येवला - समस्त तेली समाजाचे बीड येथील राष्ट्रीय नेते जयदत्त अण्णा क्षीरसागर व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर समाज कंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येवला शहर व तालुका समस्त तेली समाजाच्या वतीने तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले.
घटनेचा तीव्र शब्दात तेली समाजाने निषेध व्यक्त केला असून निवेदनात समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ला प्रकरणी शासनाने कसून तपास करून दोषींना शासन व्हावे आणि सामाजिक न्याय तत्वाचे पालन या पुरोगामी महाराष्ट्रात व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात बहुजन मराठा समाज आणि अल्पसंख्याक तेली समाज हे गुण्यागोविंदाने अनेक वर्ष राहत आहेत. मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे निघाले परंतु कोणत्याही प्रकारचा हिंसाचार कधीही ऐकायला मिळाला नाही हा भ्याड हल्ला मराठा समाजाने मुळीच केला नाही, तर या आंदोलनाचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी हेतू पुरस्कर पूर्वनियोजित भ्याड हल्ला समस्त तेली समाजाचे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या बीड येथील घरावर केला. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. समाजकंटकांना शोधून त्यांना योग्य ते कायदेशीर शासन व्हावे अशी तेली समाजाची मागणी आहे.
यावेळी निवेदन देताना सदानंद बागुल, बंडू क्षीरसागर, दत्ता महाले, प्रा. कैलास चौधरी, सौ मिना लुटे, सौ सीमा बागुल, योगेश सोनवणे, रंगनाथ लुटे, शशिकांत मोरे, प्रशांत जाधव, रामदास रायजादे, नारायण घाटकर, नाना महाराज घोंगते, बापू गाडेकर, योगेश व्यवहारे, राजेंद्र घाटकर, शुभम घाटकर उपस्थित होते.
obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission