चंद्रपूर - राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटना, सर्व जातिय संघटना यांच्या वतीने ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या वेंडी गावातून होणार ओबीसी जनजागृती भेटीगाठी अभियानाची सुरवात १ नोव्हेंबरला झाली आहे. मराठा समाजाला ओबीसी
प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय सर्वे करण्यात यावा, ओबीसी विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात मुला मुलींना प्रत्येकी एक वसतिगृह सुरू करण्यात यावे व ज्या विध्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांना आधार योजना लागू करण्यात यावी आणि अन्य ओबीसीच्या संविधानिक न्याय मागण्या मंजूर करून घेण्यासाठी 'भेटीगाठी जनजागृती अभियान'
१० नोव्हेंबर २०२३ ला सायंकाळी ७ वाजता येरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कार्यक्रम होणार असून प्रमुख वक्ता म्हणून ऋषभ राऊत राहणार आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर आहेत तर प्रमुख पाहुणे दिनेश चोखारे, कार्याध्यक्ष राष्ट्रिय ओबीसी महासंघ महाराष्ट्र, ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे, ओबीसी योध्दा विजय बलकी तसेच गावातील सरपंच प्रियांका मडावी, उपसरपंच सुनीता वडस्कर, विनोद बिटे पोलीस पाटील, रमाकांत बलकी, सेवा सोसायटी अध्यक्ष, सुरेश गोरुडे तंटा मुक्त अध्यक्ष, मनोज आमटे माजी सरपंच, डॉ संजय घाटे, प्रेमानंद जोगी, रणजित डवरे, अनिल डहाके, डॉ दिलीप कांबळे, दिनेश कष्टी हितेश लोडे, गणेश आवारी, देवराव सोनपित्तरे, भाऊराव झाडे, देवा पाचभाई, गजानन कष्टी, ग्राम पंचायत सदस्य रमेश बुचे, नामदेव बोरकुटे, देवराव कुमरे, सविता घागरगुंडे, मृणाली बरडे, रुपल देशकर, गीता कडस्कर, अरुण देऊलकर, एम. व्ही. पोटे, एस एम मालेकर, मनीषा बोबडे, कुसुम उदार, यांची उपस्थिती राहणार आहेत. कार्यक्रमला उपस्थित राहण्याचे आवाहन तुळशीराम देरकर, विलास गौरकर, भारत निखाडे, सूरज मोरे, भास्कर घागरगुंडे, अतुल बोबडे, हर्षल जोगी, कृनाल जोगी, हर्षल जोगी, कृनाल पोतराजे, प्रीतम बोनसुले, हनुमान भोयर, निखिल दुरडकर, दीपक सोनटक्के, जयमाला भोयर, विद्या लेडागे, सौ सुनीता विरुतकर, गिरीजा बरडे, शामकला बरडे, सुनंदा वैद्य, मंदा भुसारी, किरण वैद्य यांनी केले आहे.