जत दि.२५ डिसेंबर २०२३ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथे चवदार तळे आणि २५डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे आपल्या सहकार्याना सोबत समाजात विषमता आणि भेदभाव निर्माण करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सामाजिक विषमतेच्या विरोधात आवाज उठवीला एवढेच नव्हे तर या सामाजिक विषमतेचे मूळ हे वैदिक धर्मात असून वैदिक धर्म मूठभर लोकांनी बहुसंख्य लोकांना स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून घेऊन इतरांना गुलाम करण्यासाठी निर्माण केला आहे. अजूनही भारतातील लोकांची गुलामगिरीतून मुक्तता झाली नाही. पन्नास टक्के स्त्रीया ८५% बहुजन यांना गुलामगिरीतून वाटचाल करावी लागते. सम्राट अशोक यांनी सामाजिक न्यायासाठी राज्य केले आदर्श आणि संपन्न असे राज्य व्यवस्था सम्राट अशोक यांच्या काळात होती. सम्राट अशोक यांचा वंशज राजा बृहदरथ यांची हत्या त्यांचा सेनापती पुष्यमित्र शृंग यांनी केली. त्यानंतर विषमतावादी समाज रचना सुरू झाली. पुढे बाराव्या शतकात विश्वगुरू बसवण्णा यांनी सामाजिक विषमतेचे मूळ वैदिक धर्मात आहे म्हणून वैदिक धर्माचा त्याग करून १४ जानेवारी ११५५ रोजी लिंगायत धर्म स्थापन केला. विश्वगुरू बसवण्णा यांच्या जन्म काळात सर्वत्र अज्ञान, अंधकार, अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती, अंधश्रध्दा ,जातीवाद यांचा हाहाकार माजला होता.विश्वगुरू बसवण्णा यांनी वेद,पुराण,शास्त्र यांचा सखोल विध्याभ्यास केला.विध्याभ्यास केल्यावर विश्वगुरू बसवण्णा यांना जाणवले की अज्ञान, अंधकार, अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती, अंधश्रध्दा ,जातीवाद यांचे मूळ हे वैदिक धर्मात असून या धर्मात उपाषणा पध्दतीसुध्दा विचित्र आहेत म्हणून याला पर्याय म्हणून बाराव्या शतकात विश्वगुरू बसवण्णांनी मानवता वादी लिंगायत धर्माची स्थापना केली बसवण्णा यांना वेद,पुराण,उपनिषदे इत्यादींचा अभ्यास केल्यानंतर एका स्वतंत्र अतिशय चांगल्या धर्माची त्यांना गरज वाटली.त्यांना विविध धर्मातील काही तत्वे आवडली असली तरी संपूर्ण तृप्ती प्राप्त झाली नव्हती.म्हणून बसवण्णा यांना असे वाटले की लोकांमध्ये प्रचलित असलेल्या उपासना वस्तू विचित्र आणि विलक्षण असून परिपूर्ण नाहीत.म्हणून त्यांना विश्व आकाराचा इष्टलिंग अविष्कार झाला. अशा प्रकारे विश्वगुरू बसवण्णांनी पवित्र अशा लिंगायत धर्माची स्थापना केली. याच पध्दतीने आणि याच कारणा करिता
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची २४ सप्टेंबर १८७३ रोजी स्थापना केली. जमीनदार, शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. `निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला. देवाविषयी किंवा निसर्गाविषयी निर्मिक हा शब्द वापरला, त्यावरून सत्यशोधक समाज व अर्थातच महात्मा ज्योतीबा फुले आस्तिक होते, हे स्पष्ट होते. महात्मा फुले यांनी कनिष्ठ वर्गातील लोकांसाठी गुलामगिरी हा उपदेशपर ग्रंथ लिहून झाल्यानंतर महाराष्ट्रात पंतोजी व शेटजींच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्धार केला ज्योतिबा फुले हे क्रांतिकारी नेते असल्याने त्यांच्या वृत्तीशी सुसंगत व धोरणाला पोषक असे तत्त्वज्ञान व व्यासपीठ निर्माण करणे त्यांना अत्यंत गरजेची वाटली यातूनच सत्यशोधक समाजाची निर्मिती झाली सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान मानताना एकेश्वरवाद ईश्वर भक्ती व्यक्तीचे श्रेष्ठत्व त्याचप्रमाणे ग्रंथप्रामाण्य त्याला विरोध सत्य हेच परम मानवी सद्गुणांची जोपासना अशाप्रकारे वैचारिक आणि प्राथमिक भूमिका घेऊन सत्यशोधक समाजाने आपले तत्त्वज्ञान मांडले ईश्वराची भक्ती ही निरपेक्ष भावनेने असावी त्यामध्ये मध्यस्थाची अथवा भट भिक्षूची आवश्यकता नाही याचे प्रतिपादन सत्यशोधक समाजाने केले त्याचप्रमाणे व्यक्ती ही जन्माने श्रेष्ठ नसून ती गुणकर्माने श्रेष्ठ ठरते याचे स्पष्टीकरणही सत्यशोधक समाजाने दिलं पाप-पुण्य स्वर्ग-नरक पुनर्जन्म या गोष्टीला त्यांनी थारा दिला नाही तर सत्य हेच परब्रम्ह आहे अशा प्रकारचा विचार सत्यशोधक समाजाने मांडला मानवाच्या अंगी असलेल्या सद्गुणांची जोपासना व्हावी हा विचार दृढ करण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाने केला सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या विचारांना प्रस्तूत केले आहे मानवता धर्माची शिकवण सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला गेला सामाजिक परिवर्तनाची दिशा ठरवताना सत्यशोधक समाजाने समाजातील दीन दलित उपेक्षीत समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला सत्यशोधक समाजातर्फे 'दीनबंधू' नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर समाज सुधारणा करण्यासाठी कार्य केले. म्हणून या थोर महापुरुषांचे कार्याला मानाचा मुजरा देण्यासाठी जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने मनुस्मृती ग्रंथाचे दहन करून २५ डिसेंबर मनुस्मृती ग्रंथ दहन दिवस पाळला. या कार्यक्रमाप्रसंगी तुकाराम माळी, मुबारक नदाफ, रवींद्र सोलनकर, आदी उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan