हिंगोली : ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची हिंगोली जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष पदी विजय राठोड यांनी निवड संघटनेचे प्रदेश सरचिटणीस राम वाडीभष्मे व परभणी जिल्हाध्यक्ष राम भुरे यांच्या उपस्थित मध्ये शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आली.
यावेळी बैठकीला संबोधित करताना प्रदेश महासचिव राम वाडीभष्मे म्हणाले की, ओबीसीला शासकीय नोकरीत प्रतिनिधित्व मिळून ३० वर्ष झालीत. मात्र, राज्य शासकीय सेवेत फक्त १२.४७ टक्केच ओबीसींच्या जागा भरण्यात आले आहेत. तसेच केंद्र सरकारच्या नोकरीत व केंद्रीय विद्यापीठामध्ये ओबीसींचे मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून होणारे खाजगीकरण हे ओबीसींवर अन्याय आहे. त्यामुळे ओबीसींनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी परभणी जिल्हाध्यक्ष राम भुरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष पदी चंद्रकांत फुटके, जिल्हा सल्लागार पदी पंढरीनाथ मुंडे, सुभाष कदम, राजेश्वर कावरे सोमनाथ रणखांब, जिल्हा संघटक पदी शेख राजोद्दीन, जिल्हा संपर्कप्रमुखपदी श्रीराम महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पदी माधव पोले, शाम राऊत व राजेश साखरे, जिल्हा सरचिटणीस पदी हरिशचंद्र गोलाईतकर, जिल्हा सहकार्याध्यक्ष संदीप काळे, जिल्हा कोषाध्यक्ष अमोल क्षीरसागर, जिल्हा प्रवक्ते पदी गजानन पेदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विशाल जिरवणकर यांची नियुक्तपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप धामणे, रुपेश सेलुकर, रुस्तुम रणखांब, आत्मलिंग शिंदे, गजानन आप्पा तायडे, मनोज पिंनगाळे, अशोकराव टाकळखेडे, वैजनाथ आप्पा राऊत, प्राध्यापक संजय चाटे, ल. यु. बडवणे, आर एस भिसे, रमेश गंगावणे, शंकर पोले, यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.