राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ या संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन १९ नोव्हेंबर २०२३ रोजी शेगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ काम करते. या संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेले आहेत.. ओबीसी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी, संविधानिक मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या लाभाच्या योजना व शिष्यवृत्ती चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
ओबीसीतील अनेक रत्नांचा मानसन्मान करण्यासाठी या कार्यक्रमांमध्ये ओबीसी रत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे.. डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्कार .क्रांतीसुर्य महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, अशा पुरस्कारांचे वितरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.. हे अधिवेशन एक दिवशीय असून दोन सत्रात होणार आहे या अधिवेशनाला राज्यातील व सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.. या अधिवेशनामध्ये ओबीसीच्या संविधानिक मागण्या मांडण्यात येणार आहेत.. देश व राज्य पातळीवरील सचिव दर्जाचे अधिकारी पदाधिकारी ओबीसी नेते या राज्य अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे राज्यातील सर्व ओबीसी कर्मचारी अधिकारी जे केंद्रीय सूचिमध्ये ओबीसी प्रवर्गात येतात अशा सर्वांनी या अधिवेशनास उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे राज्याध्यक्ष शाम लेडे व राज्य सरचिटणीस अनिल नाचपले यांनी केले आहे.