महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने उच्च प्राथमिक शाळा शिवनी येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मुख्याध्यापक अल्का तिजारे,यांच्या अध्यक्षता व शिक्षक रजनीगंधा वंजारी आणि अनुज हुलके यांची उपस्थिती होती. महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. शिक्षणाच्या विश्वात महात्मा फुले यांचे योगदान, मुलींचे शिक्षण,शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या शुद्रातिशुद्र, श्रमिक कष्टकरी समाजाला शिक्षण मिळावे, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व्हावे, मोफत व सक्तीच्या शिक्षणाची शासनाने जबाबदारी उचलून समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी केलेले प्रयत्न आदी मुद्द्यांच्या अनुषंगाने मान्यवरांनी स्मरण केले. या कार्यक्रमाचे संचालन सानिध्या लांबट, तर आभार प्रदर्शन उर्वशी सोनबावणे ह्या विद्यार्थ्यांनीनी केले. सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम आयोजित करण्यात सहकार्य केले.