लातूर - राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक लातूर जिल्हा परिषदेतील विलासराव देशमुख गार्डनमध्ये संपन्न झाली.
ओबीसी कर्मचारी अधिकारी यांच्या ज्वलंत प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १९ नोव्हेंबर २०२३ रोजी संघटनेचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन शेगाव येथे होणार असल्याचे राज्य सरचिटणीस अनिल नाचपल्ले यांनी जाहीर केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर संघटना काम करत असून ओबीसीतील सर्व घटकांना संविधानिक न्याय मिळवून देण्यासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावर काम करत असून संघटनेचे ओबीसी कर्मचारी अधिकारी जोडो अभियान १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी ओबीसींच्या विविध ज्वलंत प्रश्नावर सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त करून मराठवाडा विभागीय सचिवपदी श्री. देवेंद्र आयलाने, औसा तालुकाध्यक्षपदी श्री माधव चिलमे यांची तर जळकोट तालुकाध्यक्षपदी विजयकुमार तेलंग यांची नियुक्ती करण्यात आली.
सभेला राज्य सरचिटणीस अनिल नाचपल्ले, राज्य सल्लागार अभय पाटील, महिला राज्य उपाध्यक्ष उषाताई आडे, विभागीय अध्यक्ष श्री लक्ष्मण दावनकर, धाराशिव जिल्हाध्यक्ष संतोष भोजने, लातूर जिल्हाध्यक्ष हिरालाल पाटील, लातूर महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई सुडे, उपाध्यक्ष मनकर्णा राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश सुवर्णकार, संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री शिवचन्द्र पांचाळ, मनोज बनकर, तानाजी हजारे, यादव बाराले, बब्रुवान करकूले, शिवाजी पिनाटे, गोविंद कोलफुके, विवेक डोंगरे, अशोक पांचाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी तर सूत्रसंचालन राज्य समनव्यक विजयकुमार पिणाटे यांनी केले तर आभार उषाताई आडे यांनी मानले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Mandal commission