चंद्रपूर, - राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटना व जात संघटनांची बैठक मातोश्री सभागृहात पार पडली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली ही सभा घेण्यात आली. यावेळी 1 नोव्हेंबर 2023 रविंद्र टोंगे यांच्या वेंडली गावापासून ओबीसींच्या भविष्यासाठी भेटी गाठी जनजागृती अभियान सुरू जिल्ह्यातील 15 तालुक्यात अभियान राबवून त्याचा समारोप चिमूर तालुक्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेले आंदोलन 30 सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समाप्त केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी पुढील तीन दिवसांत या सर्व मंजूर मागण्यांचे इतिवृत्त प्रकाशित करू असे बोलले. परंतु, अजून पर्यंत इतिवृत्त दिलेले नसल्याने सरकारचा निषेधाचा ठराव करण्यात आला.
ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे, विजय बलकी व प्रेमानंद जोगी यांचा नागरी सत्कार कार्यक्रम 30 ऑक्टोबर प्रियदर्शन सभागृहात सायंकाळी 6 वाजता घेणार आहे. ओबीसीत मोडणारे खासदार, आमदार यांनी अजूनपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून देऊ नये, असे निवेदन सरकारला दिले नाही आहे, त्यांना तसे निवेदन देण्यासाठी भाग पाडणे.
सभेला विदर्भ तेली महासंघाचे प्रा. सूर्यकांत खनके, माळी महासंघाचे अरुण तिखे, रामभाऊ खडलिंगे, प्रा अनिल शिंदे, नंदू नागरकर, पप्पु देशमुख, रविंद्र टोंगे, विजय बलकी, प्रेमानंद जोगी, डॉ. दिलीप कांबळे, शाम लेडे, राजेश बेले, श्रीधर मालेकर, कृणाल चहारे, अरूण देऊलकर, हितेश लोडे, मनिषा बोबडे, कुसुम उदार, रजनी मोरे, गोमती पाचभाई उपस्थित होते.
obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission