जत तहसील कार्यालयावर सात डिसेंबर २०२३ रोजी जत तालुका सकल ओबीसी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार असून त्यासाठी जत तालुक्यात गावो गावी जोरदार प्रचाराला प्रचंड प्रतिसाद
जत दि.२६नोव्हेंबर २०२३ - जत तालुक्यातील ओबीसीं समाजाचा जत तहसील कार्यालयावर गुरुवार दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी मोर्चा काढण्यात येणार असून त्यासाठी जत तालुक्यात गावो गावी जोरदार प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळी जत येथून प्रचाराला सुरुवात झाली. तेथून केंचराया मंदिर वळसंग येथे म्हाळाप्पा पुजारी यांचे नियोजन खाली बैठक संपन्न झाली. कोळगिरी येथे सरपंच हेळवी, जागननाथ माळकोटगी, तुकाराम डिसकळ, माडग्याळ येथे सोमना हाक्के, प्रदीप करागणीकर, बाळासाहेब कोरे, लकडेवाडी सरपंच, सोन्याळ येथे संतोष पाटील, जाडरबोबलाद महादेव अंकलगी, शिवांनद बिराजदार, उटगी येथे बसवराज बिराजदार, कांतू बिराजदार निगडी तांडा, उमदी चन्नप्पा होर्तिकर, वहाब मुल्ला, डॉ. लोणी हळी खवेकर मेडीदार, बाळगाव येथे कोटी तर बोर्गी येथे पाटील यांनी बैठक नियोजन केले.
प्रमुख मागण्या
१) ओबीसी अस्मिता मा.ना.छगणराव भुजबळ साहेब ओबीसी नेते यांचेवर एकतर्फी टीका,टिप्पणी,अस्लिल मजकूर,धमकी देणे थांबवावे.
२) मराठा समाजाला आरक्षण संविधान मार्गाने न्यालयात टिकणारे देण्यात यावे.
३) जात निहाय जनगणना करण्यात यावी.
४) मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी त्वरित लागू करण्यात याव्यात.
५) अनुसूचित जाती,जमाती आरक्षणप्रमाणे ओबीसी आरक्षणाला घटनात्मक दर्जा द्यावा.
६) असंवैधानिक क्रिमीलेअर अट रद्द करावी.
आदी प्रमुख मागण्यासाठी प्रचंड मोर्चा
जत तहसील कार्यालयावर सात डिसेंबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजता जत तालुका सकल ओबीसी संघटनेच्या वतीने काढण्यात येणार आहे सर्वांनी मोर्चा मध्यें मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्र राज्यात ओबीसी प्रवर्गावर होणाऱ्या अन्याला वाचा फोडावी असे महादेव पाटील, तुकाराम माळी, बसवराज बिराजदार, सोमाण्णा हाक्के जे.के.माळी,शंकरराव वगरे,तायाप्पा वाघमोडे,सलिम नदाफज, सागर शिनगारे,शिवानंद बिराजदार,लक्ष्मण पुजारी, हाजीसाहेब हुजरे, बाबासाहेब माळी ,आदी मान्यवर यानी प्रचार दौऱ्यात सहभागी होऊन मोर्चाची माहिती सांगून मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्यास सांगितले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission