पॅलेस्टीन - इस्रायल संघर्षात मराठा - ओबीसी संघर्षाचे प्रतिबिंब ! (पुर्वार्ध)

- प्रा. श्रावण देवरे

     पॅलेस्टीन-इस्रायल युद्धात सगळे जग होरपळून निघेल की काय, अशी भीती निर्माण झालेली आहे. प्रत्येक युद्धामागे एक जागतिक पदार्थ कारणीभूत असतो. आणी हा जागतिक पदार्थ म्हणजे शोषण-शासनाची व्यवस्था! ही व्यवस्था निर्माण करणारे, तीला सूत्रबद्ध करनारे, तीला समाजमान्यता-धर्ममान्यता मिळवून देणारे मुठभर प्रस्थापित लोक तन-मन-धनाने, काया-वाचा-मने व साम-दाम-दंड-भेद नीतीनुसार अहोरात्र काम करीत असतात.

Maratha OBC Sangharsh     पॅलेस्टीन-इस्रायल संघर्षात मैदानात दोन विरोधी शक्ती उतरलेल्या आपल्याला दिसत आहेत. परंतू तीसरी ‘महा-शक्ती’ पडद्याआड राहून दोन्ही विरोधी शक्तींना नियंत्रित करीत असते, हे आपल्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुवाहाटी मुक्कामी सांगीतलेले आहेच! पॅलेस्टीन-इस्रायल संघर्षात अमेरिका ही ‘महाशक्ती’ म्हणून काम करीत आहे, हे सर्व जगाला माहीत आहे.

    पॅलेस्टीनच्या भोळ्या जनतेने 1935-40च्या काळात काही ज्यु लोकांना जमीनी विकल्या व त्यांना उदारपणे सह-अस्तित्व दिले. त्या उदारपणाचा गैर-फायदा घेत ज्यु-लोकांनी आपली एक-एक संख्या वाढवित नेली व पुरेसे संख्याबळ प्राप्त होताच दुसर्‍या जागतिक महा-युद्धाचा फायदा घेत आपल्या इस्रायल राष्ट्राची घोषणा केली. पॅलिस्टीन जनता खळबळून जागी होताच युद्धाला तोंड फुटले, ते अजून बंद होण्याचे नाव घेत नाही.

    दुसर्‍या महायुद्धानंतर जगाची पुनर्रचना झाली. जगाचा केंद्रबिंदू ब्रिटन न राहता अमेरिका बनला. जगावर बिनबोभाट सत्ता गाजविण्यासाठी अमेरिकेने विभागीय दलाल-देश निर्माण केलेत. जगात सर्वत्र प्रत्येक देशाला किमान एकतरी शेजारचे राष्ट्र ‘शत्रूराष्ट्र’ म्हणून मिळतच असतेच. या दोन शत्रूराष्ट्रापैकी एका राष्ट्राची बाजु घेऊन युद्ध-सातत्य ठेवले जाते. जगभर चाललेल्या लहान-मोठ्या युद्धात जी शस्त्रे-अस्त्रे वापरली जातात ती एकतर अमेरिकेत तयार होतात किंवा एखाद्या फ्रान्ससारख्या युरोपीय पुढारलेल्या देशात!

    पॅलिटीन-इस्रायल युद्धात मुख्य रोल महाशक्ती असलेल्या अमेरिकेचा आहे. प्रत्येकाचे आपापले वेगळे हितसंबंध असून त्याच्या रक्षणासाठी तीघे आपापल्या भुमिका घेउन काम करीत आहेत. आता या युद्धात इस्रायलच्या पाठीशी महाशक्ती अमेरिका खंबीरपणे उभी आहे. अमेरिकेला तेल-अर्थव्यवस्थेवर कब्जा करायचा असल्याने आपले एक लष्करीतळ पश्चिम एशियीतील आखाती देशात उभारण्याची गरज होती. ते लष्करी तळ इस्रायलच्या निमित्ताने अमेरिकेला मिळाले.
 हे युद्ध पॅलिस्टीनची जनता प्राणाची बाजी लावून का लढते आहे, कारण त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. पॅलेस्टीनींजवळ लढण्यासाठी एकच-एक कारण आहे. परंतू इस्रायली लष्कर ही लढाई अनेक कारणांसाठी लढत आहेत पहिले कारण हे आहे की, त्यांना आपल्या देशाचा विस्तार गाझा पट्टीपर्यंत करायचा आहे. दुसरा उद्देश असा आहे की इस्रायलला आपला मालक असलेल्या अमेरिकेला युद्धाचे सातत्य दाखवायचे आहे, म्हणजे मालक अमेरिकेला खुश करायचे आहे. तिसरे कारण हे आहे की अमेरिकेच्या जागतिक लुटीत त्यांना आपला हिस्सा वाढवायचा आहे.

    पॅलेस्टीन, इस्रायल व अमेरिका ह्या तीन शक्ती या युद्धात कार्यरत आहेत. आता या ओबीसीनामाचे टायटल वाचल्यावर आपल्या मनात साहजिकपणे प्रश्न उद्भवेल की, या युद्धात मराठा-ओबीसी संघर्षाचे प्रतिबिंब कुठे आहे? आणी मराठा-ओबीसी युद्धात पडद्याआड असलेली तिसरी महाशक्ती कोण आहे ?

    भारतात बळीराजाच्या पराभवानंतर अब्राह्मणी-ब्राह्मणी युद्धाला तोंड फुटले आहे, ते अजून थांबायचे नाव घेत नाही. हे युद्ध कधी वर्णसंघर्षातून तर कधी जातीसंघर्षातून लढले जात असते. बळीराजा विरुध्द आर्यवामनच्या मैदानी युद्धानंतर महामानव बुद्धाचे धम्मयुद्ध वैदिक-ब्राह्मणांच्या विरोधात लढले गेले. हे युद्ध जसे मैदानी होते, त्यापेक्षा जास्त वैचारिक प्रबोधनाचे होते. पुष्यमित्रशृंगाच्या ब्राह्मणी प्रतिक्रांतीनंतर त्याची जागा जातीयुद्धाने घेतली. ब्रिटिश काळापर्यंत हे अब्राह्मणी-ब्राह्मणी युद्ध अशा पद्धतीने वर्ण-जाती स्वरूपात सुरू होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील ब्राह्मणी-अब्राह्मणी युद्धाची पुनर्रचना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जात्यंतक लोकशाहीची क्रांती करायची असल्याने त्यांनी भारतीय संविधानात जातीयुद्धाची पुनर्रचना केली.

    बाबासाहेबांच्या पुनर्रचनेनुसार हे युद्ध अब्राह्मणांद्वारे कसे लढले गेले पाहिजे होते व ब्राह्मणांनी त्याला कोणत्या दिशेला नेले. त्यात मराठा-ओबीसी संघर्षाची नेमकी काय भुमिका आहे, ते जाणून घेण्यासाठी "ओबीसीनामा-6" (उत्तरार्ध) ची वाट पाहू या!       
तोपर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!

- प्रा. श्रावण देवरे
संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्कः 94 227 88 546,  ईमेलः obcparty@gmail.com

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209