शेगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशन नियोजनाबाबतची सभा दि 7 नोव्हेंबर ला प्रभाकर नगर जळगाव जा येथे संपन्न झाली. सदर सभेमध्ये प्रामुख्याने रामकृष्ण जवकार,विजय डवंगे, रघुनाथ कौलकार ,राम भेलके, सुभाषराव टाले,राजूभाऊ घुटे,प्रभाकर भुमरे, साहेबराव कळसकार ,सोपान गोंड,दिनकर बेद्रे,राजेश चितोडे ,डॉ. सुपडा इंगळे , अर्जुन शृंगार ,महेंद्र बोडखे,ऐजाजशहा ,अरुण वावगे समाधान बोपले गणेश सातव सर आदी बरेच मान्यवर सभेला उपस्थित होते.
सदर सभेत शेगाव येथे 19 नोव्हेंबर 2023 ला होणाऱ्या राज्यस्तरीय पहिल्या ओ.बी.सी. कर्मचारी अधिवेशनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. आज संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणचा विषय पेटलेला आहे. या आंदोलनाने हिंसक रूप धारण केले आहे. अनेक ओबीसी समाजाचे नेते व व्यावसायिक प्रतिष्ठाने यांना लक्ष करून अगदी जाळपोळ करण्यात आली आहे. कायदा हाती घेणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी शासन दाबावामध्ये येऊन आरोपींवरील गुन्हे मागे घेत आहे. या सर्व बाबीवर या सभेमध्ये मंथन करण्यात आले. मा.छगन भुजबळ सारखे ओबीसी नेत्यांवर बेताल वक्तव्य करणाऱ्या मनोज जरांगे चा निषेधाचा ठराव या ठिकाणी सर्वानुमते पारित करण्यात आला. संपुर्ण ओबीसी समाजाने संघटित होणे ही काळाची गरज असून या साठी राष्ट्रीय कर्मचारी महासंघाच्या रविवार दि 19 नोव्हेंबर 2023 शेगांव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात सर्व ओबीसी कर्मचारी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या वेळी आयोजकांनी केले. या सभेत माजी मुख्याध्यापक रघुनाथ कौलकार यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. या सभेत ओ.बी.सी.जनगणना,क्रिमिलेअर ची मर्यादा वाढवणे, ओबीसी शिष्यवृत्ती, वसतिगृह, ओबीसी महामंडळ व महाज्योति निधी न मिळणे अशा अनेक प्रश्नांवर मान्यवरांनी आपले मते मांडली. या मध्ये ओबीसी समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. शेगाव येथील अधिवेशनात तालुक्यातुन जास्तीत जास्त ओ.बी.सी. बांधवांनी उपस्थित राहण्याचे आयोजकांनी आवाहन केले.