नागपूर - राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाची विदर्भस्तरीय 'ओबीसी युवांचे विचारमंथन' आज रविवारी धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात झाले. दिवाळीपर्यंत ओबीसी विद्यार्थ्यांकरिता ७२ वसतिगृह सुरू न केल्यास पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरण्यास तयार राहण्याचे आवाहन केले. तर चंद्रपूरचे ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी उपोषण करण्याचे संकेत दिले.
विचारमंथनाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे होते. प्रमुख पाहुणे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, उपाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे ऋषभ राऊत, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे, शहराध्यक्ष विनोद हजारे, पराग वानखेडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. तायवडे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघ सतत ओबीसीच्या प्रश्नावर सरकारविरुद्ध आपली लढाई चालू ठेवणार असल्याचे सांगितले. महासचिव सचिन राजूरकर यांनी १ नोव्हेंबरपासून चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसीच्या भविष्यासाठी भेटीगाठी जनजागृती अभियान रवींद्र टोंगे
यांच्या वेंडली या गावातून सुरू करण्याची घोषणा केली.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नीलेश कोढे यांनी, संचालन रितेश कडव व आभार प्रदर्शन विनोद हजारे यांनी केले. यावेळी शहराध्यक्ष परमेश्वर राऊत डॉ. राजू गोसावी आशीष तायवाडे, शुभम वाघमारे, गणेश आवारी, खुशी दुरुगकर, अपेक्षा नेउल, आदेश बोरकर, संजना ढोले, तक्षशिला धुरंधर, उन्नती सोंकुवर, राहुल निमजे, शंतनू धोटे, राकेश इखार, अमेय रोखडे, नीरज बोंडे, आयुष पाटील, तुषार ठाकूर, खुशबू दियेवार, हुमानशी धारपुरे, लोकेश बारापात्रे, अचाल पेंदाम, सुधांशू बावणे, पूनम जैन, खुशाली मेश्राम, रिद्धी गुप्ता आदींसह विद्यार्थी व युवक उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan