावा. आसीच ही वस्तुस्थिती आहे. 

ब) बुद्धकाळीन बहुजनस्थिती.
    आर्यांनी सुमारे 1200 वर्षे सर्व बहुजनांना छळले, पिडले, त्यांना गुलाम करून सत्ता गाजवली भारताच्या मुळ संस्कृतीला ज्यावेळी 2500 वर्षे झाली त्यावेळी गौतम बुद्धानेे धर्माची स्थापना केली.

    त्यावेळी बहुजनांची स्थिती आत्यंत वाईट होती. अशावेळी अहिंसा, समता समानता, बंधुता ह्या बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार झाला अनेक बहुजनांनी त्यांचा स्वीकार करून जुलमी ब्राह्मण धर्मापासुन सुटका करून घेतली.

    बुद्धाने बहुजनावरील हे ब्राह्मणी आक्रमण थोपवले एवढेच नव्हे तर तो लयाला गेला. भारत, आशिया, जावा सुमात्रा ब्रह्मदेश चीन, जपान आदी देशातही बौद्ध धर्माचा प्रसार झाला. इ.स. 332 ते इ.स. 183 पुर्वी पासुन शुद्रातील मौर्य घराण्याचे राज्य होते सम्राट चंद्रगुप्त, सम्राट अशोकाचे राज्य होते. सर्वच क्षेत्रात बहुजनांची सत्ता होती. इ.स. 250 पुर्वी सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांनी श्रीलंकेत बौद्ध धर्माची स्थापना केली.
    तथापी पुष्पमित्र शुंग या ब्राह्मणाने बौद्ध धर्म नष्ट करण्याचे प्रयत्न केले. सम्राट अशोकाचा नातु बहाद्रथ याचा कपटाने वध केला. तेथून मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली तथापी बुद्धानंतर एक हजार वर्षे बौद्ध धर्म टिकला होता. 

इसवीसन पुर्वार्धात बहुजन स्थिती :-

    पुढे  सहाव्या, सातव्या शतकात आद्य शंकराचार्याच्या वैदिक ब्राह्मणांनी मुसलमान आक्रमकाच्या सहाय्याने एक हजार वर्षे दबून राहील्या नंतर बौद्ध व जैन धर्माविरूद्ध उठाव केला.

    इ. स. सातव्या शतकात हजरत महंमद पैगंबराने इस्लामी धर्माची स्थापना केली. त्यांच्या टोळ्यांची आक्रमणे भारतावर होत होती. ब्राह्मण समाजाने भारतातील जैन व बौद्ध धर्माच्या उच्चाटनासाठी त्यांचे सहकार्य घेतले. त्यातील जैन धर्मियाने नमते घेतले ते शेती करून राहु लागले. बौद्ध लढले ते मेले काही देश सोडून गेले. काही मुसलमान झाले.

    इ.स. आठव्या शतकात ब्राह्मण समाज बौद्ध धर्म संपवण्यात यशस्वी झाला.
हिंदू धर्माचे पुनरूजीवन

    गौतम बुद्धानंतर शेकडो वर्षांनी शंकराचार्यानी वैदिक, ब्राह्मण व बौद्ध विचार सरणीचा समन्वय साधुन हिंदुधर्माची बैठक निर्माण केली.

    भारतात बुद्धाच्या विचारसरणीचा मोठा पगडा होता. नवीन विचार फार वेगळा वाटू नये अशी विचार सरणी मांडून बहुजनांची दिशाभुल केली. या नवीन विचाराला त्यांनी ’हिंदू’ हा शब्द वापरला कारण त्यावेळी मुसलमानांनी वारंवार आक्रमणे करून येथील प्रजेला गुलाम केले होते. ते गुलामांना हिंदु (गुलाम) म्हणत तोच शब्द घेऊन या हिंदुचा धर्म म्हणुन हिंदुधर्म म्हणु लागले.

    मुसलमान आक्रमकांच्या मदतीने बौद्धनगरे, ज्ञानकेंद्रे, विद्यापीठे, वस्त्या उध्वस्त केल्या, बुद्ध मुर्ती फोडल्या.

    जी पुरोहितशाही बौद्ध काळात नाकारली होती तिला शंकराचार्याद्वारा पुरोहितांना नवा महामार्ग निर्माण झाला. आता ते पुन्हा भुदेव झाले. पुष्पमित्र शुंगाने, बौद्ध, जैन, चार्वाक काळ गाडून टाकला होता. आता पुन्हा मठ मंदिरांचा कायदा लागु केला. राजा कोण ते भुदेव ठरवणार राजाने लुट मार करावी व धनमंदीरात द्यावे व बहु जनावर राज्य करावे. लोकांनी राजसेवा म्हणुन धनमंदीरात आपल्या मिळकतीतून आणून जमा करावे. ही देवाची आज्ञा आहे. असे रूप त्यास दिले. त्या काळी हेमाड व बोपदेव यांनी अनेक मठ मंदीरे बांधली.

इ) मुसलमानाच्या आक्रमण काळातील बहुजनावस्था.

    इ.स. सातव्या शतकापासून परकीय मुसलमानांची आक्रमणे वारंवार झाली. त्यांनी मठ मंदीरावरच हल्ले केले. मुर्ती फोडल्या याचे कारण वैदिक ब्राह्मण शाहीच्या मठ मंदीर राज्याच्या काळात राजाची व जनतेकडून जमा झालेली संपत्ती मठ मंदिरे व  मुर्तीत दडवलेली असे. म्हणून ती लुटली जात असे सोरटीसोमनाथावर अनेकदा हल्ले झाले ते पैशासाठीच. इ.स. आठव्या शतकात महाराष्ट्रात चालुक्य घराण्याचे राज्य होते. त्यांची राजधानी नाशीक जवळ सिन्नरला होती.

    इ.स. 13 व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमन करून रामदेवरायाचा  पराभव केला. यादवांचे राज्य खिलजीच्या स्वाधीन करण्याचे काम ब्राह्मणांनीच केले. 500 वर्षाची मठ मंदिर संपत्ती लुटली गेली.

    आता जगण्याचे साधन टिकावे म्हणून ब्राह्मणांनी मुसलमान सत्तेशी जुळते घेतले. राजसत्ता मुसलमानांची राहील पण धर्मसत्ता ब्राह्मणांची - भूदेवांची राहील शिवाय न्यायदानाचा, कर सारा वसुलीचा पारंपारीक अधिकार ब्राह्मणांचा राहील. असा सौदा मुसलमान सत्तेशी केला त्यामुळे मनुवादाचा कायदा बहुजनांवर होता तसाच लादला. व त्यानुसार बहुजनांवर अनेक बंधने लादणे पुन्हा सुरू केले. 1) विद्या बंदी - शुद्रांनी  विद्या शिकायची नाही ते ज्ञानी झाल्यास आपली सत्ता जाईल. ही भीती. 2) धनसंचय बंदी :- ते श्रींमत झाले तर आपल्याला वरचढ होतील म्हणून ते दरीद्रीच राहीले पाहीजेत हा हेतु. 3) सीमा बंदी - सिमेेबाहेर जाऊन ते विद्या घेतील धनमिळवतील व आपल्या सत्तेला सुरूंग लावतील ही भिती. 4) व्यवसायबंदी - जाती प्रमाणेच प्रत्येकाने व्यवसाय करणे बंधनकारक दुसरे तिसरे ज्ञान त्यांना होऊ नये व एका व्यवसायाशिावाय तरणोउपाय नाही अशाा गुलामीतच तो जगाला पाहीजे हा दुष्ट हेतु. 5) आंतरजातीय रोटी बेटी व्यवहार बंदी आंतरजातीय विवाहाने बहुजन सर्व एक होतील त्यांच्यात समानता येईल विषमता नष्ट होईल. व ते सर्व एक झाले तर आपली सत्ता झुगारतील ही भिती. 6) शस्त्रबंदी :- क्षत्रीया शिवाय शस्त्र बाळगण्यास इतरांना बंदी. लढाई करणे केवळ क्षत्रीयांनाच अधिकार होता. मर्यादित लोकांच्या कडेच हा अधिकार राहीला पाहीजे. बहुजनांनी शस्त्रे बाळगली तर ते एक होऊन आपल्यावरच हाल्ला करतील ही भिती.
    याशिवाय मानव जातीला कलंक फासणारी अत्यंत लांच्छनास्पद अशी अस्पृश्यता दलितांसाठी अमलात आणली शुद्रातीलच ज्या लोकांनी चरितार्थासाठी व्यवसाय बंदीच्या कायद्यामुळे हलकी घाणीची कामे करणे स्वीकारले. सफाईची कामे, मेलेली जनावरे नेण्याची कामे, स्मशानातील कामे, मेलेल्या जनावरांची कातडी कमावून त्यांच्या वहाणा, मोटा, चमड्याच्या वस्तू तयार करण्याची कामे, अशी घाणीची कामे करणार्‍यांना अस्पृश्य ठरवले. त्यांना वेठबिगार पद्धत लागु करून जनावरासारखे राबवले.

    जनावरांचा स्पर्श चालेल पण अस्पृश्यांचा चालणार नाही ही प्रथा राबवली (त्यांना दलित म्हणतात.)

    सोवळे ओवळेच्या नांवाखाली दलित्तेर बहुजनांवरही मर्यादित अस्पृश्यता पाळली जात असे. जातीयवाद, धार्मिक श्रद्धा, रूढी परंपरा यात समाज गुरफटून टाकला स्मृती पुराणातील कर्मकांडे सुरू केली.

    सोवळे ओवळेच्या नावाखाली ..............

    कर्मकांडे सुरू केली ती आजतागायत वर्षाची 365 दिवसात रोज कांही ना काही कर्मकांडे ओबीसी प्रमाणिपपकपणे (भोळेपणानेे) करत राहीलेत. ह्या कर्मकाडांचा ते पुण्य कर्म समजतात ती नाही केली तर देवाचा कोप होईल हा जन्म मिळालाय तो मागच्या जन्मात केलेल्या कर्माच्या गतीनेच मिळाला आहे ह्या जन्मात धर्माने जातीचे आपल्या वाट्याला आलेले काम चांगला प्रकारे केले तर पुढचाजन्म मिळेल ह्या कर्मसिद्धांताने पछाडल्या मुळे मागास अतिमागासही निमुट पणे, याचा स्वीकार करून विनातक्रार जन्माले वाट्याला आलेलेच काम करत राहिले. त्या विरूद्ध हजारो वर्षात कुणीच विरोध केलानाही. आंदोलन केले नाही तो अन्याय आहे असे कुणालाच वाटले नाही. संत समाज सुधारक सत्ताधीश या सर्वांनीच हजारो वर्षे ह्या अन्यायाला न्याय समजून धर्म समजून वर्तन केले.    

    इ.स. सातव्या शतकात हजरत महंमद पैगंबराने इस्लामी धर्माची स्थापना केली होती. महंमद गझनी, महंमद घोरी, महंमद खिलजी, बाबर, अल्लादीन खिलजी वगैरेंच्या अनेक स्वार्‍या भारतावर झाल्या. त्यांना वेगवेगळ्या वाटा दाखवण्याचे कार्य भारतीय ब्राह्मणांनी केले. 1500 वर्षात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. इ.स. 1490 साली मलिक महंमदने निजामशाही स्थापन केली सर्वच परकीय सत्तांना सहकार्य करण्याचे धोरण ब्राह्मणशाहीने ठेवले. त्याबदल्यात धार्मिक सत्तेचा अधिकार आपणाकडे ठेवून 100 % मनुवाद्यांचा धार्मिक कायदा लादला. निर्बंध उठवण्याचा महमंद तुघलकांने प्रयत्न केला त्याला वेडा ठरवले. बहुजन उद्धाराचे कार्य करणार्‍या प्रत्येकालाच ब्राह्मणशाहीने वेडा ठरवले. 

    इ.स. 1525 ला बाबराने भारतावर आक्रमण केले. मुळ तुर्क घराणे काबुलचा तो सुलतान होता त्याने दिल्लीतील अफगाण इब्राहीम लोधीचा पानिपातच्या पहिल्या लढाईत पराभव करून दिल्लीला मुघल घराण्याचे राज्य स्थापन केले.

    ब्राह्मणशाहीस विरोध :- 1) मुसलमान राजवटीत ब्राह्मणशाहीची धार्मीक व कर्मकांडाची राजवट सुरू होती. त्यास विरोध करण्यासाठी गुजरातमध्ये चक्रधर स्वामींनी महानुभव पंथाची स्थापना केली. त्यात स्त्रिपुरूष समानता, श्रीकृष्ण, गुरूगुडम, चांगदेव, राऊळ दत्तात्रय यांनाच फक्त परमेश्वर मानावे अशी होती. हेमाद्री पंडीताने चक्रधर स्वामींची अमानुष हत्या केली.

    2) बसवेश्वराने विरशैव धर्म स्थापन केला. ते फक्त शनिउपासक, लिंगपुजक होते एकेश्वरीय होते. तो धर्मही ब्राह्मणशाहीने संपवला. या आधी बौद्ध व जैन धर्मही संपवले होते मनुवादा शिवाय कुणालाच थारा ठेवला नव्हता.

    3) मुसलमानी राजवटीत बहुजनांत संत नामदेव, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, सावता माळी, गोरा कुंभार, संत सेना, नरहरी सोनार, एकनाथ, जोगा, चोखा आदींनी तत्कालीन सामाजीक विषमते विरूद्ध समाज जागृती व प्रबोधनाचे कार्य केले. कर्मकांडा पेक्षा भक्तीमार्गाचे प्रबोधन केले. त्यां संतांचाही छळ ब्राह्मणशाहीनेच केला, त्यांना मंदिरात प्रवेश बंद असायचा. पंढरपुरात संत नामदेव विठ्ठल मंदीरामागे किर्तन करीत. सर्व संत वाळवंटात जमत वारकरी पंथाचा विठ्ठल हा शैवपंथी होता. विद्याबंदी असलेने संताचे अभंग तोंडीच स्वरूपात राहीले. तुकारामांनी लिहिलेल्या अभंगाची गाथा विद्या व साहित्य लेखन बंदीच्या ब्राह्मणशाही कायद्यानुसार - इंद्रायणीत बुडवण्याची शिक्षा रामेश्वरशास्त्रींनी दिली होती. व ती बुडवली गेली. मुसलमान राजवटीत मुसलमान ब्राह्मणांना त्रास देत नसत कारण ते त्यांचे अधिकारी होते. सत्ता बदलली तरी समाजावर राज्य त्यांचेच होते त्यांना कर नव्हता.

    परकीय सत्तांचा काळ :- मुसलमान सत्ताधार्‍यांकडून आपणास निरंकुश सत्ता मिळवता येत नाही हे लक्षात येताच भारतावरील पुढचे आक्रमण पोर्तुगीज, डच, फे्ंरच, ख्रिश्चन धर्मियांचे स्वागतही ब्राह्मणशाहीने केले. 14 व्या 15 व्या शतकात आलेल्या ख्रिश्चनांच्या धर्माचा स्वीकार कांही ब्राह्मणांनी बाप्तीष्मा घेऊन केला.

    परकीय सतांच्या काळातही बहुजनावरील अन्याय कायमच राहीले. कारण राजसत्ता तुमची, धर्मसत्ता आमची अशी दरवेळी ब्राह्मणशाहीचे सौदेबाजी केलेली असायची. परकीय सत्तांनाही ते सोयीचे वाटे. हजारो वर्षे समाजाला आपल्या सत्तेत ठेवणारी ब्राह्मणशाही जणु आपलेच काम सोपे करते म्हणून त्यांनी हा सौदा मान्य होता.

इ) शीवशाहीचा काळ :- 16 व्या शतकात 19 फेब्रुवारी 1630 ला शिवरायांचा जन्म झाला. मोंगलाईत प्रजेचा अतीशय छळ होत होता. मोगलांचे सरदार स्वकीय अधिकारी ब्राह्मण होते. अफजलखानचा वकील कृष्णाजी कुलकर्णी होता. बहुजनाना मुसलमान व स्वकीय ब्राह्मणशाही असा दोघांचा छळ सोसावा लागत होता.

    ह्या छळासाठीच जिजाऊ मातोश्रींच्या तीव्र प्ररेणांनी शिवरायांनी 1642 पासून स्वराज्य स्थापनेला सुरूवात केली. त्योवळी आलुते बलुते अठरावगड जातीचे ज्याना आज ओबीसी म्हणतात ते बहुसंख्येने व मावळे यांनीच महाराजांना स्वत:च्या प्राणाचीही पर्वा न करता स्वराज्य स्थापनेच्या महान कार्यात संपुर्ण सहभाग घेतला मुसलमानी सत्तेची सेवा करणारे स्वकीय सरदार जहागिरदार यांनी महाराज्याच्या स्वराज्याच्या कार्यात मदत करण्याऐवजी विरोध केला महाराजांना त्यांचे विरूद्ध झगडावे लागले.

    शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले, ते एक आदर्श, जाणता राजा होते. प्रत्यक्ष एक युगपुरूष होते. त्यांनाही ब्रह्मणशाहीने धर्मसत्तेच्या कायद्याने शुद्र म्हणून राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाकारला. प्रत्यक्ष शिवरायांनाही ब्राह्मणशाहीचा पगडा मोडून काढता आला नाही.

    महाराजांनी मुसलमानी अंमलाचा पराभव करून स्वराज्य स्थापले. अशा वेळी मुसलमानी अंमल नष्ट झालेल्या प्रदेशातील ब्राह्मणशाही पुरस्कार वाल्यांनी स्वराज्यात येऊन प्रन्हा अधिकार पदे घेतली. सत्ता कुणाचीही आली तरी अधिकारी ब्राह्मणच राहीले व बहुजनाचे सामाजिक अन्यायही तसेच चालु राहीले. तथापी शिवरायांच्या स्वराज्यात बहुजनांचे अन्यायाचे निराकरण होऊन प्रजा सुखी होती.

फ) पेशवाईचा संकटाचा काळ :-

    शिवरायांनंतर स्वराज्याचे दोन तुकडे झाले सातार्‍यात छ. शाहुंचा 1708 एका राज्याभिषेक झाला व कोल्हाापूरला ताराणींनी स्वतंत्र गादीची स्थाापना केली.

    पुढे मराठे शाहीचा कारभार संभाळण्यासाठी बाळाजी विश्वनाथ या चितपावन ब्राह्मणाला 1713 मध्ये राज्यकारभाराचा अधिकारी नेमले. व ब्राह्मणशाहीच्या सत्तेच्या मनुवाद्यांचा काळ सुरू झाला. पेशवाईत मनुचा कायदा कटाक्षाने राबवला ओ.बी.सी., बी.सी. भटके विमुक्तावर पुन्हा सर्व अन्याय जोरदार पणे केले जाऊ लागले.

1) सर्व कारभार पक्षपाती होता 2) ब्राह्मणांना योग्य योग्यतेचा विचार न करता पदांची खैरात केली जात असे. 3) ब्राह्मणांना सारा वसुलीत सुट 4) त्यांना अनेक गंभीर गुन्ह्यातही शिक्षा माफ 5) त्यांच्यावर दानधर्माचा वर्षाव 6) त्यांचे साठी दक्षिणा व संपत्ती उधळली जात असे. 7) ब्राह्मण जेवणावळीसाठी लाखो रूपयांचा चुराडा होत असे. 8) शेतकरी बहुजन, स्त्रीया, शुद्र , अतिशुद्र यांचेवर जुलुम होत असत., 9) अस्पृशांना तर जनावरापलीकडे वागणुक मिळत होती. 10) अत्याचार, अनाचार, भ्रष्ट्राचार शिगेला पोहचला 11) स्त्रियांची अब्रु सुरक्षीत राहीली नाही. 12) पेशवाईत शिवरायांची गुण ग्राहकता न्यायप्रीयता, न्यायप्रधानता नैतिकता उरली नाही स्वजाती हित दक्ष व चैनित ब्राह्मणशाही राहीली. 13) शिंदे, होळकर सारख्या स्वामिनिष्ठ, स्वराज्यनिष्ठ सरदारांना डावलण्यात आले. 14) शुद्र, अतिशुद्र व बहुजनांना राज्यकारभार सहभागी करून घेतले नाही त्यामुळे राज्य कमकुवत झाले व शेवटी बुडाले असा अभिप्राय लोकहितवादीनी दिला.

    इतिहासाच्या वरील त्रोटक मागोवावरून ही स्पष्ट होते की हिंदू धर्माने लादलेली चातुवर्ण जातीप्रथा व्यवस्था ब्राह्मणशाहीने मनुचा कायदा करून तो बहुजनावर लादून हजारो वर्षे ओबीसी, बी.सी. भटके विमुक्त आदीवासी समजले जाणार्‍यांवर सामाजीक अन्याय केले. त्यांना सत्ता प्रतिष्ठा संपत्ती या पासून वंचित ठेवलेे.

    पेशवाई ही जगातील सर्वात सैतानी राजवाटीचे प्रतिक म्हणून ओळखली जाते (म.जो.फुले पा. 14)

    1818 साली 105 वर्षे सत्ता भोगून इंग्रजांचे ताब्यात गेली ती घालवण्याचे कामही ब्राह्मणसरदारांनी च केले.

    इंग्रजांच्या ताब्यात पेशवाई गेली व नष्ट झाली तेव्हा स्त्रीयांनी दिवाळी साजरी केली हे बरे झाले असे पिडीत बहुजनांना वाटले त्यात नवल नाही.

ग) इंग्रज राजवटीचा काळ :-

    1) इंग्रजांनी हजारो वर्षाची शिक्षण बंदी उठवली शिक्षण शिक्षण संस्था स्थापन केल्या 1835 ते 1853 या काळात ब्रिटीश मिशनर्‍यांनी ठिकठिकाणी शाळा सुरू करून बहुजनांना शिक्षणाची दारे प्रथमच उघडली, गांवोगांवी शाळा झाल्याने धर्म बुडाला, कलियुग आले, विद्या शुद्रा घरी चालली असा हलकल्लोळ पसरवला (म.फु.पा17) यातुन अनेक सुधारक होऊ लागले. महात्मा फुले आद्य समाजक्रांतीकारक 1827 ला अवतरले

    ब्राह्मणशाही विरूद्ध विषमतेविरूद्ध सर्व प्रथम कडवा संघर्ष हजारो वर्षाच्या धार्मीक गुलामगीरीनंतर महात्मा जोतीराव फुल्यांनी केला. ते पहिले बंडखोर मानले जातात 1)  शुद्रातीशुद्रांचा प्रेरणा व प्रबोधनासाठी साहित्य निर्मीती केली. शेतकर्‍यांचा आसुड , ब्राह्मणाचे कसब, तृतीय रत्न छ. शिवाजीचा 35 पानी पोवाडा, बहुजनांना उपदेशासाठी अनेक अखंड (काव्य) लिहीली व सार्वजनीक सत्यधर्म स्थापन केला.

    शुद्रातिशुद्रांना विद्यार्जनाचा अधिकार पदावर नेमणुका व्हाव्यात असा आयुष्यभर आग्रह धरला. असा आग्रह कोणत्याही सुधाकरानी धरला नाही.

    बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी व कोल्हापूरच्या छ. शाहु महाराजांनी आपल्या संस्थानात शुद्रातिशुद्रांना शिक्षणाच्या संधीसाठी शाळा सुरू केल्या. 1912 साली छ. शाहु महाराजांनी प्रा. शिक्षण कायद्याने सक्तीचे केले. 19 व्या शतकाखेरीज ब्राह्मणेत्तर अधिकारी संस्थानात नेमण्यास सुरूवात केली.

    26 जुलै 1902 रोजी छ. शाहुंनी एक अधिसुचना जारी करून कोल्हापूर संस्थानातील सरकारी नोकरीत, 50 % जागा मागास वर्गीयांसाठी राखुन ठेवल्या व न भुतो न भविष्यती अशी क्रांती केली.

    म. फुले व छ. शाहुंनी पुरोहितशाही व ब्राह्मणशाहीच्या हजारो वर्षाच्या एकाधिकार शाहीला सुरूंग लावला.

    याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाच्या एैतिहासीक कार्याची सुरूवात झाली त्यांनी म. फुल्यांना आपले गुरू मानले.

    आयुष्यभर अस्पृश्य, दलित, हरिजन समजल्या जाणार्‍या समाजाला माणसासारखे जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी कार्य केले.

    अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी प्रबोधन, आंदोलने, साहित्य निर्मिती, परिषदा आदी विविध उपक्रम केले. मंदिर प्रवेश, सार्वजनिक तलावातील पाणी पिण्याचा आधिकार, राजसत्तेत 22 % लोकप्रतिनिधीत्वाचा आधिकार, आरक्षण, शिक्षणमोफत व त्यात प्रवेशास आरक्षण, विद्यार्थी वसतीगृहे, शिष्यवृत्ती सवलती, नोकरीत 22 % आरक्षण दलितासाठी मिळवण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेबांनी केले हे कार्य जगाच्या इतिहासात अद्वितीय आहे.

    केवळ दलितासाठीच हे कार्य केले असे नसुन भारतीय घटनेचे शिल्पकार असलेले डॉ. बाबासाहेब यांनी घटनेत 340 वे कलम घालून इतर मागासवर्ग ओबीसीनांही मागासाठीच्या सर्व सवलती देण्याची तरतूद केली. पिढ्यान पिढ्या मागास स्त्री जातीला समान अधिकार घटनेत दिले. ओबीसीसाठी नोकरी शिक्षणात सत्तेतही मागासाप्रमाणे आरक्षण सवलतींची तरतूद केली आहे. याशिवाय भारताच्या सर्व क्षेत्रातील प्रगतीसाठी आर्थीक उन्नतीसाठी अमुल्य योगदान दिले आहे. हिंदुधर्मीयांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी हिंदुकोडबील तयार केले. भारताच्या विकासासाठी इतके अमुल्य काम करणारे ते असामान्य युगपुरूष होते.

य) स्वातंत्र्योत्तर काळातील स्थिती.

    भारताला 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज राजवट संपली 1950, 26 जाने . प्रजासत्ताक दिनापासून भारतीय राज्य घटनेचा अमंल सुरू झाला.

    समता, बंधुता एकात्मतेचे नवे एैतिहासीक पर्व सुरू झाले.

    1) गेल्या हजारो वर्षातील अन्यायांना कायद्याने मुठमाती देण्याची तरतुद घटनेत केली.त्याप्रमाणे दलित समजल्या जाणार्‍या समुहाला हक्क अधिकार मिळाले. भारतात हजारो इतर मागास जाती आहेत त्यांच्या विकासासाठी घटनेच्या कलम 340 नुसार आयोग नेमून त्यांच्या विकासाची तरतूद करावी असे डॉ. बाबासाहेबांचे म्हणणे होते. पण तसा आयोग नेमणे पंतप्रधान नेहरूंनी टाळले. याशिावाय हिंदूंच्या सर्वांगिण उन्नती साठी हिंदुकोड बिल तयार करून डॉ. बाबासाहेबांनी दिले. पण ते ही मंजुर करून घेतले नाही याच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेबांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. डॉ. बाबासाहेबांच्या या कृतीचे अनुकरण करणारा मंत्री अजुन जन्मला नाही व जन्माला येईल की नाही याची खात्री नाही. बहुजन ओबीसी स्त्रीया यांचेवर डॉ. बाबासाहेबांचे हे परत फेड न करता येणारे उपकार आहेत याची त्यांना जाणीव आहे कां ? स्वातंत्र्यानंतर ओबीसींसाठी आयोगन नेमण्याचा हा पहिला अन्याय ओबीसीवर झाला.

    2) डॉ. बाबासाहेबांच्या राजीनाम्याचा धसका घेऊन केंद्र शासनाने 1953 ला काकासाहेब कालेलकर आयोग ओबीसीसाठी नेमला ह्या आयोगाने 2989 जातींचा शोध घेतला व 1955 ला केंद्र शासनाला अहवाल दिला. इ. मा. जातीना महत्वपुर्ण मागासांप्रमाणे आरक्षण देण्याबाबत महत्वपुर्ण अहवाल दिला पण त्यासोबत व्यक्तीगत पत्र दिले की. जातीवर आधारीत आरक्षण दिल्यास जातीजातीत कटुता निर्माण होईल. म्हणून हा अहवाल चर्चा न होता गुंडाळून ठेवला गेला. हा दुसरा अन्याय ओबीसींवर झाला.

    3) 1977 ला जनता दल सरकार केंद्रात आले त्याने ओबीसी साठी बी.पी. मंडल आयोग नेमला. या आयोगाने संपुर्ण भारतात संशोधनात्मक अभ्यास करून इ. मा.च्या सुमारे साडेतीन हजार जातींचा शोध घेतला.

    सामाजिक व शैक्षणिक मागासपणाच्या कसोट्या ठरवून त्याप्रमाणे त्यांचा समावेश इ. मा. वर्गात करून महत्वाच्या शिफारशी केल्या 1) शिक्षण व नोकर्‍यात ओबीसींना मागासाप्रमाणे सर्व सवलती आरक्षणे द्यावीत. 2) अतिरिक्त जमीनीचे ओबीसींना वाटप करावे. 3) विकास महामंडळे 4) उद्योग व्यवसाय निधीची तरतूद करावी, 5) कल्याणकारी योजना 6) स्वतंत्र मंत्रालय व इतर अनेक महत्वाच्या शिफारशी केल्या. अहवाल 1980 मध्ये शासनाला दिला पण मंडल आयोग मंजुर होणे पुर्वीच जनता सरकार पाय उतार झाले. पुढे आलेल्या काँग्रेस सरकारने अहवाल 10 वर्षे गुंडाळून ठेवला. 1990 ला काँग्रेस सरकार कोसळून व्ही.पी.सींग सरकार भाजपाच्या बाहेरून पाठींब्यावर सत्तेत आले. व्ही. पी. सिंगानी 7 ऑगष्ट 1990 ला मंडल आयोग मंजूर करून नोकरी व शिक्षणात आरक्षण देण्याचा एैतीहासीक ठराव करून बहुजनांना हजारो वर्षानंतर पहिला न्याय दिला ! मंडल आयोग मंजूर व्हावा म्हणून 1980 पासून सतत 10 वर्षे मा. कांशीराम यांचा बहुजन समाज पक्ष, उत्तरेत डॉ. राम मनोहर लोहिया दक्षिणेत रामास्वामी पेरीयार, नॅशनल युनीयन ऑफ बॅकवर्ड क्लासेस यांनी आंदोलने केली.

    महाराष्ट्रात ना.ग. गोरे, डॉ. बाबा आढाव यांचे बरोबर मंडल आयोग समर्थन कृती समीतीत ओबीसी महासंघ, अध्यक्ष कृष्णकांत कुदळे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद वडगांवकर, मुंबईत महाराष्ट्र ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. जनार्दन पाटील, सरचिटणीस नेताजी गुरव, नागपुरचे ओबीसी मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष नागेश चौधरी, प्राध्यापक श्रावण देवरे असे अनेक कार्यकर्ते व संघटना यांनी आंदोलनात्मक कार्यक्रम राबवले. व्ही.पी. सींगांच्या निर्णया विरूद्ध प्रस्थापित जातीयवादी संघटनांनी व प्रस्थापित सामाजानी ओबीसी आरक्षणाला विरोध करून प्रति आंदोलने केली. आत्मदहनाचे प्रकारही केले.

    दुसरा प्रयत्न अडवानींनी रथ यात्रा काढून या विरूद्ध प्रचार केला. व्ही.पी. सींग सरकारचा पाठींबा काढून सरकार कोसळवले.

    सुप्रीम कोर्टात या निकाला विरूद्ध इंद्रसहानी यांनी 1992 ला सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली. ती ‘मंडल याचीका‘ म्हणुन प्रसिद्ध आहे. घटनेतील भक्कम तरतुदीने शासन निर्णयाला मंजुरी द्यावी लागली. पण न्यायालयाने क्रिमीलेयरचे पाचर व 50 % जास्त आरक्षण देता येणार नाही असे नमुद करून 52 % ओबीसींना 27% आरक्षण नोकरी व शिक्षणात मंजुर केले. मंडल आयोगाप्रमाणे पुर्ण सवलती न देण्या बाबत ओबीसीवर हा तिसरा अन्याय झाला. मंडल आयोग मंजुरी साठी मा. व्ही. पी. सींगांना कोटी कोटी प्रणाम. त्यानंतरही आरक्षण उध्वस्त करण्याचे अनेक प्रयत्न झाले ते टिकले नाहीत. महाराष्ट्रात मंडल आयोग लागु करावा यासाठी ओबीसी महासंघ व इतर संघटनांनी 3 वर्षे आंदोलन केली. मा. छगन भुजबळांनी ओेबीसी संघटनांचे सहकार्याने ठिकठिकाणी जंगी सभा घेतल्या व मा. मुख्यमंत्री शरद पवारांनी 1993 ला आयोग लागु केला. या सर्वाच्या प्रयत्नाला व शरद पवारांना धन्यवाद ओबीसींना हा दुसरा न्याय मिळाला. केंद्रीय संस्थात ओबीसींना 27% आरक्षण ओबीसींना मिळावे या केंद्राच्या निर्णया विरूद्ध ही मुठभर प्रस्थापितांच्या विरोधामुळे ते एकदम न देता टप्या टप्याने तीन वर्षात देण्याचे ठरले. 27 % जादा जागांची तरतूद करूनही असा निर्णय हा ओबीसीवर चवथा अन्याय आहे.

    5) ओबीसींच्या अनेक मागण्यापैकी ओबीसी विद्यार्थांना फ्री शीपस मिळाव्यात ही आहे पण ती सवलत ओबीसी विद्यार्थ्यांना मिळत नाही हा अन्यायच आहे.

    6) ओबीसींना जातीचे दाखले मिळवण्यात खुपच अडचणींना तोंड द्यावे लागते.

    7) लोकप्रतिनीधींचा हक्क स्थानिक स्वराज्य संस्थेत 27% नुकताच कुठं मिळु लागला एवढ्यात प्रस्थापित समाज ओबीसींचे दाखले मिळवून त्यांच्या न्याय हक्कावर अतिक्रमणे करीत आहेत. प्रस्थापित मराठे कुणबी दाखल्यावर निवडून येत आहेत हा अन्याय नाही कां ?

    8) ओबीसी जातीत समावेशासाठी सामाजीक व शैक्षणिक अशाा दोन्ही तही जे मागास आहेत त्यांच्याच ओबीसी वर्गात समावेश घटनेनुसार होऊ शकतो. प्रस्थापित मराठा समाज हा पुर्वापार गांवचा व राज्याचाही राजा समाज आहे. गल्ली पासुन दिल्ली पर्यंत सर्व क्षेत्रातील सत्ता आपल्या हातात आसतांना वर्णाने व जातीने उच्च असलेला समाज आपले ओ.बी.सी. करण करण्यासाठी आज आंदोलने करीत आहे. सर्व मागास आयोगांनी. उच्च न्यायालय व सर्वोच्य न्यायालयानेही त्यांचे ओबीसीकरण करता येत नाही. असे अनेक वेळा निकाल, देऊन ही सत्ता हातात असणारा समाज ओबीसीत समावेश करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसे झाले तर 52 % ओबीसी जनतेचे 27 % आरक्षण संपुष्टात येणार आहे. हा एक मोठा अन्यायच होणार आहे. प्रस्थापित समाजातील आर्थीक मागासांना ओबीसीत समावेश न करता आरक्षण देण्यास ओबीसींचा विरोध नसुन पाठींबाच मिळेल पण तसे केले जात नाही सत्तेतील ओबीसींचा 27 % चा वाटा संपुष्टात आणण्याचा हा उपाय शोधला आहे. नचिअप्पन अहवाल मंजुर केल्यास 50 % आरक्षणाची अट काढून टाकली जाईल व मराठा व इतर आर्थिक मागासाना कायदेशीर आरक्षण मिळेल.

9) राजकीय पक्ष ओबीसी समाजांचा सत्तेसाठी उपयोग करून घेतात पण त्यांना पक्ष संघटना अथवा सत्तेत न्याय वाटा मिळू शकत नाही. त्यांच्या आरक्षण बचावासाठी ही पाठिंबा मिळायला हवा.

10) ओबीसी दलित भटके यांना कायद्याने आरक्षण द्यावे लागते अथवा द्यावे लागेल म्हणून सर्व सार्वजनिक प्रकल्पे, उद्योग धंदे, व्यवसाय, शासकीय संस्था, कंपन्यांचे खाजगीकरण, जागतिकीकरण करणे झपाट्याने चालु आहे. त्यामुळे या सर्व क्षेत्रातील आरक्षणे संपुष्टात येतील. हाही अन्यायाचाच प्रकार आहे. 

11) भारताची जातवार जनगणना 1931 साली ब्रिटीशांनी केली त्यांनतर ती अशी झाली नाही. ती करावी म्हणून स्वातंत्र्याच्या काळात दरवेळी मागणी करूनही ती केली गेली नाही. 52 % ओ.बी.सीं.ची 1931 च्या जनगणने नुसार संख्या अद्यापी तेवढीच धरली जाते. त्या टक्केवारीत गेल्या 80 वर्षात नक्कीच  बदल झाला असणार. पण जाणीवपुर्वक जातवार जनगणना केली जात नासावी. ती केली तर ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात, नियोजनात तरतुद करावी लागेल, तितक्या प्रमाणात लोकप्रतिनिधींची मागणी होईल संख्याबळाचा दबाव वाढेल. या भिती पोटी जनगणनाच न करण्याचा अन्याय चालुच आहे.

12) मनुवाद्यांचा कायदा घटनेने संपुष्टात आणला पण वैदिक धर्माच्या जातीप्रथेच्या चार्तुवर्णाच्या जोखंडात, कर्मकाडांत ओ.बी.सी. अद्यापी गुलामच आहे. त्यामुळे समाज कार्य आंदोलने परीवर्तन चळवळी पासुन तो अलिप्तच आहे. त्यांचमुळे पुरोहित व्यवसायाला तेजी आहे. वर्षाचे 365 दिवस ओबीसी समाज प्रामाणिक पणे कर्मकांडे करीत असतो कर्मसिद्धांत, जातीअभिमान, कर्मकांड याचा पगडा. बहुजनावर खोलवर रूजवलेला आहे. आपणहून अन्याय लादून घेण्याचा हा प्रकार आहे.
बहुजनावरील ओबीसीवरील अन्यायाचे उपाय

    स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे होत आली. 1) अजुन दलितांवर अत्याचार होत आहेत. शहरात नाही पण खेड्यात अस्पृश्यता व दलितांची स्थिती अद्यापी समाधान कारक सुधारलेली नाही. 2) ओबीसीचे व्यवसाय गेल्याने व बलुतेदारी बंद झाल्याने ते बेकार झाले आहेत. व मजुर म्हणूनच राबत आहेत. व त्यावरच गुजराण करावी लागणारे अनेक समाज आहेत. कुपोषण, बालमजुरी, प्रसुती मृत्यु, शाळांचा अभाव, अर्धपोटीची उपासमार सोसणे चालु आहे. 

अन्याय निवारणासाठी इलाज :-

    ओ.बी.सी. बहुजनावर होणार्‍या अन्याया साठी इलाज करणेसाठी उपाय
1) संघटना :- सर्व प्रथम सर्व ओबीसी समाजांची बलवान संघटना होणे जरूर आहे. पण नेमके हे होत नाही दलितांची संघटना चांगली मजबुत होते, मराठ्यांच्या संघटना अनेक असल्यातरी समान प्रश्नात त्यांची एकजुट होते. मुसलमानांंची संघटना मजबुत होते. ब्राह्मणांची संघटना खंबीर पणे एकजिनसी होते. पण ओबीसींची होत नाही. यांचे कारण म्हणजे जाती प्रथेचा पगडा. ओबीसी इतका फरक इतर कोणत्याच जाती समुहात नसल्याचे दिसते. प्रत्येक जात ही बेडकासारखी कुपमुंडुक वृत्तीची आहे. दुसर्‍या जातीत न मिसळण्याचे हजारो वर्षांचे संस्कार ओबीसींनी प्रखरपणे जपले आहेत. जाती जातीचे मेळावे वधुवर मेळावे संमेलने अधिवेशने हजारो च्या संख्येने होतात. पण ओबीसी मेळावे अधिवेशनास ओबीसी सामील होण्यास उदास असतात. ओबीसींच्या आरक्षण आंदोलनास बीसी समाज ओबीसींपेक्षा मोठ्या हिरीरीने सरसावला होता. ओबीसी आरक्षणावर अतिक्रमण होत असतानाही ओबीसी समाज शांत आहेत रस्त्यावर उतरणे तर लांबच. ओ.बी.सी. समाज व संस्था तर अनेकदा निमंत्रणे देऊनही ओबीसी कल्याणाच्या अंदोलनात अपवादात्मक वेळेलाही सामिल झालेले नाहीत. हे नोंद घेण्यासारखे आहे. उलट काही ओ.बी.सी. तर ओ.बी.सींच आरक्षणाविरूद्धच बाजु घेताना आढळतात.

    ओ.बी.सी. मधील 64 हजार लोकप्रतिनिधी ओ.बी.सी. आरक्षणावर निवडून आलेत पण ओ.बी.सी. प्रश्नावर आवाज काढत नाहीत. पाच लाखाहुन अधीक ओबीसी नोकरदार व लाखो विद्यार्थी यांनी ओ.बी.सी. प्रमाणपत्रानुसार शिक्षण नोकरीत संधी घेतली पण तेही ओबीसीसंघटना आंदोलन यात शुन्य टक्के असतात.

    तथाकथित ओ.बी.सीं.चे आमदार व मंत्री झालेले नेते स्वत: ओबीसींचे कैवारी म्हणणारे ही स्वत:च्या जातीचेच भले करण्यात धन्यता मानतात. त्यांना पक्षात स्थान ओबीसीच्या जाती संघटनांच्या पाठींब्याने मिळते. पण ते जातींना संघटनांना त्या पक्षाच्या दावणीला बांधताना दिसतात ओबीसींच्या प्रश्नाच्या गांभीर्यापेक्षा स्वत:चे स्थान टिकवण्याचा त्यांना प्रयत्न करावा लागतो. तिथे टिकुन रहावे लागते. ते सोडून ओ.बी.सीं.च्या भरवशांवर बाहेर पडाव अशी विश्वासार्हता ओ.बी.सी. समाजांनी संघटित होऊच निर्माण केलेली नाही. व ती भविष्यात होईल असा भरवसा नाही.

    उपाय ) प्रामुख्याने 22 % दलितांच्या पुढाकराने राजकीयपक्ष आर. पी. आय. पक्ष आहे. 52 टक्के ओबीसींच्या एकजुटीने स्वतंत्र राजकीय पक्ष झाल्यास हा समाज संख्या बळावर कायम सत्ताधारी समाज राहिल. म्हणून ओबीसी पार्टी ऑफ इंडीया का उदयाला येत नाही ? अन्यथा ओबीसीनी भरीप बहुजन महासंघ, राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन समाज पार्टी, अशा समविचारी पक्षात सामील होऊन सत्ताधारी होण्याचा प्रयत्न कां करू नये ? बी.सी. ओबीसी एकत्र आल्यास ते सत्ताधारी होऊ शकतात. हे भावी काळात होणे अशक्य नाही.

    3) सामाजिक आर्थिक शैक्षणिक प्रगती साठी उपाय :-

        ओबीसी, दलित, भटके विमुक्तातील आर्थीक संपन्न व्यक्ती व नेते अथवा समाजाने शिक्षण संस्था सुरू करून शैक्षणिक स्तर उंचवावा प्रशासनातील अधिकारी पदासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी ओबीसी भटके दलित विद्यार्थ्यांची करवून घेण्याचे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवावेत व शैक्षणिक विकास करावा. तसेच उद्योजकांनी मागासांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यावेत संगणक, तंत्रज्ञान यातील प्रगत ज्ञानाचे उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना संधी द्यावी ज्ञान संपन्न करावे.

    ओबीसींची गुणवत्ता श्रेष्ठतम दर्जाची आहेच त्यामुळे शिक्षण हेच प्रगतीचे साधन समजुन त्याात प्रगती करावी असे केल्यास आरक्षणावर अवलंबून रहावे लागणार नाही. व प्रशासनात न्याय वाटाही मिळेल.

    4)  सत्तेत वाटा मिळवण्यासाठी आर्थीक कुवत व संघटनेचे बळ उभे करावे लागले. 
    त्याच बरोबर इच्छाशक्ती वाढावावी लागले.
    सत्ता ही घरी बसुन, निष्क्रीय राहुन उदासीन राहुन मिळणार नाही.

    म्हणुन डॉ. बाबासाहेबांच्या संदेशा प्रमाणे शिका, संघटित व्हा व संघर्ष करा व सत्ताधारी व्हा, झोपेतून जागे व्हा ! सक्रीय व्हा ! सावध रहा ! दक्ष रहा !  औदासिन्य झटका, बुद्धी भेद करणार्‍या पासून चार हात दूर रहा ! जातीभेद विषमतेला अंधश्रद्धेला गाडा ! कर्मकांडांच्या गुलामीतुन मुक्त व्हा ! म्हणजे कार्यासाठी वेळ सवड मिळेल.

    अजगरा सारखा सुंद पडेलेला निद्रावस्थेत असलेला ओबीसी समाज खर्‍या अर्थाने जागा झाला पेटून उठला तर ज्वालामुखी सारखा होईल. व या भारतावर राज्यावर एक दिवस ओबीसींचे बहुजनांचे राज्य येईल. असा सकारात्मक सातत्याने विचार केल्यास प्रत्यक्षात घडु शकेल हा विश्वास वाटतो !

    5) आरक्षण :- जीवशास्त्रानुसार शरीर शास्त्रानुसार जर मेंदु, शरीर, मन बुद्धी यांना विशिष्ट प्रकारचे मर्यादितच काम सतत दिले तर त्याची नैसगकि ठेवणही तशी बनते. विचारांचे ज्ञानाचे काम सतत दिले तर मेंदुचा मनाचा,, बुद्धिचा विकास होतो. शरीराला विशिष्ठ प्रकारचा सतत व्यायाम दिला तर शरीराचे अवयवांचे स्वाभावीक स्वरूप व कार्य विकसित होते. या उलट शरीराचा एखादा अवयव न वापरता तसाच आनेक दिवस ठेवला तर त्याचा विकास न होता तो कायमचा निरूपयोगी बनतो हा जीवशास्त्राचा नियम आहे.

उदा. सापाला पुर्वी पाय होते पण त्याचा वापर न करता तो बिळात राहु लागला कालांतराने बिन पायांचा झाला. (वर्ळीीीश ईंहीेहिू)

    सर्व मागासवार विद्या बंद्या व्यवसाय बंदी हजारो वर्षे लादली त्याने त्यांच्या बुद्धीचा विकास, खुंटला व बुद्धीचा विकास खुंटतो हे सत्य समजून घ्यायला हव, मागास अतिमागास हेे आती मागास का राहिले याला शास्त्रीय आधार आहे.

    मागास अतिमागासावरील सर्व बंद्या कायद्याने उठवण्याचे महान कार्य युगपुरूष डॉ. बाबासोा आंबेडकरांनी केले. तेव्हा पासुन मागास अतिमागासांचा विकास होऊ लागला आहे. हे दिसत आहेच. पिढ्यान पिढ्या मागास ठेवल्यामुळे मागास अतिमागास मागे पडले म्हणुन त्यांच्या विकासासाठी आरक्षणाची तरतूद घटनेत केली.

    जो पर्यंत सर्व मागास समाज उच्चवर्णीयांच्या बरोबरीने विकसित होत नाहीत. तो पर्यंत ही आरक्षण चालुच रहाणे न्यायाचे आहे. अतिमागासांना आरक्षण गेल्या साठ वर्षापासून तर ओबीसींचे आरक्षण गेल्या 20 वर्षापासुन मिळत आहेत.

    सर्व बद्यांनी हजारो वर्षे मागास ठेवल्यानंतर कोणावरही असेच मागास रहावे लागते. हा निसर्ग नियम लक्षात घेतल्यास हजारो वर्षे मागास असणार्‍यांचा विकास इतक्या कमी कालावधीत होणे. व समता प्रस्थापित होणे शक्य नाही. म्हणूनच यासाठी समता प्रस्थापित होईपर्यंत आरक्षण चालु रहावीत. ही काळाची व या देशाची गरज आहे. तथापी शासनाने दर वीस वर्षानी विकासाचे निकष मंडल आयोगा प्रमणो लावून, मागासाचा अभ्यास करून जे समाज सुधारलेत उच्च वर्णीयां बरोबर पुर्ण नाही. पण सर्वसाधारणपणे आलेत त्यांनाही आरक्षणातून वगळावे. म्हणजे उरलेल्या मागासांना विकासाची संधी मिळेल. अन्यथा जे सुधारलेत तेच सर्व आरक्षणाचा लाभ घेत रहातील व अल्प छोटे मागास जाती जमाती (ाळलीे र्लेााीपळींळशी) तसेच मागास पिढ्यान पिढ्या होते तसेच राहतील. तो सुद्धा एक अन्यायच होईल. नव्हे तो सद्या होतच आहे. पुढारलेल्या जातीच जास्त लाभ घेतात. एवढेच नव्हे ज्या कुटुबांनांही आरक्षणातून वगळायला हवे. कलेक्टर, मामलेदार, क्लास वन, आय.पी.एस. अधीकारी यांना आरक्षणाची काय गरज आहे ?

    क्रिमीलेअर मुळे कांही प्रमाणात मागासातील प्रस्थापितांना आरक्षणाची संधी नाही तथापी ती मर्यादाही योग्य व न्यायाची असायला हवी.

    नाहीतर आरक्षणाचा लाभ घेण्याच्या अवस्थेत असणारा क्रिमीलेअर लाभ घेऊ शकत नाही. व ज्याला लाभ देता येईल तो ते घेण्याला पात्र झालेला नसतो. म्हणजे आरक्षणाचा लाभ बर्‍याचअंशी खर्‍या अर्थाने मिळू शकत नाही. अशी आज विचित्र वस्तुस्थिती आहे. मंडल आयोग मंजुरी  नंतरही बी.सी. 22.5% व ओबीसी 52 % अशा 75 % ना फक्त एकुण 50 % च आरक्षणाची अट ही अन्यायाचीच आहे. नचिअप्पन अहवाल मंजुर केल्यास ती अट काढू शकता येईल. व ओबीसींना लोकसंख्येप्रमाणे  आरक्षण मिळेल व मराठा प्रगत समाजातील आर्थिक दुर्बलांना व इतर समाजातील आर्थीक दुर्बलांनी आरक्षण कायदेशीर पणे मिळू शकेल व त्यामुळे प्रस्थापित मराठा सामाजाचा ओबीसी वर्गात समावेश करण्याचे बेकायदेशीर व सामाजीक अन्यायाचे कृत्यही टळेल. म्हणुन नचिअप्पन मंजुर करणेसाठी ओबीसी मराठा समाजाने सधारनपणे प्रयत्न करणे जरूरीचे आहे. मराठा समाजातील आर्थीक दुर्बलांना ओबीसी कोट्यातून आरक्षण न देता स्वतंत्रपणे आरक्षण देण्याला ओबीसींचा विरोध नाही. उलट पाठींबाच आहे. म्हणुन नचिअप्पन अहवाल मंजुर करून घ्यायला हवा हे सर्वानीच समजून घायला हवे. म्हणून आरक्षण हा सामाजीक अन्यायाच्या परिमार्जनाचा प्रथम क्रमांकाचा उपाय आहे.

ब) सामाजिक विषमता नष्ट करण्याचा उपाय :- आंतरजातीय विवाह 

    ओबीसींनी पोट जातींना मुठमाती द्यावी एवढेच नव्हे तर मोठ्या प्रमाणात आंतर जातीय विवाह करून ’जाती तोडा समाज जोडा’ अभियान राबवले पाहीजे. सामाजीक समता प्रस्थापित करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे तो डॉ. बाबासाहेबांनीही सांगीतला आहे. म्हणुन जातीचे वधुवर मेळावे न भरवता आंतरजातीय वधुवर मेळावे मोठ्या प्रमाणात भरवावेत व चातुर्वर्णीच्या जातींच्या हजारो वर्षाच्या गुलामीतुन मुक्त व्हावे.

    6) धार्मिक तत्वज्ञान परिवर्तन :- ओबीसी, भटके, बीसी, अन्यायाचे मुळ हिंदुधर्मग्रंथात आहे. यासाठीधर्मातुन चातुर्वर्ण व जातीव्यवस्थेच्या तत्वज्ञानाला काढुन टाकाणेसाठी धर्मचिकित्सा व सुधारणा व्हायला हवी. सनातनी धर्ममार्तंड याला तयार रहणार नाहीत पण विषमतेच्या आधारावर धर्म असणे भारतीय घटनेला छेद देणारे आहे. विषमता व जातीयता शाबुत ठेवणारे जे जे असेल ते ते धर्मातून वगळण्याची सुधारणा करण्याचे काम पुरोगामी विचारवंत सनातनी धर्ममार्तंड, देशाची शासन व्यवस्था यांच्या सहमतीने झाल्यास हा देश घटनेप्रमाणे समतेच्या समानतेच्या बंधुत्वाचे जोरावर जगात महान होईल.

    7) धर्मांतर ? :- धर्माची विषमतेची बैठक अबाधीत अपरिवर्तनीय ठेवण्याचा अट्टहास प्रस्थापित उच्चवर्णीय व राजसत्तेने केल्यास विषमतेच्या व जातीयतेच्या प्रतिष्ठा नसलेल्या अन्यायी सनातनी धर्मात ओबीसींनी जगणे चालुच ठेवावे कां ? अथवा जिथे विषमता नाही उच्चनिचता नाही जातीप्रथा नाही समता समानता बंधुता आहे. अशा धर्माचा स्वीकार का करू नये ? वरील उपाय व प्रयत्न गांभीर्याने करणेची वेळ आली आहे. याची ओ.बी.सीं.नी गांभीर्याने दखल घ्यावी वरील उपाय केले तरच तरणोपाय आहे.

    जय जोती ! जय क्रांती ! जय भीम ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !

संदर्भ सुची :- 

1) बहुजनांचा सत्ता संघर्ष :- ले. पुरूषोत्तम खेडकर
2) बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास :- ले. पुरूषोत्तम खेडकर
3) नामदेव ते मंडल आयोग :- ले. मोहन देशमाने
4) तेल गल्ली नियत कालिक, मार्च 2007 अंक 3, संपादक मोहन देशमाने
5) तेली गल्ली नियत कालिक जाने 2008, अंक 1 संपादक मोहन देशमाने
6) आरक्षण विचार गाथा, ओबीसी सेवा संघ प्रकाशन, 2006
7) महात्मा जोतिबा फुले, ले . राजाराम सुर्यवंशी, नोव्हेंबर 2002
8) पुरोगामी सत्यशोधक वर्ष 26 अंक मे, जुन 2002 
9) आरक्षण :- ले. प्रदिप गायकवाड, तृतीय आवृत्ती 2003 
10) मराठ्यांचे दासीपुत्र :- ले. रामचंद्र लाड, सुमेद्य प्रकाशन, प्रथमाआवृत्ती, पुर्नमुद्रण, डिंसेबर 2004
11) भगवान बुद्ध व त्यांचा धम्म :- डॉ. भीमराव आंबेडकर, प्रकाशन बुदिस्ठ रिसर्च असो. नांदेड, आवृत्ती आक्टोबर 2003



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209